TVS Apache RR 310: टीव्हीएस अपाची आरआर ३१० भारतात लॉन्च, बाइकमध्ये मिळतायेत अनेक अ‍ॅडव्हान्स फीचर्स!
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  TVS Apache RR 310: टीव्हीएस अपाची आरआर ३१० भारतात लॉन्च, बाइकमध्ये मिळतायेत अनेक अ‍ॅडव्हान्स फीचर्स!

TVS Apache RR 310: टीव्हीएस अपाची आरआर ३१० भारतात लॉन्च, बाइकमध्ये मिळतायेत अनेक अ‍ॅडव्हान्स फीचर्स!

Updated Sep 16, 2024 06:58 PM IST

TVS Apache RR 310 Launched: नवी टीव्हीएस अपाचे आरआर ३१० भारतात लॉन्च करण्यात आली आहे. यात अनेक अ‍ॅडव्हान्स फीचर्स देण्यात आले आहेत.

 टीव्हीएस अपाची आरआर ३१० भारतात लॉन्च
टीव्हीएस अपाची आरआर ३१० भारतात लॉन्च (TVS Apache RR 310)

TVS Apache RR 310 Launched In India: टीव्हीएस मोटर कंपनीने नवीन टीव्हीएस अपाची आरआर ३१० लॉन्च केली आहे, जी सुपर प्रीमियम स्पोर्ट्स मोटरसायकल श्रेणीतील सर्वात खास बाईक आहे. ही नवी टीव्हीएस अपाची आरआर ३१० बाईक रेसिंग बाईक आहे. आशिया रोड रेसिंग चॅम्पियन मशीनपासून ही कार तयार करण्यात आली आहे. बाईकमध्ये ड्युअल- डायमेन्शनल क्विकशिफ्टर, आरटीडीएससी, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम, क्रूझ कंट्रोल आणि एरोडायनामिक विंगलेटसह ही बाईक लॉन्च झाली आहे. ही बाईक एरोडायनामिक डिझाइनसह लॉन्च झाली.  टीव्हीएस अपाची आरआर ३१० बाईकमध्ये मिळणाऱ्या फीचर्सबाबत जाणून घेऊयात.

नवीन टीव्हीएस अपाची आरआर ३१० मध्ये दोन व्हेरिएंट आणि ३ बीटीओ पर्याय असतील. रेसिंगवर नियंत्रण ठेवण्यासाठी ही बाईक पूर्णपणे फेअर आणि सुपरस्पोर्ट पद्धतीने डिझाइन करण्यात आली. या बाईकमध्ये स्पोर्ट, अर्बन, रेन असे चार राइडिंग मोड्स देण्यात आले आहेत. नवीन रिव्हर्स झुकलेले डीओएचसी इंजिन आता ९८०० आरपीएमवर ३८ पीएस पॉवर आणि ७९०० आरपीएमवर २९ एनएम कमाल टॉर्क जनरेट करते.

सेगमेंट-फर्स्टमध्ये क्रूझ कंट्रोल, पारदर्शक क्लच कव्हर, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम आणि आरटी-डीएससीसारखे फीचर्स देण्यात आले आहेत. याशिवाय, या बाईकमध्ये अपग्रेडेड व्हर्टिकल ५ इंच टीएफटी रेस कॉम्प्युटर मल्टी रूट कनेक्टिव्हिटी युनिट देण्यात आले आहे.

आरटी-डीएससीला सेगमेंट-फर्स्ट ६ डी आयएमयू मिळतो, जे एक विशेष सुरक्षा पॅकेज आहे. यात कॉर्नरिंग एबीएस, कॉर्नरिंग ट्रॅक्शन कंट्रोल, कॉर्नरिंग क्रूझ कंट्रोल, व्हीली कंट्रोल, स्लोप डिपेंडंट कंट्रोल आणि रिअर लिफ्ट-ऑफ कंट्रोल सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. आयएमयू क्रूझ फंक्शनसह देखील जोडला गेला आहे, जे सेगमेंटमध्ये प्रथमच कॉर्नरिंग क्रूझ कंट्रोल ऑफर करते, जे रायडरला जास्त काळ क्रूझ करण्यास अनुमती देते. यामुळे रायडरला मोटारसायकलचा क्रूझिंग स्पीड अ‍ॅडजस्ट करता येतो.

टीव्हीएस अपाची आरआर ३१० दोन रंगात उपलब्ध

कंपनी सोबत डायनॅमिक किट (१८ हजार रुपये), डायनॅमिक प्रो किट (१६ हजार रुपये), रेस रेप्लिका कलर (७ हजार रुपये) देखील ऑफर करत आहे. नवीन टीव्हीएस अपाचे आरआर ३१० बाईक बॉम्बर ग्रे आणि रेसिंग रेड या दोन रंगांमध्ये उपलब्ध असेल. 

Whats_app_banner