Union Budget 2025: अर्थसंकल्पाआधी काय असतो हलवा समारंभ अन् 'लॉक-इन' कालावधी? काय असते याचे महत्व?
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Union Budget 2025: अर्थसंकल्पाआधी काय असतो हलवा समारंभ अन् 'लॉक-इन' कालावधी? काय असते याचे महत्व?

Union Budget 2025: अर्थसंकल्पाआधी काय असतो हलवा समारंभ अन् 'लॉक-इन' कालावधी? काय असते याचे महत्व?

Jan 27, 2025 04:17 PM IST

Union Budget 2025 : हा एक वार्षिक सोहळा आहे ज्यामध्ये हलवा तयार केला जातो आणि अर्थसंकल्प तयार करण्यात गुंतलेल्या अर्थ मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सर्व्ह केला जातो.

अर्थमंत्रालयातील हलवा समारंभ
अर्थमंत्रालयातील हलवा समारंभ

What Is Halwa Ceremony : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी पारंपारिक हलवा सोहळ्यात भाग घेतला. त्यामुळे २०२५-२६ या आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकाला अंतिम स्वरूप देण्याचे काम सुरू झाले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हलवा समारंभानंतर अर्थमंत्र्यांनी बजेट प्रेसला भेट दिली आणि संबंधित अधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी, वित्त सचिव तुहिन कांता पांडे यांच्यासह आर्थिक व्यवहार सचिव अजय सेठ यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. दिल्लीच्या नॉर्थ ब्लॉकच्या बेसमेंटमध्ये हा सोहळा पार पडतो. तिथेच प्रिंटिंग प्रेस आहे. अर्थ मंत्रालय नॉर्थ ब्लॉकमध्ये आहे.

केंद्रीय अर्थसंकल्प १ फेब्रुवारी रोजी लोकसभेत सादर केला जाणार आहे. हलवा सोहळा हा अर्थसंकल्पीय दस्तऐवज अंतिम करण्याची शेवटची पायरी मानली जाते. हा एक वार्षिक सोहळा आहे ज्यामध्ये हलवा तयार केला जातो आणि अर्थसंकल्प तयार करण्यात गुंतलेल्या अर्थ मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचार् यांना सर्व्ह केला जातो. याबरोबरच 'लॉक-इन' कालावधीही सुरू होतो. तेथे बजट टीममधील सर्व सदस्य संसदेत बजट सादर होण्यापर्यंत मंत्रालयातच राहतात.

नजरकैदेत राहतात कर्मचारी -

हलवा सोहळा म्हणजे केंद्र सरकारचा अर्थसंकल्प तयार करण्यात गुंतलेल्या अर्थ मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना 'वेगळे ठेवण्याची' प्रक्रिया आहे. म्हणजे बाहेरच्या जगापासून ते पूर्णपणे अलिप्त असतात. संसदेत अर्थसंकल्प सादर होईपर्यंत हे अधिकारी व कर्मचारी नॉर्थ ब्लॉकच्या तळघरात राहतात. जिथे पूर्ण गुप्तता पाळली जाते. अर्थमंत्र्यांचे लोकसभेतील अर्थसंकल्पीय भाषण पूर्ण झाल्यानंतरच बाहेर समोर येतात.

हलवा समारंभ म्हणजे काय?

हलवा समारंभ एक वार्षिक परंपरा आहे, जे केंद्रीय अर्थसंकल्पाची तयारीसाठी ‘लॉक-इन’ टप्पा सुरू करण्याआधी सुरू केले जाते. या कार्यक्रमात एक लोकप्रिय भारतीय मिठाई ‘हलवा’ नॉर्थ ब्लॉकमध्ये एका मोठ्या कढाईत तयार केला जातो. केंद्रीय अर्थमंत्रीही यामध्ये सामील होतात व अर्थसंकल्प तयार करण्याच्या कामात गुंतलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना हलवा वाटतात. ही परंपरा अर्थ मंत्रालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची कठोर मेहनत व समर्पणाच्या दृष्टीने पाहिले जाते.

हलवा समारंभाचे महत्व

हलवा समारंभ खूप महत्वपूर्ण आहे, कारण संसदेत बजेट अधिकृतपणे सादर करण्याच्या आधी सर्व बजट दस्तऐवजांच्या छपाईची सुरुवातीचे प्रतीक मानले जाते. याबरोबरच हलवा समारंभ अर्थ मंत्रालयाच्या आत सख्त लॉकडाउन पीरियड सुरु झाल्याचा संकेत असतो. एकदा लॉकडाउन सुरू झाल्यानंतर बजट प्रक्रियेत सामील कोणीही अधिकारी संसदेत बजेच सादर होईपर्यंत मंत्रालय परिसर सोडू शकत नाही. 

गोपनीयता आणि सुरक्षेच्या दृष्टीकोणातून १९८० पासून केंद्रीय बजट नॉर्थ ब्लॉकच्या बेसमेंटमध्ये प्रिंट केला जाते. २०२५-२६ चे बजेट १ फेब्रुवारी रोजी संसदेत सादर केले जाणार आहे. संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३१ जानेवारीपासून सुरू होणार असून ४ एप्रिल रोजी संपेल. राष्ट्रपती ३१ जानेवारी रोजी दोन सदनाच्या संयुक्त बैठकीला संबोधित करतील.

पेपरलेस असणार बजट -

२०२५-२६ चा केंद्रीय अर्थसंकल्प मागील चार पूर्ण केंद्रीय अर्थसंकल्प आणि एका अंतरिम अर्थसंकल्पाप्रमाणे पेपरलेस स्वरूपात सादर केला जाईल. वार्षिक वित्तीय विवरण (अर्थसंकल्प म्हणून ओळखले जाते), अनुदानाच्या मागण्या, वित्त विधेयक आदींसह केंद्रीय अर्थसंकल्पातील सर्व कागदपत्रे 'केंद्रीय अर्थसंकल्प मोबाइल अॅप'वर उपलब्ध असतील.

Whats_app_banner