NBFC FD Rates : फिक्सड डिपॉझिट (Fixed Deposits) अर्थात मुदत ठेव ही आजही सर्वसामान्यांसाठी भरवशाची गुंतवणूक आहे. गुंतवणुकीचे नवनवे पर्याय उपलब्ध असतानाही एफडीतील गुंतवणूक कमी झालेली नाही. एफडीवरील व्याज बँक आणि वित्तीय संस्थेनुसार बदलत असते. जोखीम घेण्याची क्षमता असल्यास बिगर बँकिंग वित्तीय संस्था (NBFC) उत्तम पर्याय ठरू शकतात. सध्या आघाडीच्या पाच वित्तीय कंपन्या एफडीवर ७ टक्क्यांपेक्षाही अधिक व्याज देत आहेत.
बजाज फिनसर्व्ह
ही कंपनी विशिष्ट कालावधीसाठी म्हणजे १८, २२, ३३ आणि ४४ महिन्यांवर जास्त व्याज दर देते. हा व्याजदर वार्षिक ७.४० टक्के ते ८.२५ टक्के इतका आहे. १८ महिन्यांच्या एफडीवर ७.८ टक्के व्याज मिळते. २२ महिन्यांच्या एफडीवर ७.९ टक्के व्याज मिळते. ३३ महिन्यांच्या एफडीवर व्याजदर ८.१० टक्के आणि ४४ महिन्यांच्या एफडीवर जास्तीत जास्त ८.२५ टक्के व्याज दिले जाते.
कालावधी (महिन्यांमध्ये) | व्याजदर (%) |
१८ | ७.८० |
२२ | ७.९० |
३३ | ८.१० |
४४ | ८.२५ |
(वरील तक्ता विशेष कालावधीच्या एफडीचा संदर्भ देतो)
कालावधी (महिन्यांमध्ये) | व्याजदर (टक्के) |
१२-१४ | ७.४० |
१५-२३ | ७.५० |
२४-३५ | ७.८० |
३६-६० | ८.१० |
(स्त्रोत : bajajfinserv.in; रेग्युलर पीरियड)
मुथूट कॅपिटल
मुथूट कॅपिटल वर्षाला ७.४५ ते ८.५ टक्के व्याज देते. एका वर्षासाठी ही कंपनी ७.४५ टक्के, १५ महिन्यांसाठी ८.५ टक्के, दोन वर्षांसाठी ८ टक्के आणि तीन वर्षांसाठी ८.५ टक्के आणि पाच वर्षांसाठी ७.५ टक्के व्याज देते. (स्त्रोत : muthootcap.com)
श्रीराम फायनान्स
श्रीराम फायनान्स वर्षाला ७.८५ ते ८.८ टक्के व्याज देते. एक वर्षाच्या एफडीवर ही कंपनी ७.८५ टक्के व्याज देते. दोन वर्षांच्या एफडीवर ८.१५ टक्के आणि ३ वर्षांच्या एफडीवर ८.७० टक्के व्याज मिळते. पाच वर्षांच्या मुदत ठेवीवर जास्तीत जास्त ८.८० टक्के व्याज दिलं जातं. (स्त्रोत : shriramfinance.in)
महिंद्रा फायनान्स
महिंद्रा फायनान्स मुदत ठेवींवर ७.७५ ते ८.०५ टक्क्यांपर्यंत व्याज देते. १५ महिन्यांच्या कालावधीसाठी ७.७५ टक्के, ३० महिन्यांसाठी ७.९ टक्के आणि ४२ महिन्यांसाठी ८.०५ टक्के व्याज दिलं जातं.
कालावधी (महिन्यांत) | व्याजदर (टक्के) |
१५ | ७.७५ |
३० | ७.९ |
४२ | ८.०५ |
(स्त्रोत : mahindrafinance.com)
आयसीआयसीआय होम फायनान्स
ही एनबीएफसी ७.२५ ते ७.६५ टक्क्यांपर्यंत व्याज देते. १२ ते २४ महिन्यांच्या मुदत ठेवीवर ७.२५ टक्के व्याज मिळते. २४ ते ३६ महिन्यांच्या कालावधीसाठी त्यापेक्षा किंचित अधिक म्हणजे ७.५५ टक्के व्याज मिळते.
महिने | व्याजदर (टक्के) |
१२-२४ | ७.२५ |
२४-३६ | ७.५५ |
३६-६० | ७.६५ |
६०-७२ | ७.६० |
७२-१२० | ७.५० |
(icicihfc.com; नॉन संचयी ठेवी)
३६ ते ६० महिन्यांच्या मुदतीच्या ठेवींवर व्याजदर ७.६५ टक्के असतो. मात्र, मुदत ठेवीचा कालावाधी ६० महिन्यांच्या पुढं गेल्यावर व्याज कमी होते. ७२ ते १२० महिन्यांच्या मुदतीच्या एफडीवर ७.५० टक्के व्याज दर आहे.
संबंधित बातम्या