IPO News : 'या' आयपीओनं रेकॉर्ड केला! तीन दिवसांत १००० पटीहून जास्त सबस्क्राइब झाला!
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  IPO News : 'या' आयपीओनं रेकॉर्ड केला! तीन दिवसांत १००० पटीहून जास्त सबस्क्राइब झाला!

IPO News : 'या' आयपीओनं रेकॉर्ड केला! तीन दिवसांत १००० पटीहून जास्त सबस्क्राइब झाला!

Dec 12, 2024 06:18 PM IST

Toss The Coin IPO Subscription Status : टॉस द कॉइन कंपनीचा आयपीओ सबस्क्रिप्शनसाठी बंद झाला असून या आयपीओला रेकॉर्डब्रेक प्रतिसाद मिळाला आहे.

IPO News : 'या' आयपीओनं रेकॉर्ड केला! तीन दिवसांत १००० पटीहून जास्त सबस्क्राइब झाला!
IPO News : 'या' आयपीओनं रेकॉर्ड केला! तीन दिवसांत १००० पटीहून जास्त सबस्क्राइब झाला!

Toss The Coin IPO 3rd Day : टॉस द कॉइन या कंपनीच्या आयपीओसाठी अर्ज करण्याचा आज शेवटचा दिवस होता. या आयपीओला तीन दिवसांत तुफान प्रतिसाद मिळाला आहे. Investorgain.com दिलेल्या माहितीनुसार, हा आयपीओ १००६.१३ पट सब्सक्राइब झाला आहे.

टॉस द कॉइन आयपीओसाठी १७२ ते १८२ रुपये प्रति शेअर असा दरपट्टा निश्चित करण्यात आला आहे. किरकोळ गुंतवणूकदारांनी १,६८,००० शेअर्स राखीव होते, मात्र बोली १४.१६ कोटी शेअर्ससाठी लागली. या श्रेणीत आयपीओ ८४३.४१ पट सब्सक्राइब झाला आहे. बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी ९७,८०० शेअर्स राखीव होते, मात्र तिथं २६१.८५ पट सबस्क्रिप्शन आलं आणि तब्बल २.५६ कोटी शेअर्ससाठी बोली लागली. त्याचवेळी, पात्र संस्थात्मक खरेदीदारांचा (QIB) कोटा १०.५९ पट सब्सक्राइब झाला. त्यांच्यासाठी ९५,४०० शेअर्स राखीव होते, मात्र, बोली १०.१० लाख शेअर्ससाठी लागली. एक गुंतवणूकदार किमान ६०० शेअर्ससाठी बोली लावू शकत होता. म्हणजे किमान १,०९,२०० रुपये गुंतवायचे होते. अँकर गुंतवणूकदारांसाठी १,२०० शेअर्सचा लॉट बनवण्यात आला होता. त्यांना २,१८,४०० रुपये मोजावे लागले.

पहिल्याच दिवशी ११० टक्के नफ्याची शक्यता

अनलिस्टेड मार्केटमध्ये या शेअरला प्रचंड मागणी आहे. 'टॉस द कॉइन' आयपीओ ग्रे मार्केटमध्ये १९९ रुपयांच्या प्रीमियमवर उपलब्ध आहे. म्हणजेच कंपनीच्या शेअर्सची संभाव्य लिस्टिंग ३८१ रुपयांवर असेल. म्हणजेच पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना जवळपास ११० टक्के भरघोस नफा मिळू शकतो. कंपनीचे शेअर्स १७ डिसेंबर रोजी बीएसईवर लिस्ट होणार आहेत.

काय करते ही कंपनी?

टॉस द कॉइन ही एक मार्केटिंग कन्सल्टंट कंपनी आहे. ब्रँडिंग, प्रॉडक्ट डेव्हलपमेंट, डिझाइन, वेबसाइट्स, सोशल मीडिया कॅम्पेन, भागीदार / ग्राहक यश व्यवस्थापन आणि विचार-आधारित समस्या-निराकरण कार्यशाळा डिझाइन करण्यापासून सल्लामसलत करण्यापर्यंत कंपनीनं अनेक लहान-मोठ्या तंत्रज्ञान संस्थांबरोबर काम केलं आहे.

 

(डिस्क्लेमर: हे वृत्त केवळ माहितीपर आहे. हिंदुस्तान टाइम्स मराठी कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला देत नाही. त्यामुळं गुंतवणूक करण्याआधी आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा.)

Whats_app_banner