TVS Radeon Base Edition: दसऱ्यानिमित्त नवीन बाईक खरेदी करण्याचा विचार करत असलेल्या ग्राहकांसाठी सुवर्णसंधी आहे. दरम्यान, सणासुदीच्या काळात आपली विक्री वाढवण्यासाठी टीव्हीएस टीव्हीएस मोटरने आपल्या कम्युटर बाइक रेडियॉनचे सर्वात स्वस्त बेस व्हेरिएंट लॉन्च केले आहे. टीव्हीएस रेडियॉन ११० ऑल-ब्लॅक कलर ऑप्शनसह लॉन्च करण्यात आला. या प्रकाराची कमी किंमत हा त्याचा प्लस पॉईंट आहे. ही बाजारात उपलब्ध असलेल्या हीरो स्प्लेंडरशी स्पर्धा करेल.
टीव्हीएस रेडियॉन मध्ये १०९.७ सीसी एअर-कूल्ड, सिंगल-सिलेंडर इंजिन आहे, जे ८.१९ पीएस पॉवर आणि ८.७ एनएम टॉर्क देते. हे इंजिन ४ स्पीड गिअरबॉक्सने सुसज्ज आहे. बाईकचे इंजिन स्मूथ आहे आणि ते शहरात रायडिंगसाठी अतिशय उत्तम आहे. ब्रेकिंगसाठी बाइकमध्ये ड्रम आणि डिस्क ब्रेकची सुविधा आहे. बाईकच्या सर्व प्रकारांमध्ये १८-इंच अलॉय व्हील आहेत. बाइकमध्ये रंगीत एलसीडी स्क्रीन आणि यूएसबी चार्जिंग पोर्टचा समावेश आहे.
टीव्हीएस रेडियॉन ११० थेट हिरो स्प्लेंडर प्लसशी स्पर्धा असेल. स्प्लेंडर प्लसची किंमत ७४ हजार रुपयांपासून सुरू होते. या बाइकमध्ये १०० सीसी इंजिन आहे, जे ७.९ बीपीएच पॉवर आणि ८.०५ एनएम टॉर्क जनरेट करते. यात ४ स्पीड गिअरबॉक्स देण्यात आले आहेत. या बाइकमध्ये पूर्णपणे डिजिटल स्पीडोमीटर आहे. याशिवाय, यात ब्लूटूथ, कॉल, एसएमएस आणि बॅटरी अलर्टची सुविधा आहे. एवढेच नाही तर यात एक यूएसबी पोर्ट असेल ज्यामुळे ग्राहक आपला फोन रिचार्ज करू शकता.
टीव्हीएसची स्पोर्ट्स बाइक टीव्हीएस अपाची आरटीआर १६० 4V आहे. या टीव्हीएस बाईकची एक्स-शोरूम किंमत १ लाख २६ हजार रुपये आहे. यात १६० सीसी सिंगल-सिलेंडर इंजिन आहे, जे १७.४ बीएचपी पॉवर आणि १४.७३ चा पीक टॉर्क जनरेट करते. या बाईकमध्ये सेगमेंट-फर्स्ट रॅम एअर कूलिंगची फीचर्स आहेत. ऑइल-कूलिंगसह, ही बाईक Fi वर ११४ किमी प्रतितास आणि कार्ब प्रकारात ११३ किमी प्रतितास इतका वेग प्राप्त करण्यास सक्षम आहे.
संबंधित बातम्या