Jio: एकदाच रिचार्ज करा, वर्षभर नो टेन्शन; जिओच्या वार्षिक प्लानमुळं स्पर्धक कंपन्यांना फुटला घाम!-unlimited annual recharge jio prepaid 4g recharge plans and offers marathi news ,बिझनेस बातम्या
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Jio: एकदाच रिचार्ज करा, वर्षभर नो टेन्शन; जिओच्या वार्षिक प्लानमुळं स्पर्धक कंपन्यांना फुटला घाम!

Jio: एकदाच रिचार्ज करा, वर्षभर नो टेन्शन; जिओच्या वार्षिक प्लानमुळं स्पर्धक कंपन्यांना फुटला घाम!

Jan 01, 2024 06:44 PM IST

Reliance Jio Happy New Year Plan 2024: रिलायन्स जिओने त्यांच्या ग्राहकांसाठी नवा धमाकेदार वार्षिक प्लॅन आणला आहे.

Jio Recharge
Jio Recharge

Jio Annual Recharge Plan: भारतातील आघाडीची दूरसंचार कंपनी रिलायन्स जिओचा खूप मोठा ग्राहक वर्ग आहे. कंपनी आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नेहमीच नवीन प्लॅन आणते. दरम्यान, नव्या वर्षाच्या निमित्ताने कंपनीने त्यांच्या ग्राहकांसाठी आणखी एक भन्नाट प्लान आणला आहे, ज्यामुळे ग्राहकांना वर्षभर दुसरा रिचार्ज करण्याची आवश्यकता लागणार नाही. नुकतीच कंपनीने या प्लॉनबद्दल घोषणा केली होती, ज्याची वैधता ३८९ दिवसांची आहे.

जिओच्या वार्षिक प्लानवर ग्राहकांना दीर्घ वैधता मिळत आहे. कंपनीच्या वार्षिक प्लानमधून रिचार्ज करणाऱ्या ग्राहकांना २४ दिवसांची अतिरिक्त वैधता दिली जात आहे. जिओच्या वार्षिक प्लॉनअंतर्गत ग्राहकांना ३६५ दिवसांऐवजी ३८९ दिवसांची वैधता मिळत आहे. म्हणजेच ग्राहकांना जवळपास १३ महिने रिचार्ज करण्याची आवश्यकता लागणार नाही.

रिलायन्स जिओ या वार्षिक प्लानची किंमत २ हजार ९९९ रुपये आहे. या प्लॉनअतंर्गत ग्राहकांना सर्व नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग, दररोज २.५ जीबी डेटा आणि १०० एसएमएस पाठवण्याचा पर्याय मिळेल. हा प्लान ३६५ दिवसांसाठी वैध असला तरी नवीन वर्षाच्या ऑफरमध्ये २४ दिवसांची अतिरिक्त वैधता मिळत आहे. या प्लॉनच्या रिचार्जवर ग्राहकांना जिओ अ‍ॅप्स १० टीव्ही, जिओ सिनेमा आणि जिओ क्लाऊड कॉम्प्लिमेन्टरी ऐक्सेस मिळत आहे.

Whats_app_banner
विभाग