केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन २३ जुलै रोजी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार असून, सलग सात अर्थसंकल्प सादर करणाऱ्या त्या पहिल्या अर्थमंत्री ठरल्या आहेत. मोरारजी देसाई यांनी यापूर्वी सलग सहा अर्थसंकल्प सादर करून हा विक्रम केला होता.
सलग अर्थसंकल्प सादर करणाऱ्या सीतारामन यांच्या नावावर आणखी एक विक्रम आहे तो म्हणजे सर्वात प्रदीर्घ अर्थसंकल्पीय भाषणाचा विक्रम. इतिहासातील सर्वात प्रदीर्घ केंद्रीय अर्थसंकल्पीय भाषणांबरोबरच सर्वात लहान भाषणांवरही एक नजर टाकूया.
निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्प २०२० साठी केलेले भाषण हे भारताचे सर्वात लांब केंद्रीय अर्थसंकल्पीय भाषण आहे. १ फेब्रुवारी २०२० रोजी केंद्रीय अर्थसंकल्प सकाळी ११ ते दुपारी १ वाजून ४० मिनिटांपर्यंत एकूण २ तास ४० मिनिटे चालला होता.
त्यांच्या भाषणातील महत्त्वाच्या घोषणांमध्ये नवीन प्राप्तिकर प्रणाली लागू करणे, तसेच एलआयसीची प्रारंभिक सार्वजनिक ऑफर (आयपीओ) यांचा समावेश होता.
शेवटच्या दोन पानांपासून अस्वस्थ वाटू लागल्याने त्या आपले भाषण पूर्णपणे पूर्ण करू शकल्या नाहीत. यामुळे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना उर्वरित भाषण पूर्ण करावे लागले.
२०१९ मध्ये अर्थमंत्री झाल्यानंतर त्यांचे पहिले अर्थसंकल्पीय भाषण २ तास २८ मिनिटांचे होते. या अर्थसंकल्पात प्राप्तिकर विवरणपत्र आणि एमएसएमई लाभांची घोषणा करण्यात आली होती.
सर्वात लांब केंद्रीय अर्थसंकल्पीय भाषणाचा विक्रम यापूर्वी २००३ मध्ये तत्कालीन अर्थमंत्री जसवंत सिंह यांच्या नावावर होता. त्यांचे भाषण २ तास १३ मिनिटे चालले आणि हे आतापर्यंतचे तिसरे सर्वात मोठे अर्थसंकल्पीय भाषण ठरले आहे.
सिंह यांनी भाषणात युनिव्हर्सल हेल्थ इन्शुरन्सचा प्रस्ताव मांडला, प्राप्तिकर विवरणपत्र ई-फायलिंगची प्रणाली सुरू केली आणि काही वस्तूंवरील सीमा शुल्कात कपात केल्याचा उल्लेख केला.
चौथ्या क्रमांकाचे केंद्रीय अर्थसंकल्पीय भाषण अरुण जेटली यांनी २०१४ मध्ये केले होते, जे २ तास १० मिनिटे चालले होते.
जेटली यांनी आणखी अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) स्थापन करण्याचा, करसवलतीचा स्लॅब दोन लाख रुपयांवरून अडीच लाख रुपयांपर्यंत वाढवण्याचा आणि संरक्षणासाठी थेट परकीय गुंतवणूक (एफडीआय) ४९ टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव मांडला होता.
१९७७-७८ या वर्षाचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करणारे हिरुभाई एम. पटेल यांनी भारतातील सर्वात लहान अर्थसंकल्पीय भाषण केले. ते भाषण केवळ ८०० शब्दांचे होते.
संबंधित बातम्या