Arthsankalp 2025 Live : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा घोषणांचा धडाका, पाहा अर्थसंकल्पीय भाषणातील ठळक मुद्दे
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Arthsankalp 2025 Live : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा घोषणांचा धडाका, पाहा अर्थसंकल्पीय भाषणातील ठळक मुद्दे

Arthsankalp 2025 Live : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा घोषणांचा धडाका, पाहा अर्थसंकल्पीय भाषणातील ठळक मुद्दे

Feb 01, 2025 11:25 AM IST

Union Budget 2025 Speech Live : मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला पूर्ण अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन सादर करत आहेत.

Arthsankalp 2025 Live : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचं अर्थसंकल्पीय भाषण सुरू
Arthsankalp 2025 Live : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचं अर्थसंकल्पीय भाषण सुरू

Nirmala Sitharaman Budget 2025 Speech Live : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचं बहुप्रतिक्षित अर्थसंकल्पीय भाषण सुरू झालं आहे. उद्योग-व्यवसायासह मध्यमवर्गीयांना या बजेटकडून मोठ्या अपेक्षा आहेत. पाहूया क्षणोक्षणीचे अपडेट्स…

केंद्रीय अर्थसंकल्प Live भाषण

 

 

मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा,  १२ लाखांपर्यंत कोणताही टॅक्स नाही!

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज मोठी घोषणा केली. यापुढं १२ लाखांपर्यंत अजिबात इन्कम टॅक्स लागणार नाही.

 

ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा

जेष्ठ नागरिकांच्या ठेवींवरील करमुक्त व्याजाची मर्यादा ५०,००० हजारांवरून १ लाख रुपये होणार

भाड्यातून मिळणाऱ्या उत्पन्नावरील टीडीएसची वार्षिक मर्यादा २.४० लाखांवरून ६ लाख करण्यात येणार

 

नवीन आयकर विधेयक आणलं जाणार

नवीन इन्कम टॅक्स बिल आणण्याची अर्थमंत्र्यांची घोषणा. नवीन विधेयक सध्याच्या कायद्याच्या जवळपास निम्म्यासह स्पष्ट आणि थेट मजकुरात असेल. ते समजून घेणं सोपं होईल आणि कर निश्चितता सोपी होईल व कायदेशीर कटकटी कमी होतील.

जीवनावश्यक औषधांची आयात स्वस्त होणार

दुर्मिळ आजारांवरील उपचारासाठी लागणाऱ्या ३६ जीवनावश्यक औषधांना बेसिक सीमा शुल्कातून पूर्णपणे सूट देणार. इतर ३७ औषधे आणि १३ नवीन रुग्ण सहाय्य कार्यक्रमांना मूलभूत सीमा शुल्कातून पूर्णपणे सूट दिली जाईल.

 

औद्योगिक वस्तूंसाठी सीमा शुल्क संरचनेचे तर्कसंगतीकरण

उपकराच्या अधीन असलेल्या ८२ टॅरिफ लाइन्सवर समाज कल्याण अधिभार माफ केला जाईल.

वित्तीय क्षेत्रातील नियामक सुधारणा

व्यवसाय करणं सुलभ करण्यासाठी सर्व गैर-वित्तीय क्षेत्रातील नियम, प्रमाणपत्रे, परवाने आणि परवानग्यांचे पुनरावलोकन करण्यासाठी उच्च-स्तरीय समिती स्थापन केली जाईल.

राज्यांचा गुंतवणूक मित्रत्व निर्देशांक २०२५ मध्ये लाँच केला जाईल.

 

पीएम रिसर्च फेलोशिप

IITs आणि IISc मधील तांत्रिक संशोधनासाठी PM संशोधन फेलोशिप योजनेंतर्गत पुढील पाच वर्षांत १०,००० फेलोशिप प्रदान केल्या जातील.

 

निर्यातीला प्रोत्साहन देणार

परदेशातील बाजारपेठेतील स्पर्धेला सामोरे जाण्यासाठी निर्यात कर्ज, क्रॉस-बॉर्डर फॅक्टरिंग समर्थन आणि एमएसएमईंना समर्थन सुधारण्यासाठी निर्यात प्रोत्साहन मिशन सुरू करणार. 

आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा म्हणून व्यापार दस्तऐवजीकरण आणि वित्तपुरवठा उपायांसाठी ‘भारतट्रेडनेट’ (BTN) हा युनिफाइड प्लॅटफॉर्म सुरू करणार.

जागतिक पुरवठा साखळीसह देशांतर्गत उत्पादन क्षमता विकसित करण्यासाठी सहाय्य प्रदान केलं जाईल. तरुणांच्या फायद्यासाठी उद्योग ४.० संधींचा फायदा घेण्यासाठी सरकार देशांतर्गत इलेक्ट्रॉनिक उपकरण उद्योगाला मदत करेल. टियर-२ शहरांमध्ये जागतिक क्षमता केंद्रांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्यांना मार्गदर्शन म्हणून राष्ट्रीय आराखडा तयार केला जाईल.

 

उडान योजनेला बळ देणार

‘उडान’ योजनेअंतर्गत १२० नवीन शहरे विमान सेवेनं जोडणार. पुढील १० वर्षात ४ कोटी प्रवाशांना फायदा होणार. ईशान्येकडील राज्यांमध्ये छोटे विमानतळं आणि हेलीपॅडची उभारणी करणार

२० हजार कोटींचा अणुऊर्जा कार्यक्रम

अर्थसंकल्प २०२४ भाषण Live : अणुऊर्जा कार्यक्रमात २०,००० कोटी रुपये गुंतवले जातील. याशिवाय खाण क्षेत्रातही सुधारणा केल्या जातील. लहान खनिजांनाही प्रोत्साहन दिले जाईल. उडान योजनेचा सुमारे १.५ कोटी लोकांना फायदा होईल. प्रादेशिक संपर्क वाढवला जाईल.

जल जीवन मिशनची व्याप्ती वाढणार 

Budget 2025 Speech Live : जलजीवन योजनेत मोठी गुंतवणूक केली जात आहे. लोकांना घरपोच पिण्याचं पाणी मिळायला हवं, यावर अधिक लक्ष केंद्रित केलं जाईल. आमचा मुख्य भर पायाभूत सुविधा मजबूत करण्यावर असेल. प्रत्येकाला नळानं पाणी मिळाले पाहिजे. जल जीवन मिशन प्रकल्पाची मुदत २०२८ पर्यंत वाढवली जाणार.

शाळांना ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी आणि प्रयोगशाळा

केंद्रीय अर्थसंकल्प Live भाषण : शाळांना ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी दिली जाईल. याशिवाय विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक विचार रुजवणाऱ्या शाळांमध्ये प्रयोगशाळा बांधण्यात येणार आहेत. आयईटीची संख्या वाढवण्यात येणार

केंद्रीय अर्थसंकल्प Live भाषण : बिहारमध्ये नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, आंत्रप्रेन्योरशिप आणि मॅनेजमेंटची स्थापना केली जाईल. यामुळे पूर्व भागातील अन्न प्रक्रिया उपक्रमांना चालना मिळेल आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढेल. तरुणांना कौशल्य प्रशिक्षण आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. 

खेळण्यांच्या निर्मितीत भारत जागतिक लीडर बनेल - सीतारामन

Budget 2025 Speech Live : अर्थमंत्री निर्मला सितारन म्हणाल्या की भारताला जगभरातील खेळण्यांचे केंद्र बनवले जाईल. याशिवाय येथील अन्न उत्पादन क्षेत्राचा झपाट्याने विकास व्हावा यासाठी फूड मॅन्युफॅक्चरिंग मिशन चालवले जाईल. अर्थमंत्री म्हणाले, आम्ही आमच्या वचनबद्धतेचा भाग म्हणून हवामान अनुकूल विकास करू. आम्ही स्वच्छ तंत्रज्ञान निर्मिती करू. आम्ही बॅटरी आणि सौर पॅनेल बनवण्याचा प्रयत्न करू. तिसरे इंजिन गुंतवणूक आहे. आम्ही अर्थव्यवस्थेत, लोकांमध्ये गुंतवणूक करू.

सूक्ष्म व लघु उद्योगांसाठी क्रेडिट गॅरंटी कव्हर ५ कोटींवरून १० कोटी रुपये होणार

Budget 2025 Speech Live : एमएसएमई क्षेत्राचा विकास व्हावा अशी सरकारची इच्छा आहे. एक कोटीहून अधिक नोंदणीकृत एमएसएमई आहेत. याच्याशी करोडो लोकांचा रोजगार जोडला गेला आहे. त्यांना अधिक पैसे मिळावेत म्हणून त्यात अडीचपट वाढ करण्यात येत आहे. यातून तरुणांना रोजगार मिळेल.

दुग्धव्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी कर्जाची मर्यादा ३ लाखांवरून ५ लाख रुपये करण्यात येणार

Budget 2025 Speech Live : बिहारमधील लोकांचे उत्पन्न वाढवण्यासाठी मखाना बोर्डाची स्थापना करण्यात येईल. मत्स्य उत्पादन क्षेत्रात भारत अग्रेसर आहे. शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी किसान कार्ड देण्यात येणार आहे - निर्मला सीतारामन 

Budget 2025 Speech Live : प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेसारखे कार्यक्रम राबवले जात असून शेतीवर विशेष लक्ष दिलं जात आहे. आमचं लक्ष पायाभूत सुविधांवर आहे. कृषी उत्पादकता वाढवणं हा आमचा उद्देश आहे. यासोबतच शाश्वत विकासावर भर दिला पाहिजे. साठवण सुविधाही उत्तम असाव्यात - अर्थमंत्री

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या भेटीआधी सीतारामन अधिकाऱ्यांसह नॉर्थ ब्लॉक ऑफिसबाहेर दिसल्या. यावेळी तिने 'क्रीम' रंगाची साडी परिधान केली होती. अर्थसंकल्प डिजिटल स्वरूपात सादर करण्यासाठी त्यांच्या हातात ब्रीफकेसऐवजी टॅबलेट होता. ब्रीफकेसऐवजी सोनेरी राष्ट्रीय चिन्ह असलेल्या लाल कव्हरमध्ये टॅब्लेट ठेवण्यात आला होता.

> केंद्रीय अर्थमंत्री  निर्मला सीतारामन यांचं भाषण सुरू

Whats_app_banner