Union Budget 2024 Updates: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज २०२४-२०२५ या आर्थिक वर्षासाठी त्यांचा सातवा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करत आहेत. यंदाच्या अर्थसंकल्पात नोकरदारांसाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात म्हटले की, संघटित क्षेत्रात रोजगार मिळवणाऱ्या लोकांना पहिल्या महिन्याचा पगार सरकार देईल. कर्मचारी आणि नियोक्ता दोघांनाही ही मदत दिली जाईल. याशिवाय, रोजगाराच्या पहिल्या ४ वर्षांमध्ये सरकार पीएफमध्येही योगदान देईल. या अंतर्गत, सरकार नियोक्त्याला दरमहा ३००० रुपयांची मदत करेल. याशिवाय, रोजगाराशी संबंधित आणखी तीन योजना सुरू करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
लोकसभेत २०२४-२५चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले की, सरकार एक महिन्याचे पीएफ योगदान देऊन नोकरीत नव्यानेच प्रवेश करणाऱ्या ३० लाख तरुणांना प्रोत्साहित करेल. महिला कर्मचाऱ्यांच्या सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी देशभरात नोकरदार महिलांसाठी वसतिगृहे सुरू करण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. हवामानाला अनुकूल बियाणे विकसित करण्यासाठी सरकार खाजगी क्षेत्र, क्षेत्रातील तज्ज्ञ आणि इतरांना निधी उपलब्ध करून देईल, असे अर्थमंत्र्यांनी सांगितले.
आधीपासून अस्तित्वात असलेली योजना ‘मनरेगा’चे (महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी) प्रत्येक कुटुंबातील किमान एका सदस्याला आर्थिक वर्षात १०० दिवसांचा रोजगार प्रदान करण्याचे उद्दिष्ट आहे.
२०२४च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपच्या विजयानंतर निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत अर्थसंकल्प सादर करताना देशातील शिक्षण, रोजगार आणि कौशल्यांसाठी १.४८ लाख कोटी रुपयांची घोषणा केली होती. २०२४-२५चा अर्थसंकल्प सादर करताना, अर्थमंत्री सीतारामन म्हणाल्या, ‘२ लाख रुपयांच्या केंद्रीय खर्चासह, पुढच्या ५ वर्षात ४.१कोटी तरुणांना रोजगार, कौशल्ये आणि इतर संधी उपलब्ध करून देणाऱ्या 5 योजना आणि प्रधान मंत्री पॅकेजची घोषणा करताना आनंद होत आहे. या वर्षी आम्ही शिक्षण, रोजगार आणि कौशल्यांसाठी १.४८ लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे.’
अर्थमंत्री निर्मला सीतारामन मंगळवारी २०२४-२५ या आर्थिक वर्षाचा सलग सातवा अर्थसंकल्प सादर करून इतिहास रचणार आहेत. यावर्षी त्या माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांचा विक्रम मोडणार आहेत. मात्र, सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम आजही मोरारजी देसाई यांच्या नावावर आहे. २०१९मध्ये निर्मला सीतारामन यांना भारताच्या पहिल्या महिला अर्थमंत्री बनवण्यात आले.
संबंधित बातम्या