IPO GMP news : युनिमेक एरोस्पोसच्या आयपीओचा ग्रे मार्केटमध्ये बोलबाला, पाहा जीएमपी व इतर माहिती
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  IPO GMP news : युनिमेक एरोस्पोसच्या आयपीओचा ग्रे मार्केटमध्ये बोलबाला, पाहा जीएमपी व इतर माहिती

IPO GMP news : युनिमेक एरोस्पोसच्या आयपीओचा ग्रे मार्केटमध्ये बोलबाला, पाहा जीएमपी व इतर माहिती

Dec 26, 2024 04:00 PM IST

Unimech Aerospace IPO Subsrciption : युनिमेक एरोस्पेस या कंपनीचा आयपीओ सबस्क्रिप्शनच्या तिसऱ्या दिवशी जोरदार सबस्क्राइब झाला आहे.

ग्रे मार्केटमध्ये युनिमेक एरोस्पोसच्या आयपीओचा बोलबाला, पाहा जीएमपी व इतर माहिती
ग्रे मार्केटमध्ये युनिमेक एरोस्पोसच्या आयपीओचा बोलबाला, पाहा जीएमपी व इतर माहिती

Unimech Aerospace IPO Subsrciption : युनिमेक एरोस्पेस अँड मॅन्युफॅक्चरिंग लिमिटेडचा आयपीओ सबस्क्राइब करण्याचा आज शेवटचा दिवस होता. या आयपीओला गुंतवणूकदारांचा उदंड प्रतिसाद मिळाला असून ग्रे मार्केटमध्ये हा शेअर ५११ रुपयांच्या प्रीमियमवर व्यवहार करत आहे. 

युनिमेक एअरोस्पेस आयपीओसाठी ७४५ ते ७८५ रुपये असा दरपट्टा निश्चित करण्यात आला आहे. एअरो-इंजिन कंपोनेंट बनविणाऱ्या या कंपनीचा आयपीओ म्हणजे फ्रेश शेअर्स आणि ऑफर फॉर सेल (ओएफएस) चं मिश्रण आहे. या माध्यमातून ५०० कोटी रुपये उभे करण्याचं उद्दिष्ट कंपनीनं ठेवलं आहे. युनिमेक एअरोस्पेस आयपीओ सब्सक्रिप्शन स्टेटसनुसार, तुफान प्रतिसाद मिळाला आहे.

बीएसई आकडेवारीनुसार, Unimech Aerospace IPO आज सबस्क्रिप्शनच्या तिसऱ्या दिवशी दुपारी सव्वा दोन वाजेपर्यंत जवळपास ९६ पट सबस्क्राइब झाला आहे. एकूण ४७,०४,०२८ शेअर्सची ऑफर होती. मात्र, प्रत्यक्षात ४४,८८,४०,७०५ शेअर्ससाठी अर्ज आले आहेत.

किरकोळ गुंतवणूकदारांच्या श्रेणीत ४४ पट सबस्क्रिप्शन मिळालं, तर गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या कोट्याला १९४ पट सबस्क्रिप्शन मिळालं. पात्र संस्थात्मक खरेदीदार (QIBs) कोटा ११२ पट बुक झाला आहे. कर्मचारी कोट्यात ७७.८२ पट सबस्क्रिप्शन आलं आहे.

आयपीओच्या तिसऱ्या दिवशी दुपारी २.५४ वाजेपर्यंत बुक बिल्ड इश्यू १३८.१४ पट, पब्लिक इश्यूचा रिटेल भाग ४७.१४ पट, एनआयआय सेगमेंट २२२.८३ पट, तर क्यूआयबी सेगमेंट २३४.७२ पट सब्सक्राइब झाला होता.

युनिमेक एअरोस्पेस जीएमपी

युनिमेक एरोस्पेस आयपीओ ग्रे मार्केट प्रीमियम आज ५११ रुपये आहे. अर्थात, कंपनीच्या शेअरची आयपीओ लिस्टिंग किंमत सुमारे १,२९६ रुपये (७८५+५११= १२९६) असेल. ही किंमत इश्यू प्राइसपेक्षा सुमारे 65 टक्के जास्त आहे. गुंतवणूकदारांचा भक्कम प्रतिसाद हे ग्रे मार्केटमधील तेजीचे एक महत्त्वाचे कारण असल्याचं बाजार निरीक्षकांनी सांगितलं.

काय करते ही कंपनी?

युनिमेक एरोस्पेस ही कंपनी जागतिक उच्च-परिशुद्धता आणि अभियांत्रिकी सोल्यूशन्स कंपनी आहे. कंपनीनं एअरोस्पेस, डिफेन्स, सेमीकंडक्टर आणि एनर्जी क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांसाठी स्वीकृत पुरवठादार म्हणून स्वतःला प्रस्थापित केलं आहे. कंपनीनं आपल्या उत्पादनांशी संबंधित सर्व ग्राहकांच्या विशिष्ट आणि बदलत्या गरजा जाणून घेऊन त्या पूर्ण करण्यासाठी सुविधा विकसित केल्या आहेत. या सर्व बाबींचा विचार करून हेम सेक्युरिटीजनं हा आयपीओ 'सबस्क्राइब' करण्याची शिफारस केली आहे.

मारवाडी शेअर्स अँड फायनान्सनं पब्लिक इश्यूला 'सबस्क्राइब' टॅग दिला आहे. ही कंपनी ३९९२.२७ कोटी रुपयांच्या मार्केट कॅपसह अंदाजे ~ ५२ पट पी / ई वर सूचीबद्ध होणार आहे, तर त्याच वेळी स्पर्धक कंपन्या एमटीएआर टेक्नॉलॉजीज लिमिटेड, आझाद इंजिनीअरिंग लिमिटेड, पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीज लिमिटेड, डायनामॅटिक टेक्नॉलॉजीज लिमिटेड आणि डेटा पॅटर्न्स (इंडिया) लिमिटेड अनुक्रमे ~ १२३, ~ १४४, ~ १०१, ~ ११२ आणि ~ ७६ पट पी / ई रेश्योवर ट्रेड करीत आहेत. 

याशिवाय अजकॉन ग्लोबल सर्व्हिसेस, अरिहंत कॅपिटल मार्केट्स, बीपी इक्विटीज, कॅनरा बँक सिक्युरिटीज, युरेका स्टॉक अँड शेअर ब्रोकिंग सर्व्हिसेस, जीईपीएल कॅपिटल, इनक्रेड इक्विटीज, इंडसेक सिक्युरिटीज, केआर चोक्सी सिक्युरिटीज, निर्मल बंग, रिलायन्स सिक्युरिटीज, एसबीआय कॅपिटल सिक्युरिटीज, एसएमआयएफएस, स्टॉकएज आणि व्हेंचुरा सिक्युरिटीज यांनीही बुक बिल्ड इश्यूला 'सबस्क्राइब' टॅग दिला आहे.

 

(डिस्क्लेमर: हे वृत्त केवळ माहितीपर आहे. हिंदुस्तान टाइम्स मराठी कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला देत नाही. त्यामुळं गुंतवणूक करण्याआधी आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा.)

Whats_app_banner