Union Budget 2024: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बजेटमध्ये मोबाईल फोन आणि चार्जर स्वस्त करण्याची घोषणा केली आहे. अर्थमंत्र्यांनी आज अर्थसंकल्पात सर्वसामान्यांना उपयोगी पडणाऱ्या वस्तूंबाबत मोठ्या दिलासादायक घोषणा केल्या आहेत. याशिवाय नव्या कर प्रणालीअंतर्गत सुधारित टॅक्स स्लॅबची घोषणा केली. नव्या करप्रणालीचा अवलंब करणाऱ्या पगारदार कर्मचाऱ्यांची स्टँडर्ड डिडक्शन ५० हजार रुपयांवरून ७५ हजार रुपयांपर्यंत वाढवण्याची घोषणा ही अर्थमंत्र्यांनी केली.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे सरकारने सोने आणि चांदीवरील आयात शुल्क १५ टक्क्यांवरून ६ टक्क्यांवर आणले असून, या निर्णयामुळे किरकोळ मागणी वाढेल आणि जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या सराफा ग्राहकातील तस्करी रोखण्यास मदत होईल, असे उद्योग अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. भारताकडून सोन्याची मागणी वाढल्याने जागतिक किंमती वाढू शकतात, ज्याने यावर्षी विक्रमी उच्चांक गाठला असला, तरी यामुळे भारताची व्यापार तूट वाढू शकते आणि रुपयावर आणखी दबाव येऊ शकतो.
> मोबाइल फोन, मोबाइल पार्ट्स, बॅटरी, मोबाइल चार्जर
मोबाइल फोन, चार्जर आणि अॅक्सेसरीजवरील बेसिक कस्टम ड्युटी १५ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आली आहे.
> सोने, चांदी आणि प्लॅटिनम
सोने, चांदीवरील सीमा शुल्क ६ टक्के, प्लॅटिनमवरील सीमा शुल्क ६.४ टक्के
> कर्करोगाची औषधे, एक्स-रे उपकरणे
कर्करोगाच्या उपचारांची तीन प्रमुख औषधे आणि एक्स-रे उपकरणे मूलभूत सीमा शुल्कातून मुक्त करण्यात आले आहेत. याशिवाय सरकारने फेरोनिकेल आणि ब्लिस्टर कॉपरवरील बेसिक कस्टम ड्युटी हटवली आहे.
> मासे आणि मासे उत्पादने
मासे, ब्रुडस्टॉक, कोळंबी, पॉलीकेट कृमी आणि मत्स्यखाद्यावरील सीमा शुल्क ५ टक्क्यांपर्यंत कमी केले आहे.
> आवश्यक धातू आणि खनिजे
फेरो निकेल, ब्लीस्टर कॉपर आणि २५ महत्त्वपूर्ण खनिजांवरील मूळ सीमा शुल्क काढून टाकण्यात आले आहे. रेझिस्टर्स (ऑक्सिजन फ्री कॉपर) तयार करण्याचे शुल्कही काढून टाकण्यात आले आहे. लिथियमसह २५ महत्त्वाच्या खनिजांसाठी आयात शुल्कात सूट देण्याची घोषणा केली.
> सोलर पॅनेल, चामड्याच्या वस्तू
सोलर पॅनेल तयार करण्यासाठी सूट देण्यात आलेल्या वस्तूंची यादी वाढवण्यात आली असून, चामड्याच्या वस्तूंवरील सीमा शुल्क कमी करण्यात आले आहे.
> प्लॅस्टिक आणि संबंधित वस्तू
सरकारने प्लास्टिक उत्पादने आणि संबंधित वस्तूंवरील सीमा शुल्क वाढवले आहे.
> अमोनियम नायट्रेट
अमोनियम नायट्रेटवरील सीमा शुल्क ७.५ टक्क्यांवरून १० टक्के करण्यात आले आहे.
> टेलिकॉम उपकरणे
सरकारने सीमा शुल्क १० टक्क्यांवरून १५ टक्क्यांपर्यंत वाढवले आहे
संबंधित बातम्या