Twitter Vs Threads : ट्विटरची मेटाला कायदेशीर कारवाईची धमकी ! काय आहे नेमकं प्रकरण, क्लिक करा
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Twitter Vs Threads : ट्विटरची मेटाला कायदेशीर कारवाईची धमकी ! काय आहे नेमकं प्रकरण, क्लिक करा

Twitter Vs Threads : ट्विटरची मेटाला कायदेशीर कारवाईची धमकी ! काय आहे नेमकं प्रकरण, क्लिक करा

Updated Jul 07, 2023 12:36 PM IST

Twitter Vs threads : ट्विटरने नव्या थ्रेड प्लॅटफाॅर्मवरुन मेटा प्लॅटफाॅर्मविरोधात कायदेशीर कारवाई करण्याची धमकी दिली आहे. ट्विटरला टक्कर देण्यासाठी मेटाच्या सीईओने मायक्रो ब्लाॅगिंग साईट 'थ्रेड' दाखल केलं आहे.

Twitter Vs Threads HT
Twitter Vs Threads HT

Twitter Vs threads : ट्विटरने नव्या थ्रेड प्लॅटफाॅर्मवरुन मेटाविरोधात कायदेशीर कारवाई करण्याची धमकी दिली आहे. सेमाफोरने गुरुवारी ट्विटरचे वकिल एलेक्स स्पिरोद्वारे फेसबूकचे सीईओ मार्क झुकरबर्गला पाठवलेल्या एका पत्राचा दाखला देत हा अहवाल सादर केला. स्पायरोने पत्रात लिहिले आहे की, ट्विटर आपल्या बौद्धिक संपदा अधिकारांसंदर्भात कडक धोरण आखण्यास कटिबद्ध आहे. त्यामुळे मेटाने कोणत्याही ट्विटर ट्रेड सिक्रेट अथवा अन्य अत्याधिक गोपनीय माहितीचा उपयोग बंद करण्यासाठी तात्काळ पाऊले उचलावीत. दरम्यान, मेटाने अद्याप यावर कोणतेही वक्तव्य केले नाही.

ट्विटरला टक्कर देण्यासाठी थ्रेड लाॅन्च

ट्विटरला टक्कर देण्यासाठी झुकरबर्गने मायक्रो ब्लाॅगिंग साईट थ्रेड अॅप दाखल केले आहे. कारण सोशल मिडिया फर्म इंस्टाग्रामच्या कोट्यवधी यूजर्सचा लाभ घेऊन एलन मस्कच्या ट्विटरला टक्कर देण्याचा झुकरबर्गचा इरादा आहे. थ्रेड लाॅन्च झाल्यानंतर सात तासांच्या आतच भारतासह १०० देशांमध्ये एक कोटी यूजर्स झाले आहेत.

इंस्टावरुन लाॅग इन

यूजर्स थ्रेडवर आपल्या इंस्टाग्राम यूजरनेम आणि फाॅलोवरसहित लाॅग इन करु शकतात. यूजर्स थ्रेडवरुन एक पोस्ट इंस्टाग्राम आणि इंस्टाग्रामवरुन थ्रेडवर पोस्ट शेअर करु शकतात.

प्रायव्हसीवर लक्ष

मेटाने इंस्टाच्या काही प्रायव्हसी कंट्रोलला थ्रेड्सपर्यंत वाढवले आहे. यूजर्स रिप्लायमध्ये विशिष्ट शब्दांमध्ये ब्लाॅक करण्यासाठी फिल्टरचा वापर करु शकतात. थ्रेड्सवर त्याला फाॅलो करु शकतात.

थ्रेड काय आहे ?

हे एक टेक्स्ट बेस्ड कन्वर्सेशन अॅप आहे. याद्वारे यूजर कम्युनिटीज करंट आणि ट्रेंडिंग दोन्ही टाॅपिक्सवर चर्चा करण्यासाठी एकत्र येऊ शकतात. याद्वारे आपल्या आवडत्या क्रिएटर्ससहित कनेक्ट होऊ शकतात. इथे यूजर्स आपल्या आयडिया, मतं आणि क्रिएटिव्हिटीला जगासमोर ठेवू शकतात.

Whats_app_banner