MRF Dividend : 'या' कंपनीच्या एका शेअरची किंमत १ लाख १९ हजार; डिविडंड किती दिला पाहाच!
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  MRF Dividend : 'या' कंपनीच्या एका शेअरची किंमत १ लाख १९ हजार; डिविडंड किती दिला पाहाच!

MRF Dividend : 'या' कंपनीच्या एका शेअरची किंमत १ लाख १९ हजार; डिविडंड किती दिला पाहाच!

HT Marathi Desk HT Marathi
Nov 09, 2024 02:40 PM IST

MRF Dividend News : देशातील दुसऱ्या क्रमांकाचा महागडा शेअर असलेल्या कंपनीनं डिविडंडची घोषणा केली असून रेकॉर्ड डेटही जाहीर केली आहे.

शेअर मार्केट अपडेट्स, शेअर मार्केट न्यूज, एक्झिट पोल रिझल्ट, सेन्सेक्स, निफ्टी, रुपया
शेअर मार्केट अपडेट्स, शेअर मार्केट न्यूज, एक्झिट पोल रिझल्ट, सेन्सेक्स, निफ्टी, रुपया

MRF Dividend News : टायर उत्पादक कंपनी एमआरएफने सप्टेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. या तिमाहीत कंपनीच्या नफ्यात मोठी घसरण झाली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या जुलै-सप्टेंबरच्या दुसऱ्या तिमाहीत नफा १९ टक्क्यांनी घसरून ४७०.७० कोटी रुपयांवर आला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीला ५८६.६० कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता.

'एमआरएफ'ने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, या तिमाहीत कामकाजातून मिळणारे उत्पन्न ६८८१.०९ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. मागील वर्षीच्या ६२१०.१७ कोटी रुपयांच्या तुलनेत हे उत्पन्न १० टक्क्यांनी अधिक आहे.

एमआरएफने प्रति शेअर ३ रुपये अंतरिम लाभांश जाहीर केला असून त्यासाठी १९ नोव्हेंबर २०२४ ही रेकॉर्ड डेट निश्चित केली आहे. घोषित लाभांश भागधारकांना २९ नोव्हेंबर २०२४ रोजी किंवा त्यानंतर दिला जाईल.

आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी एमआरएफच्या शेअर्समध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली. ट्रेडिंग दरम्यान हा शेअर जवळपास १.५९ टक्क्यांनी घसरून १,१९,१०० रुपयांवर आला. हा शेअर १,५१,४४५ रुपयांच्या उच्चांकी पातळीच्या २२ टक्क्यांनी खाली व्यवहार करत आहे. वार्षिक आधारावर हा शेअर आतापर्यंत ८ टक्क्यांनी घसरला आहे.

काय करते ही कंपनी?

एमआरएफ ही भारतातील सर्वात मोठी टायर उत्पादक आहे आणि जगातील टॉप २० टायर उत्पादक कंपन्यांच्या यादीत एमआरएफचा समावेश आहे. ही कंपनी भारतातील सर्वात मोठी ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर (OEM) टायर पुरवठादार आहे. दुचाकींपासून लढाऊ विमानांपर्यंतच्या वेगवेगळ्या प्रकारच्या टायरची निर्मिती आणि पुरवठा ही कंपनी करते.

 

(डिस्क्लेमर: हे वृत्त केवळ माहितीपर आहे. हा कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला नाही. त्यामुळं गुंतवणूक करण्याआधी आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा.)

Whats_app_banner