
Twitter income : अमेरिकन अब्जाधीश एलाॅन मस्कने ट्विटरचे नाव बदलून एक्स केले आहे. आता त्याचा लोगोदेखील बदलला आहे. हे बदल करण्यापूर्वी मस्कने सांगितले होते की, एक्स वर पोस्ट करणाऱ्या क्रिएटर्सनाही जाहीरात महसूलातील त्यांचा हिस्सा दिला जाईल. याचाच अर्थ आता क्रिएटर्सची कमाई सुरू होईल. आता अॅड रेव्हेन्यू स्किम अंतर्गत खात्यात पैसे जमा होऊ लागले आहेत.
लाखो भारतीय एक्स इन्फ्लूएंसर्सनी सोशल मिडियावर त्यांना एक्स कडून मिळणाऱ्या जाहीरातीच्या रेव्हेन्यूचा स्क्रीन शाॅर्ट शेअर केला आहे. बाकी यूजर्स या स्क्रीन शाॅटर्समध्ये मिळालेल्या रक्कमेवरून आश्चर्यचकित झाले आहेत, त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत.
झोरोचे को फाऊंडरचे एक्स वर गब्बर नावाने ट्विटर अकाऊंट आहे. त्यांचे १.४ दशलक्ष फाॅलोअर्स आहेत. त्यांच्या स्क्रीनशाॅर्टमध्ये त्यांनी सांगितले की, त्यांना एक्सकडून २.०९ लाख रुपये मिळाले आहेत. त्यांनी एक स्क्रीनशाॅर्टही शेअर केला आहे. ते म्हणाले, ब्लू टिकचे पैसे वसूल ! ट्विटरवर कमाईसाठी यूजर्सचे खाते व्हेरिफाईड असणे गरजेचे आहे. गेल्या तीन महिन्यातील प्रत्येक महिन्यात त्यांच्या पोस्टवर किमान ५ दशलक्ष इंप्रेशन्स असणे गरजेचे आहे.
एक्सवर ब्लू टिक मिळवण्यासाठी त्याच्या सबस्क्रिप्शन सेवेचा लाभ घेण्यासाठी शुल्क भरावे लागते. एकवेळ खात्यावर ब्लू टिक दिसल्यानंतर क्रिएटर्सचा प्रयत्न हा जास्तीत जास्त इम्प्रेशन मिळवण्याकडे असेल. या यूजर्सला क्रिएटर्स अर्निंग डॅशबोर्डमध्ये माहिती दिली आहे. किती टक्के रक्कम दिली जाईल त्याचे अपडेट्स या डॅशबोर्डमध्ये दिले जातील. काही दिवसांपूर्वी एक्सने क्रिएटर्सला बँक खात्याचे डिटेल्स मागितले होते.
एलाॅन मस्कने ट्विटर खरेदी केल्यांनंतर त्यात अनेक प्रकारचे बदल करण्यात आले. याचा थेट परिणाम अॅडव्ह्टायझर्सवरही पडला होता. याशिवाय मेटाकडून नुकतेच थ्रेड अॅप लाँन्च केले. यामुळे एक्सला थेट स्पर्धा निर्माण झाली. रेव्हेन्यू शेअरिंगसह जास्त क्रिएटर्सला आकर्षित करण्यासाठी एक्स यशस्वी होईल आणि अधिकाधिक यूजर्स या प्लॅटफाॅर्मवर पोस्ट शेअर करतील.
संबंधित बातम्या
