Top stocks to buy : नव्या आठवड्यात नवे स्टाॅक्स, अशी करा आकडेमोड असा मिळवा बक्कळ परतावा
Top stocks to buy : शेअर बाजारातील चढ उतारांच्या काळातही असे काही स्टाॅक्स आहेत, जे गुंतवणूकदारांना मजबूत परतावा देण्याची क्षमतता ठेवतात. पहा यादी -
Top stocks to buy : बँकिंग संकट आणि इतर कारणांमुळे गेल्या आठवडाभरात जगभरातील बाजारात प्रचंड गोंधळाचे वातावरण होते. मात्र, ब्रोकरेज आणि तज्ज्ञांचे मत आहे की, आजही असे काही शेअर्स आहेत जे आगामी काळात दमदार कामगिरी करू शकतात. या शेअर्सबाबत ब्रोकरेज फर्मने दिलेले रेटिंग आणि लक्ष्य काय आहे. जाणून घेऊया...
ट्रेंडिंग न्यूज
शोभा लिमिटेड
शोभा लिमिटेड ही रिअल इस्टेट डेव्हलपर कंपनी आहे. ती रिअल इस्टेट विभाग आणि करार आणि उत्पादन विभागात योगदान देते. ब्रोकरेजने या शेअरला 'स्ट्राँग बाय' रेटिंग दिले आहे. ही कंपनी आगामी काळात ५७ टक्क्यांपर्यंत वाढू शकते अशी ब्रोकरेज हाऊसेसला अपेक्षा आहे.
एमटीएआर टेक्नाँलाँजीज कंपनी
ही एक प्रिसिशन इंजिनिअरिंगशी निगडित कंपनी आहे. कंपनी अनेक महत्त्वाचे कम्पोनंट्स तयार करते. कंपनी सिव्हिलियन न्युक्लिअर पावर, स्पेस,डिफेन्स, एरोस्पेस यांसारख्या क्षेत्रात सक्रिय आहे. ब्रोकरेजने या शेअरला 'स्ट्राँग बाय' रेटिंग दिले आहे. आगामी काळात या समभागात ४० टक्के वाढ होण्याची शक्यता आहे.
लेमन ट्री हॉटेल्स लिमिटेड
ही हॉटेल चेन कंपनी आहे. कंपनी अपस्केल सेगमेंट आणि मिड मार्केट सेगमेंटमध्ये काम करते. यामध्ये अप्पर-मिडस्केल, मिडस्केल आणि इकॉनॉमी विभागांचा समावेश आहे. कंपनी ऑरिका हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स, लेमन ट्री प्रीमियर, लेमन ट्री हॉटेल्स, रेड फॉक्स हॉटेल्स, कीज प्रिमा, की सिलेक्ट आणि कीज लाइट या ब्रँड नावांद्वारे कार्य करते. ब्रोकरेजच्या मते, आगामी काळात हा शेअर ३७ टक्क्यांपर्यंत वाढू शकतो.
वेदांत फॅशन्स
ही कंपनी भारतातील पुरुष, महिला आणि मुलांसाठी तयार कपडे तयार करते. कंपनी मान्यवर, मोहे, मेबाज, त्वामेव आणि मंथन या ब्रँड नावाने कपडे विकते. येत्या काळात हा स्टॉक १६ टक्क्यांपर्यंत चढू शकतो, असा विश्वास ब्रोकरेजने व्यक्त केला आहे.