Union Budget 2025 : इन्कम टॅक्समध्ये सूट मिळाल्यास कोणत्या कंपन्यांच्या शेअर्सना होऊ शकतो फायदा? वाचा!
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Union Budget 2025 : इन्कम टॅक्समध्ये सूट मिळाल्यास कोणत्या कंपन्यांच्या शेअर्सना होऊ शकतो फायदा? वाचा!

Union Budget 2025 : इन्कम टॅक्समध्ये सूट मिळाल्यास कोणत्या कंपन्यांच्या शेअर्सना होऊ शकतो फायदा? वाचा!

Feb 01, 2025 10:24 AM IST

Stocks In Focus : आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या अर्थसंकल्पात प्राप्तिकरात कपातीची घोषणा झाल्यास कोणत्या कंपन्यांच्या शेअर्सना फायदा होऊ शकतो. पाहूया काय म्हणतात तज्ञ?

Budget 2025 : इन्कम टॅक्समध्ये सूट मिळाल्यास कोणते शेअर मिळवून देऊ शकतात नफा? वाचा!
Budget 2025 : इन्कम टॅक्समध्ये सूट मिळाल्यास कोणते शेअर मिळवून देऊ शकतात नफा? वाचा!

Stocks in Focus Before Budget : आर्थिक वर्ष २०२५-२६ चा सर्वसाधारण अर्थसंकल्प आज सादर केला जाणार आहे. या अर्थसंकल्पात केंद्र सरकारकडून करदात्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन वैयक्तिक करात कपातीची घोषणा करतील, अशी अपेक्षा आहे. तसं झाल्यास काही कंपन्यांच्या शेअर्सवर त्याचा सकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे.

रेलिगेअर ब्रोकिंगचे रवी सिंग यांनीही याबाबत विश्वास व्यक्त केल्याचं 'आज तक'च्या वृत्तात म्हटलं आहे. २०२५ च्या अर्थसंकल्पात ग्रामीण भागातील वाढीव खर्च, कर सवलत आणि रोजगार निर्मिती उपक्रमांसह अनेक उपाययोजनांद्वारे उपभोगास चालना दिली जाण्याची शक्यता आहे. करात सूट देण्यापासून ते शेतीसाठी सबसिडी आणि पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक वाढवण्यापर्यंतच्या घोषणा होऊ शकतात. अशा स्थितीत काही शेअर्सवर निश्चितच त्याचा परिणाम होऊ शकतो. हे शेअर जास्त नफा देऊ शकतात, असं रवी सिंग म्हणाले.

काय म्हणतात एक्सपर्ट्स?

हिंदुस्तान युनिलिव्हर (HUL), मारुती सुझुकी आणि गोदरेज कन्झुमर प्रॉडक्ट्स या शेअर्सना इन्कम टॅक्समधील बदलांचा फायदा मिळू शकतो, असं रवी सिंग यांनी सांगितलं. कारण, या कंपन्यांचा व्यवसाय ग्रामीण भागातील वाढती मागणी आणि ग्राहकांच्या खर्चाच्या प्रमाणावर अवलंबून असतो. मात्र, जर वित्तीय तुटीनं प्रस्तावित प्रोत्साहनास मर्यादा घातल्या तर अंदाजपत्रक अपेक्षेपेक्षा कमी पडू शकतं आणि हे शेअर्सही पडू शकतात, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.

स्टॉक्सबॉक्सचे संशोधन प्रमुख मनीष चौधरी म्हणाले की, भारतीय अर्थव्यवस्थेत मंदीची चिन्हं दिसत आहेत. अशा परिस्थिती विशेषत: शहरी क्षेत्रात, आणि लोकांच्या हातात अधिक डिस्पोजेबल उत्पन्न सुनिश्चित करण्यासाठी सरकार प्राप्तिकराच्या रचनेत बदल करू शकते. अंतर्गत कर सवलत वाढवू शकते.'

‘हे’ शेअर देऊ शकतात नफा?

अर्थव्यवस्थेतील मरगळ दूर करण्यासाठी शहरी आणि ग्रामीण भागातील विकासाला सरकार प्राधान्य देणार असल्याचं ब्रोकरेजचं म्हणणं आहे. मनरेगा आणि पीएम किसान योजनांच्या निधीतही वाढ होऊन शकते. खर्चातही सुधारणा होऊ शकते. त्यामुळं अर्थव्यवस्थेसाठी रोजगार निर्मिती होण्यास मदत होईल. हिंदुस्थान युनिलिव्हर आणि डाबर इंडिया सारखे शेअर्स मध्यम कालावधीत चांगली वाढ दाखवू शकतात.

एलजीटी वेल्थ इंडियाचे एमडी आणि सीआयओ राजेश चेरुवू यांनी सांगितले की, ग्रामीण भागात प्रोत्साहन, सबसिडी किंवा कर सवलत सुरू केल्यास उपभोग वाढू शकतो. याचा फायदा किरकोळ विक्री आणि वाहन क्षेत्रातील शेअर्सना होईल.

Whats_app_banner