मराठी बातम्या  /  business  /  Union Budget 2023 : बजेटमध्ये या ५ तरतूदी झाल्या तर शेअर बाजारात होईल धमाका, एफपीआयला मिळेल चालना
share market HT
share market HT

Union Budget 2023 : बजेटमध्ये या ५ तरतूदी झाल्या तर शेअर बाजारात होईल धमाका, एफपीआयला मिळेल चालना

23 January 2023, 13:02 ISTKulkarni Rutuja Sudeep

Union Budget 2023 : एनएसडीएल डेटानुसार, १ जानेवारी ते २१ जानेवारी दरम्यान परकीय गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारपेठेतून अंदाजे १५,२३६ कोटी रुपये काढून घेतले आहेत. तर गेल्या महिन्यात अंदाजे ११,११९ कोटी रुपये मूल्यांच्या शेअर्सची विक्री केली आहे. दरम्यान, एफपीआयने २०२२ मध्ये अंदाजे १२१४३९ कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केली आहे.

Union Budget 2023 : वर्ष २०२३ च्या सुरुवाचीलाच परकीय गुंतवणूकदारांच्या शेअर्स विक्रीमुळे भारतीय शेअर बाजारातील चिंता वाढली आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे वाढता बाह्य धोका. मात्र आगामी बजेट २०२३ मध्ये अशा काही घोषणा परदेशी गुंतवणूकदारांना भारतीय बाजारपेठेत आकर्षित करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरु शकतात. तर दुसरीकडे देशांतर्गत गुंतवणूकदरांनाही याचा फायदा होऊ शकतो. एनएसडीएल डेटानुसार, एनएसडीएल डेटानुसार, १ जानेवारी ते २१ जानेवारी दरम्यान परकीय गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारपेठेतून अंदाजे १५,२३६ कोटी रुपये काढून घेतले आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

सरकारी बॅका तेजीत

जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे मुख्य गुंतवणूक आर्थिक सल्लागार डाॅ. वी. के. विजयकुमार म्हणाले की, जानेवारीमध्ये एफपीआयने गुंतवणूकीचा मागील ट्रेड कायम ठेवला आहे. तर वर्षाच्या सुरुवातीलाच परकीय गुंतवणूकीचा विक्रीचा कल आश्चर्यचकित करणारा आहे.

बजेटकडून या पाच अपेक्षा

- तज्ञांच्या मते, बजेटमध्ये प्राॅफिट बूकींग करण्यासाठी लाॅग टर्म कॅपिटल गेन टॅक्स घटवून ५ टक्के करावा.

- एनआरआयसाठी परकीय गुंतवणूकीसंदर्भातील नियम शिथिल करावे. यामुळे भारतासारख्या उदयोन्मुख अर्थव्यवस्थेला चालना मिळेल.

- सीटीटी आणि एसटीटी लादल्यामुळे मार्केटमध्ये लिक्विडीटीला झटका बसला आहे. यामुळे ट्रॅन्झॅक्शन फीमध्ये वाढ झाली आहे आणि प्राॅफिटेबिलीटीवर परिणाम झाला आहे.

- कलम ८८ ई अंतर्गत एसटीटी अथवा सीटीटी रिबेटमधून ट्रेडिंग व्हाॅल्यूम वाढेल आणि सरकारलाही त्याचा फायदा होईल

- अत्यावश्यक सबसिडीसह डिफेन्स आणि पायाभूत क्षेत्रात कॅपेक्समुळे देशांतर्गत तसेच परकीय गुंतवणूकदारांना तंत्रज्ञान आणि भांडवलाच्या रुपात गुंतवणूक येईल.

विभाग