Top gainers and Losers today : कोणत्या शेअर्सनी आज खाल्ला सर्वाधिक भाव? कोणाला बसला मोठा फटका? पाहा यादी
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Top gainers and Losers today : कोणत्या शेअर्सनी आज खाल्ला सर्वाधिक भाव? कोणाला बसला मोठा फटका? पाहा यादी

Top gainers and Losers today : कोणत्या शेअर्सनी आज खाल्ला सर्वाधिक भाव? कोणाला बसला मोठा फटका? पाहा यादी

Updated Jul 25, 2024 05:47 PM IST

Top gainers and Losers today 25 July 2024 : शेअर बाजारातील आजचा दिवस निराशाजनक ठरला. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांकात घसरण झाली. पाहूया आजचे टॉप गेनर्स आणि लूजर्स

Top Gainers and Losers today
Top Gainers and Losers today

Top Gainers and Losers today on 25 July, 2024 : गेले काही दिवस वरच्या दिशेनं धावणारा शेअर बाजार अर्थसंकल्पानंतर काहीसा आस्ते कदम चाल करत आहे. आज सेन्सेक्समध्ये १०९ अंकांची घसरण झाली. निफ्टी सुमारे ७ अंकांनी घसरला. 

मिडकॅप इंडेक्सनं आज निफ्टी ५० पेक्षा सुमार कामगिरी केली, तर निफ्टी मिडकॅप ५० सुद्धा घसरणीसह बंद झाला. स्मॉल कॅप शेअर्सची कामगिरी देखील निफ्टीच्या तुलनेत खराब राहिली, तर निफ्टी स्मॉल कॅप १०० इंडेक्स ५०.४५ अंकांनी घसरून बंद झाला.

निफ्टी - टॉप गेनर्स

निफ्टी इंडेक्समधील टाटा मोटर्स (६.१५ टक्के) चे समभाग सर्वाधिक वधारले. त्याशिवाय, ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन (५.०९ टक्के), एसबीआय लाइफ इन्शुरन्स कंपनी (३.८२ टक्के), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन (३.५६ टक्के) आणि सन फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज (२.८६ टक्के) चे शेअर वाढले. 

निफ्टी - टॉप लूजर्स

अ‍ॅक्सिस बँक (५.११ टक्के), नेस्ले इंडिया (२.३९ टक्के), टायटन कंपनी (२.०९ टक्के), आयसीआयसीआय बँक (२.०५ टक्के) आणि टाटा स्टील (१.८२ टक्के) या कंपन्यांचे शेअर्स घसरले.

सेन्सेक्स - टॉप गेनर्स

टाटा मोटर्स (६.१७ टक्के), लार्सन अँड टुब्रो (२.९४ टक्के), सन फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज (२.८१ टक्के), कोटक महिंद्रा बँक (१.६७ टक्के), विप्रो (१.३५ टक्के) या कंपन्यांच्या शेअर्सना आज सर्वाधिक फायदा झाला.

सेन्सेक्स - टॉप लूजर्स

अ‍ॅक्सिस बँक (५.१९ टक्के), नेस्ले इंडिया (२.४९ टक्के), आयसीआयसीआय बँक (२.०२%), टायटन कंपनी (१.९५ टक्के), टाटा स्टील (१.९५%) 

निफ्टी मिडकॅप ५० - टॉप गेनर्स

हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन, पेट्रोनेट एलएनजी, कमिन्स इंडिया, ट्यूब इन्व्हेस्टमेंट ऑफ इंडिया, फेडरल बँक

निफ्टी मिडकॅप ५० - टॉप लूजर्स

एयू स्मॉल फायनान्स बँक, स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया, महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्शिअल, व्होडाफोन आयडिया, एस्कॉर्ट्स कुबोटा

निफ्टी स्मॉल कॅप १०० - टॉप गेनर्स

डेटा पॅटर्न इंडिया, ज्योती लॅब्स, रेमंड, स्वान एनर्जी, मल्टी कमोडिटी एक्स्चेंज ऑफ इंडिया

निफ्टी स्मॉल कॅप १०० - टॉप लूजर्स

इरकॉन इंटरनॅशनल, कोचीन शिपयार्ड, आरबीएल बँक, एनबीसीसी इंडिया, सोनाटा सॉफ्टवेअर

 

स्त्रोत : बीएसई टॉप गेनर्स, बीएसई टॉप लूजर्स, एनएसई टॉप गेनर्स, एनएसई टॉप लूजर्स.

 

(डिस्क्लेमर : वरील वृत्त केवळ माहितीपर आहे. हा कोणत्याही प्रकारचा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणुकीत जोखीम असते. गुंतवणूक करण्याआधी आपल्या आर्थिक सल्लागाराशी चर्चा करूनच निर्णय घ्या.)

Whats_app_banner