Bike Under 100000: एक लाखांपेक्षा कमी किंमतीत मिळणाऱ्या ‘या’ १० दुचाकींच्या खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड!
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Bike Under 100000: एक लाखांपेक्षा कमी किंमतीत मिळणाऱ्या ‘या’ १० दुचाकींच्या खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड!

Bike Under 100000: एक लाखांपेक्षा कमी किंमतीत मिळणाऱ्या ‘या’ १० दुचाकींच्या खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड!

Jan 24, 2025 02:39 PM IST

Two Wheeler Sales In December 2024: गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात सर्वाधिक विकल्या गेलेल्या टॉप- १० दुचाकीबद्दल जाणून घेऊयात.

एक लाखांपेक्षा कमी किंमतीत मिळणाऱ्या 'या' १० दुचाकींच्या खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड!
एक लाखांपेक्षा कमी किंमतीत मिळणाऱ्या 'या' १० दुचाकींच्या खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड!

Best Two Wheelers Sales in India: भारतीय ग्राहकांमध्ये दुचाकींची मागणी सातत्याने वाढत आहे. गेल्या महिन्यातील म्हणजेच डिसेंबर २०२४ मधील विक्रीबाबत बोलायचे झाले तर, पुन्हा एकदा हिरो स्प्लेंडरने या सेगमेंटच्या विक्रीत अव्वल स्थान पटकावले आहे. हिरो स्प्लेंडरने या महिन्यात एकूण १ लाख ९२ हजार ४३८ मोटारसायकलींची विक्री केली. मात्र, या कालावधीत हिरो स्प्लेंडरच्या विक्रीत १५.५० टक्क्यांची घट झाली आहे. नवी दिल्लीत हिरो स्प्लेंडरची एक्स-शोरूम किंमत ७७ हजार १७६ रुपयांपासून सुरू होते. गेल्या महिन्यात सर्वाधिक विकल्या गेलेल्या १० दुचाकींच्या विक्रीवर एक नजर टाकूयात.

विक्रीच्या या यादीत होन्डा अ‍ॅक्टिव्हा दुसऱ्या क्रमांकावर असून त्यात सुमारे ५० टक्क्यांनी वाढ झाली आहे. होंडा अ‍ॅक्टिव्हाने या कालावधीत एकूण १ लाख २० हजार ९८१ स्कूटरची विक्री केली आहे. या कालावधीत १६.१८ टक्क्यांची घसरण झाली आहे. तर, होन्डा शाईन या विक्रीच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. होंडा शाईनने या कालावधीत १ लाख ८४१ मोटारसायकलींची विक्री झाली, जी १८.४४ टक्क्यांनी वाढली आहे. याशिवाय, टीव्हीएस ज्युपिटर या विक्रीच्या यादीत चौथ्या क्रमांकावर होती. टीव्हीएस ज्युपिटरने या कालावधीत ४८.९३ टक्के वार्षिक वाढीसह स्कूटरच्या एकूण ८८ हजार ६६८ युनिट्सची विक्री केली.

मॉडलयूनिट्स 
स्प्लेंडर१ लाख ९२ हजार ४३८
एक्टिवा१ लाख २० हजार ९८१
शाइन१ लाख ८४१
जुपिटर ८८ हजार ६६८
एक्सेस५२ हजार १८०
पल्सर६५ हजार ५७१
एचएफ डीलक्स४१ हजार ७१३
टीवीएस एक्सएल३३ हजार ९२
क्लासिक ३५०२९ हजार ६३७
प्लॅटिना २५ हजार ५८४

पल्सरच्या विक्रीत ४० टक्क्यांनी घट झाल्याने सुझुकी अ‍ॅक्सेस या यादीत पाचव्या स्थानावर आहे. सुझुकी अ‍ॅक्सेसने या महिन्यात स्कूटरच्या ५२ हजार १८० युनिट्सची विक्री केली, जी वर्षाच्या तुलनेत ३.१९ टक्क्यांनी कमी आहे. या यादीत बजाज पल्सर सहाव्या क्रमांकावर आहे. बजाज पल्सरने या कालावधीत एकूण ६५ हजार ५७१ मोटारसायकलींची विक्री केली आहे. त्यात ३८.५७ टक्क्यांची घट झाली आहे. याशिवाय, हीरो एचएफ डिलक्स विक्रीच्या या यादीत सातव्या क्रमांकावर होती. हीरो एचएफ डिलक्सने या महिन्यात ४१ हजार ७१३ मोटारसायकलींची विक्री केली, जी वार्षिक तुलनेत ३१.६ टक्क्यांनी कमी आहे.

या यादीत बजाज प्लॅटिना आठव्या, टीव्हीएस एक्सएल आठव्या क्रमांकावर होती. टीव्हीएस एक्सएलने मोपेडच्या ३३ हजार ०९२ युनिट्सची विक्री केली, जी वार्षिक तुलनेत १३.५८ टक्क्यांनी कमी आहे. रॉयल एनफिल्ड क्लासिक ३५० या यादीत नवव्या क्रमांकावर आहे. क्लासिक ३५० ने एकूण २९ हजार ६३७ मोटारसायकलींची विक्री केली आहे. या कालावधीत ३९.५७ टक्क्यांची वाढ झाली आहे. तर, बजाज प्लॅटिना या यादीत दहाव्या क्रमांकावर होती. बजाज प्लॅटिनाने या महिन्यात बजाज प्लॅटिनाच्या २५ हजार ५८४ युनिट्सची विक्री केली, जी गेल्या वर्षीच्या तुलनेत २.२२ टक्क्यांनी कमी आहे.

Whats_app_banner