IPO Listing news : युनिकॉमर्स कंपनीच्या शेअरचा धुमाकूळ! पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना दिले दुपटीपेक्षा जास्त पैसे-unicommerce esolutions makes stellar debut in stock market shares list at rs 235 a 118 premium to ipo price ,बिझनेस बातम्या
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  IPO Listing news : युनिकॉमर्स कंपनीच्या शेअरचा धुमाकूळ! पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना दिले दुपटीपेक्षा जास्त पैसे

IPO Listing news : युनिकॉमर्स कंपनीच्या शेअरचा धुमाकूळ! पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना दिले दुपटीपेक्षा जास्त पैसे

Aug 13, 2024 01:32 PM IST

Unicommerce IPO Listing : युनिकॉमर्स ई-सोल्यूशन्स लिमिटेडच्या समभागांना आज, 13 ऑगस्ट रोजी एक्सचेंजमध्ये शानदार लिस्टिंग मिळाली.

Unicommerce IPO : 'या' कंपनीच्या शेअरनं राडाच केला! पहिल्याच दिवशी मिळवून दिले दुप्पट पैसे
Unicommerce IPO : 'या' कंपनीच्या शेअरनं राडाच केला! पहिल्याच दिवशी मिळवून दिले दुप्पट पैसे

Unicommerce eSolutions IPO Listing : युनिकॉमर्स ईसोल्यूशन्स लिमिटेडच्या शेअरनं शेअर मार्केटमध्ये दणदणीत एन्ट्री घेतली आहे. आयपीओमध्ये १०८ रुपयांना दिला गेलेला हा शेअर एनएसईवर ११७.५९ टक्क्यांनी वाढून २३५ रुपयांवर सूचीबद्ध झाला. तर, बीएसईवर तो ११२.९६ टक्के प्रीमियमसह २३० रुपयांवर लिस्ट झाला. त्यामुळं गुंतवणूकदारांनी पहिल्याच दिवशी दुपटीपेक्षा जास्त कमाई केली आहे.

कंपनीचा आयपीओ ६ ऑगस्ट रोजी गुंतवणुकीसाठी खुला झाला आणि ८ ऑगस्ट रोजी बंद झाला. या आयपीओच्या माध्यमातून कंपनीला २७६.५७ कोटी रुपये उभे करायचे आहेत. आयपीओसाठी १०२ ते १०८ रुपये प्रति शेअर असा दरपट्टा निश्चित करण्यात आला होता. सबस्क्रिप्शनच्या पहिल्या ३ दिवसांत या इश्यूला प्रचंड मागणी दिसून आली.

आयपीओला मिळाला होता तुफान प्रतिसाद

आयपीओला एकूण १६८.३५ पट प्रतिसाद मिळाला. गुंतवणूकदारांनी १.४ कोटी शेअर्सच्या तुलनेत २३७.११ कोटी शेअर्ससाठी बोली लावली. बिगर संस्थात्मक गुंतवणूकदार श्रेणीला सर्वाधिक २५२.४६ पट, तर पात्र संस्थात्मक खरेदीदारांचा कोटा १३८.७५ पट मिळाला. दरम्यान, किरकोळ गुंतवणूकदारांच्या श्रेणीतही १३०.९९ पट इतकं भरघोस सब्सक्रिप्शन मिळालं. हा आयपीओ पूर्णपणे ओएफएस (Offer for Sale) चा भाग होता.

एसवेक्टर लिमिटेड आणि एसबी इन्व्हेस्टमेंट होल्डिंग्स (यूके) यांनी कंपनीतील आपला काही हिस्सा आयपीओच्या माध्यमातून विक्रीस काढला होता. आयआयएफएल सिक्युरिटीज आणि सीएलएसए इंडिया हे आयपीओचे प्रमुख व्यवस्थापक होते. तर, लिंक इनटाइम इंडियानं रजिस्ट्रार म्हणून काम पाहिलं.

काय करते ही कंपनी?

युनिकॉमर्स ई-सोल्युशन्सची स्थापना २०१२ मध्ये झाली. हा भारतातील आघाडीचा ई-कॉमर्स समर्थित सॉफ्टवेअर-ए-ए-सर्व्हिस (एसएएएस) प्लॅटफॉर्म आहे. युनिकॉमर्स ईसोल्यूशन्स सर्व्हिस (SAAS) प्लॅटफॉर्म म्हणून कार्य करते. ई-कॉमर्स ऑपरेशन्सचं व्यवस्थापन करण्यासाठी ब्रँड, विक्रेते आणि लॉजिस्टिक्स प्रदात्यांना सेवा देते. लेन्सकार्ट, फॅब इंडिया, झिवामे, टीसीएनएस, मामाअर्थ, इमामी, शुगर, बोट, पोर्ट्रॉनिक्स, फार्मईजी, जीएनसी, सेलो, अर्बन कंपनी, मेन्सा, शिपरॉकेट, एक्सप्रेसबीस यांसारख्या नामांकित कंपन्यांना ही कंपनी सेवा पुरवते. भारताबरोबरच युनिकॉमर्सचे इतर सहा देशांमध्ये ग्राहक आहेत. आग्नेय आशिया आणि मध्य पूर्वेतील प्रदेशांवर कंपनीनं लक्ष केंद्रित केलं आहे.

 

(डिस्क्लेमर: हे वृत्त माहितीपर आहे. हा कोणत्याही प्रकारचा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणुकीत जोखीम असते. त्यामुळं गुंतवणुकीचा कोणताही निर्णय घेण्याआधी आपल्या आर्थिक सल्लागाराशी चर्चा करावी.)

विभाग