Oneplus 12: १०० वॅट चार्जिंगसह लॉन्च झालेला 'हा' स्मार्टफोन झाला स्वस्त; सेल्फीसाठी मिळतोय ३२ मेगापिक्सल कॅमेरा-triple camera smartphone oneplus 12 price drop ,बिझनेस बातम्या
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Oneplus 12: १०० वॅट चार्जिंगसह लॉन्च झालेला 'हा' स्मार्टफोन झाला स्वस्त; सेल्फीसाठी मिळतोय ३२ मेगापिक्सल कॅमेरा

Oneplus 12: १०० वॅट चार्जिंगसह लॉन्च झालेला 'हा' स्मार्टफोन झाला स्वस्त; सेल्फीसाठी मिळतोय ३२ मेगापिक्सल कॅमेरा

Aug 31, 2024 11:03 PM IST

Oneplus 12 Price Drop: वनप्लस १२ स्मार्टफोनच्या खरेदीवर कंपनी ग्राहकांना तब्बल ७ हजार रुपये वाचवण्याची संधी देत आहे.

नप्लस १२ स्मार्टफोनच्या खरेदीवर मोठी सवलत
नप्लस १२ स्मार्टफोनच्या खरेदीवर मोठी सवलत

Oneplus 12 Price drop: कमी किंमतीत दमदार फीचर्स असलेल्या स्मार्टफोनच्या शोधात असलेल्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे.  कारण कमी किंमतीत जास्त फीचर असलेल्या स्मार्टफोनच्या शोधात असलेल्या ग्राहकांसाठी सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. वनप्लस १२ च्या खरेदीवर कंपनी ग्राहकांना तब्बल ७ हजारांची सूट मिळत आहे. १२ जीबी रॅम आणि १०० वॅट चार्जिंगच्या शोधात असलेल्या ग्राहकांसाठी हा उत्तम पर्याय ठरू शकतो.

कंपनीच्या वेबसाईटवर वनप्लस १२ च्या १२ जीबी + २५६ जीबी व्हेरियंटवर ७ हजार रुपयांच्या सवलतीसह उपलब्ध आहे. या फोनवर इन्स्टंट डिस्काउंट मिळवण्यासाठी ग्राहकांना आयसीआयसीआय बँकेच्या कार्डद्वारे पेमेंट करावा लागेल. कंपनी जिओ प्लस पोस्टपेड प्लानच्या युजर्संना कंपनी २ हजार २५० रुपयांपर्यंतचे बेनिफिट्स देत आहे. फोनमध्ये १०० वॉट चार्जिंग आणि ३२ मेगापिक्सेलसेल्फी कॅमेरासह अनेक उत्तम फीचर्स देण्यात आले आहेत.

वनप्लस १२: डिस्प्ले

या फोनमध्ये ३१६८x१४४० पिक्सल रिझोल्यूशनसह ६.८२ इंचाचा एलटीपीओ प्रो एक्सडीआर डिस्प्ले देत आहे. फोनमध्ये देण्यात आलेला हा डिस्प्ले १२० हर्ट्झच्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. याची पीक ब्राइटनेस लेव्हल ४५०० निट्स आहे. फोनमध्ये १६ जीबी पर्यंत एलपीडीडीआर ५एक्स रॅम आणि ५१२ जीबी यूएफएस ४.० स्टोरेज आहे.

वनप्लस १२: कॅमेरा

फोटोग्राफीसाठी फोनमध्ये एलईडी फ्लॅशसह तीन रियर कॅमेरे आहेत. यात ४८ मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड अँगलसह ५० मेगापिक्सलचा ओआयएस मेन कॅमेरा आणि ६४ मेगापिक्सलचा पेरिस्कोप टेलिफोटो सेन्सर चा समावेश आहे. तर सेल्फीसाठी कंपनी या फोनमध्ये ३२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देत आहे. 

वनप्लस १२: बॅटरी

वनप्लसचा हा फोन ५४०० एमएएच बॅटरीने सुसज्ज आहे. ही बॅटरी १०० वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. ओएसबद्दल बोलायचे झाले तर फोन अँड्रॉइड १४ वर आधारित ऑक्सिजन ओएस १४ वर काम करतो.

वनप्लस १२: कनेक्टिव्हिटी

दमदार आवाजासाठी फोनमध्ये डॉल्बी अॅटमॉसदेखील देण्यात आला आहे. कनेक्टिव्हिटीसाठी तुम्हाला ड्युअल नॅनो सिम, वाय-फाय 7, वाय-फाय 6ई, ब्लूटूथ 5.4, जीपीएस आणि एनएफसी सारखे पर्याय देण्यात आले आहेत. यात तुम्हाला यूएसबी 3.2 जेन 1 आणि अलर्ट स्लाइडर देखील पाहायला मिळेल. मात्र, बायोमेट्रिक सुरक्षेसाठी कंपनी या फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देत आहे.

विभाग