मराठी बातम्या  /  business  /  Toyota Mirai : हायड्रोजनवर चालणारी गडकरींची आवडती कार पाहिली का?, रुपयाला एक किमीचं मायलेज!
Toyota Mirai Hydrogen Car
Toyota Mirai Hydrogen Car (HT)

Toyota Mirai : हायड्रोजनवर चालणारी गडकरींची आवडती कार पाहिली का?, रुपयाला एक किमीचं मायलेज!

14 January 2023, 16:13 ISTAtik Sikandar Shaikh

Toyota Mirai Hydrogen Car : ऑटो एक्स्पोमध्ये टोयोटा कंपनीनं मिराई नावाची कार लॉन्च केली आहे. ही कार हायड्रोजनवर चालणार आहे.

toyota mirai mileage and price in india : टोयोटा कंपनीनं बॅटरी आणि हायड्रोजनवर चालणारी एक नवी कार आणली आहे. एक रुपया प्रतिकिलोमीटर चालणाऱ्या या कारचं केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी अनावरण केलं आहे. टोयोटा मिराई असं या कारचं नाव असून ही कार इंधनावर नाही तर हायड्रोजनवर चालते. नितीन गडकरी दिल्लीत याच कारचा वापर करतात. एकदा चार्ज केल्यानंतर ही कार तब्बल ६४९ किलोमीटरपर्यंत प्रवास करते. याशिवाय प्रतिरुपया एक किलोमीटर असं या कारच्या मायलेजचा खर्च असल्यानं देशातील सामान्य वर्गाला परवडणाऱ्या किंमतीत ही कार बाजारात उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मिराई कारमध्ये विशेष यंत्रणा बसवण्यात आली आहे. हायड्रोजन फ्यूल टँकमधून हायड्रोजन बाहेर येऊन फ्यूल सेलमध्ये जातो. त्यानंतर ऑक्सिजनच्या मदतीने केमिकल रिअॅक्शन होते, परिणामी वीज तयार होऊन हायड्रोजन फ्युएल सेलच्या साहाय्याने निर्माण होणाऱ्या विजेमुळे यामधील मोटारीला ऊर्जा मिळाल्यानंतर मिराई कार धावू लागते. टोयोटा मिराई या कारमध्ये बॅटरीसह हायड्रोजन टँकची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय या कारच्या प्रवासामुळं कोणतंही प्रदूषण होत नाही. पाच मिनिटांमध्ये कारची टाकी फुल्ल करता येत असून ग्रीन हायड्रोजनवर चालणारी ही कारण एका रुपयात एक किलोमीटर प्रवास करते.

मिराई या कारमध्ये ९.२ सेंकदात तब्बल शंभर प्रतितास वेग पकडण्याची क्षमता असल्यानं लांब पल्ल्याचा प्रवास करण्यासाठी ही कार फायदेशीर ठरणार आहे. हायड्रोजनवर चालणाऱ्या या कारमुळं कार्बन उत्सर्जन कमी होणार आहे. कारण या इको-फ्रेंडली वाहनातून पाण्याशिवाय कोणत्याही पदार्थाचं उत्सर्जन होणार नाहीये. त्यामुळं आता भारतासह जगभरात इलेक्ट्रिक वाहनांसह ग्रीन हायड्रोजन वाहनांचीही जोरदार चर्चा सुरू झाली आहे.