TVS Apache RTR 160 4V Features: टीव्हीएस मोटरने अपाची आरटीआर १६० 4V मोटारसायकल अतिरिक्त फीचर्स आणि अधिक अपग्रेडसह लॉन्च केली आहे. ही मोटारसायकल १.४० लाख रुपये (एक्स-शोरूम) किंमतीत लॉन्च करण्यात आली आहे. २०२३ मध्ये लॉन्च करण्यात आलेल्या शेवटच्या अपडेटपेक्षा याची किंमत सुमारे ५ हजार रुपये जास्त आहे. अपाची आरटीआर १६० 4V आता अधिक प्रगत टेक्नोलॉजी, सुधारित कार्यक्षमतेसह बाजारात दाखल झाली आहे. ही बाईक हिरो एक्सट्रीम १६० आर 4V, होंडा सीबी हॉर्नेट २.०, बजाज पल्सर एन १६० आणि या सेगमेंटमधील इतर गाड्यांना टक्कर देते.
टीव्हीएस अपाची आरटीआर १६० 4V मोटारसायकल अनेक नवीन फीचर्स येते, ज्याचा उद्देश राइडचा अनुभव वाढविणे आहे. यामध्ये नवीन टीव्हीएस स्मार्टएक्सॉनेक्ट टीएम तंत्रज्ञानाचा समावेश करण्यात आला आहे, जो आता ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी सक्षम करतो तसेच टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन, कॉल आणि एसएमएस अलर्ट आणि व्हॉईस असिस्ट अशा सुविधा प्रदान करतो. टीव्हीएसने अपाची आरटीआर १६० 4V मध्ये ग्लाइड थ्रू टेक्नॉलॉजी (जीटीटी) देखील जोडली आहे.
टीव्हीएस अपाची आरटीआर १६० 4V मध्ये तीन बाह्य रंगांचे पर्याय उपलब्ध असतील. यामध्ये ग्रॅनाइट ग्रे, मॅट ब्लॅक आणि पर्ल व्हाईट यांचा समावेश आहे. दुचाकी उत्पादक कंपनीने यापूर्वी लाइटनिंग ब्लू हा आणखी एक कलर ऑप्शन सादर केला होता. या बाइकमध्ये स्पोर्टी, रेस-प्रेरित ग्राफिक्स, गोल्डन-फिनिश यूएसडी फोर्क्स आणि रेड अलॉय व्हील्स देखील आहेत.
टीव्हीएस अपाची आरटीआर १६० 4V मोटरसायकलमध्ये 160 सीसी सिंगल सिलिंडर एअर आणि ऑईल कूल्ड इंजिन देण्यात आले आहे, जे ८००० आरपीएमवर १७.३ बीएचपी पॉवर आणि ६,५०० आरपीएमवर १४.८ एनएम पीक टॉर्क जनरेट करू शकते. हे इंजिन ५-स्पीड गिअरबॉक्ससह येते. यात ३७ एमएम यूएसडी फ्रंट सस्पेंशन, टेलिस्कोपिक फ्रंट फोर्क आणि रियरवर मोनोशॉक, ड्युअल चॅनेल एबीएस आणि २४० मिमी रिअर डिस्क देण्यात आली आहे. राइड मोडच्या बाबतीत अपाची आरटीआर १६० 4V मध्ये स्पोर्ट, अर्बन, रेन असे तीन गुण देण्यात आले आहेत.