IPO News : 'टॉस द कॉइन' कंपनीच्या आयपीओला गुंतवणूकदारांचा तुफान प्रतिसाद; करते काय ही कंपनी?
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  IPO News : 'टॉस द कॉइन' कंपनीच्या आयपीओला गुंतवणूकदारांचा तुफान प्रतिसाद; करते काय ही कंपनी?

IPO News : 'टॉस द कॉइन' कंपनीच्या आयपीओला गुंतवणूकदारांचा तुफान प्रतिसाद; करते काय ही कंपनी?

Dec 10, 2024 04:13 PM IST

Toss The Coin IPO subscription : टॉस द कॉइन मार्केटिंग कन्सल्टंट कंपनीचा आयपीओ आजपासून खुला झाला असून पहिल्याच दिवशी बाजारात धुमकूळ घातला आहे.

Toss The Coin कंपनीच्या आयपीओला तुफान प्रतिसाद, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांच्या उड्या
Toss The Coin कंपनीच्या आयपीओला तुफान प्रतिसाद, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांच्या उड्या

IPO News in Marathi : टॉस द कॉइन या विपणन सल्लागार कंपनीचा आयपीओ आजपासून गुंतवणुकीसाठी खुला झाला. या आयपीओला पहिल्याच दिवशी मोठा प्रतिसाद मिळाला. आयपीओ खुला झाल्यानंतर पहिल्या काही तासांतच तो ओव्हरसब्सक्राइब झाला. दुपारी १२.५५ वाजेपर्यंत हा आयपीओ ३९.७० पट सब्सक्राइब झाला.

टॉस द कॉइनचा आयपीओ ९.१७ कोटी रुपयांचा असून पूर्णपणे फ्रेश इश्यू आहे. आयपीओसाठी १७२ ते १८२ रुपये प्रति शेअर असा दरपट्टा निश्चित करण्यात आला आहे. आयपीओचा एक लॉट ६०० शेअर्सचा आहे. त्यामुळं किरकोळ गुंतवणुकदारांना एका लॉटसाठी १,०९,२०० रुपये मोजावे लागतील. आयपीओ येण्याआधीच कंपनीनं अँकर गुंतवणूकदारांकडून २.६० कोटी रुपये गोळा केले आहेत. 

आज खुला झालेला हा आयपीओ गुरुवार, १२ डिसेंबर रोजी सब्सक्रिप्शनसाठी बंद होणार आहे. आयपीओचं वाटप शुक्रवार, १३ डिसेंबर २०२४ रोजी अंतिम होण्याची शक्यता आहे. हा आयपीओ मंगळवार, १७ डिसेंबर २०२४ रोजी बीएसई एसएमई प्लॅटफॉर्मवर सूचीबद्ध होण्याची शक्यता आहे.

आतापर्यंतची सबस्क्रिप्शनची स्थिती काय?

टॉस द कॉइनचा आयपीओ किरकोळ गुंतवणुकदार श्रेणीत सर्वाधिक ६८.७७ पट, तर बिगर संस्थात्मक गुंतवणूकदार (NII) श्रेणीत २४.४८ पट सब्सक्राइब झाला आहे. पात्र संस्थात्मक खरेदीदार (क्यूआयबी) कोट्याची सुरुवात काहीशी संथ गतीनं असून आतापर्यंत फक्त ०.०१ पट बोली लागली आहे.

जीएमपी किती?

टॉस द कॉइन आयपीओचा ग्रे मार्केट प्रीमियम किंवा जीएमपी २०० रुपये होता. म्हणजेच, कंपनीचे शेअर्स १८२ रुपयांच्या आयपीओ किमतीपेक्षा २०० रुपये जास्त व्यवहार करीत आहेत. सध्याच्या जीएमपीनुसार टॉस द कॉइन आयपीओचे शेअर्स ३८२ रुपये किंवा ११० टक्के प्रीमियमवर लिस्ट होऊ शकतात.

कुठे वापरला जाणार निधी?

आयपीओद्वारे जमा झालेल्या निधीचा वापर मायक्रोसर्व्हिसेस अ‍ॅप्लिकेशनच्या विकासासाठी आणि नवीन कार्यालये उघडण्यासाठी भांडवली खर्चासाठी करण्याची कंपनीची योजना आहे. याशिवाय वर्किंग कॅपिटलच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि सामान्य कॉर्पोरेट हेतूंसाठी या निधीचा वापर करण्याची कंपनीची योजना आहे.

काय करते ही कंपनी?

टॉस द कॉइन ही एक मार्केटिंग कन्सल्टंट कंपनी आहे. ब्रँडिंग, प्रॉडक्ट डेव्हलपमेंट, डिझाइन, वेबसाइट्स, सोशल मीडिया कॅम्पेन, भागीदार / ग्राहक यश व्यवस्थापन आणि विचार-आधारित समस्या-निराकरण कार्यशाळा डिझाइन करण्यापासून सल्लामसलत करण्यापर्यंत कंपनीनं अनेक लहान-मोठ्या तंत्रज्ञान संस्थांबरोबर काम केलं आहे.

आर्थिक वर्ष २०२४ मध्ये कंपनीचा करोत्तर नफा ३८ टक्क्यांनी घसरून १०९.८५ लाख रुपये झाला आहे. आर्थिक वर्ष २०२३ मध्ये हा आकडा १७८.२९ लाख रुपये होता. दरम्यान, कामकाजातून मिळणारं उत्पन्न ४७८.३५ रुपयांवरून ४८६.१९ लाख रुपयांवर पोहोचलं आहे.

 

(डिस्क्लेमर: हे वृत्त केवळ माहितीपर आहे. हिंदुस्तान टाइम्स मराठी कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला देत नाही. त्यामुळं गुंतवणूक करण्याआधी आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा.)

Whats_app_banner