Rakshabandhan 2023 : यंदाचं रक्षाबंधन बनवा खास, लाखमोलाच्या भावाला अथवा बहिणीला भेट द्या 'ईव्ही', हे आहेत टाॅप ५ पर्याय
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Rakshabandhan 2023 : यंदाचं रक्षाबंधन बनवा खास, लाखमोलाच्या भावाला अथवा बहिणीला भेट द्या 'ईव्ही', हे आहेत टाॅप ५ पर्याय

Rakshabandhan 2023 : यंदाचं रक्षाबंधन बनवा खास, लाखमोलाच्या भावाला अथवा बहिणीला भेट द्या 'ईव्ही', हे आहेत टाॅप ५ पर्याय

Aug 27, 2023 02:32 PM IST

Rakshabandhan 2023 : यंदाचा रक्षाबंधन तुमच्या बहिणीसाठी अथवा भावासाठी खास बनवण्याची संधी आहे. आयुष्यभर जपलेले तुमच्यातील नाते अधिक मौल्यवान कसे आहे याचे सेलिब्रेशन करण्यासाठी तुम्ही बजेटमध्ये बसेल अशी ईलेक्ट्रिक वेहिकल भेट देऊ शकतात. त्यासाठी कोणते पर्याय आहेत ते इथे चेक करा.

electric vehicles HT
electric vehicles HT

Raksha bandhan 2023 : रक्षाबंधन सणामधून बहीण-भावामधील प्रेमाचे दृढ नाते दिसून येते. पण या परंपरेला आधुनिकतेची जोड देता येऊ शकते. त्यामुळेच बजेटमध्ये बसणारी इलेक्ट्रिक व्हेईकल हा पर्यायही चांगला आहे. त्याअनुषंगाने ईव्ही आणि तिचे तंत्रज्ञान, स्पीड, रंगसंगती याची इत्यंभूत माहिती येथे पाहा.

हिरो इलेक्ट्रिक फोटॉन एलपी

किंमत - ७२,२४० रूपये

हिरो इलेक्ट्रिक फोटॉन भारतात उपलब्‍ध असलेली इलेक्ट्रिक स्‍कूटर आहे. ही स्‍कूटर एका व्‍हेरिएण्‍टमध्‍ये आणि तीन रंगांसह येते. या स्‍कूटरमध्‍ये शक्तिशाली १२०० वॅट मोटर आणि संयोजित ब्रेकिंग सि‍स्‍टमसह फ्रण्‍ट व रिअर ड्रम ब्रेक्‍स आहेत. फोटॉन दोन ड्राइव्‍ह मोड्स: पॉवर व इकॉनॉमी असलेली हाय-स्‍पीड स्‍कूटर आहे. ही स्‍कूटर प्रतितास ४५ किमीची अव्‍वल गती देते. ही स्‍कूटर पूर्ण चार्ज असल्‍यास पॉवर मोडमध्‍ये जवळपास ५० किमीची आणि इकॉनॉमी मोडमध्‍ये प्रभावी ८० किमीची रेंज देते. स्‍कूटरमध्‍ये पॉलिकार्बोनेट हेडलॅम्‍प, फ्रण्ट टेलिस्‍कोपिक सस्‍पेंशन, फ्रण्‍ट डिस्‍क ब्रेक आणि अॅण्‍टी-थेफ्ट अलार्म आहे. या स्‍कूटरसाठी राइडर्सकडे वाहन परवाना आणि नोंदणी असणे आवश्‍यक आहे. फोटॉन ब्‍लॅक, बरगंडी व व्‍हाइट या तीन रंगांमध्‍ये उपलब्‍ध आहे.

ओडीसी रेसर लाइट व्‍ही२

किंमत – ७७,२५० रूपये

इलेक्ट्रिक स्‍कूटर व्‍ही२ मध्‍ये शक्तिशाली व वॉटरप्रूफ मोटर आहे आणि या स्‍कूटरमधील ड्युअल बॅटरी सिस्‍टमसह तुम्‍ही पॉवर कमी होण्‍याची चिंता न करता लांबच्‍या प्रवासाचा आनंद घेऊ शकता. हे मॉडेल दोन व्‍हेरिएण्‍ट्समध्‍ये येते आणि वापरकर्त्‍यांच्‍या विविध गरजांची पूर्तता करण्‍यासाठी यामध्‍ये सुधारित बॅटरी क्षमता आहे. बेस मॉडेलमध्‍ये लिथियम-आयन बॅटरी आहे, जी तीन ते चार तासांमध्‍ये संपूर्ण चार्ज होण्‍याची खात्री देते आणि ७५ किमीची रेंज देते. या स्‍कूटरमध्‍ये एलईडी लाइट्स आणि मोठी बूट स्‍पेस आहे, ज्‍यामुळे तुम्‍ही सुरक्षितपणे व सुलभपणे तुमचे सामान स्‍टोअर करू शकतात. याव्‍यतिरिक्‍त अॅण्‍टी-थेफ्ट लॉक स्‍कूटर वापरात नसताना सुरक्षित असण्‍याची खात्री देते.

इलेक्ट्रिक स्‍कूटर रेसर लाइट व्‍ही२ आरामदायी व विश्‍वसनीय राइड देते. रॅडियण्‍ट रेड, पेस्‍टल पीच, सफायर ब्‍ल्‍यू, मिंट ग्रीन, पर्ल व्‍हाइट व कोर्बान ब्‍लॅक या आकर्षक रंगांमध्‍ये उपलब्‍ध ही स्‍कूटर निश्चितच रस्‍त्‍यावर सर्वांचे लक्ष वेधून घेईल.

कायनेटिक ग्रीन झिंग एचएसएस

किंमत: ८४,९९० रूपये

झिंग एचएसएस ही कायनेटिक ग्रीनची शक्तिशाली इलेक्ट्रिक स्‍कूटर आहे. ही स्‍कूटर प्रतितास ६० किमीची अव्‍वल गती आणि प्रतिचार्ज १२० किमीची रेंज देते. या स्‍कूटरमध्‍ये १.२ केडब्‍ल्‍यू मोटर आणि ६० व्‍होल्‍ट २८ अॅम्पियर ड्युअल बॅटरी आहे. तसेच या स्‍कूटरमध्ये मल्‍टीफंक्‍शनल डॅशबोर्ड, तीन स्‍पीड मोड्स आणि डिटॅचेबल लिथियम-आयन बॅटरी आहे, जी फक्‍त ३ तासांमध्‍ये चार्ज होते. अद्वितीय वैशिष्‍ट्ये आहेत स्‍मार्ट रिमोट कीसह अॅण्‍टी-थेफ्ट, कीलेस एण्‍ट्री व चालता-फिरता यूएसबी चार्जिंग पोर्ट. सुलभ राइडिंगकरिता डिझाइन करण्‍यात आलेल्‍या या स्‍कूटरमध्‍ये हायड्रॉलिक शॉक अॅब्‍जॉबर्स आणि टेलिस्‍कोपिक सस्‍पेंशन आहे.

होप इलेक्ट्रिक लिओ इलेक्ट्रिक स्‍कूटर

किंमत: ८४,३६० रूपये

होप इलेक्ट्रिक लिओ ही प्रगत इलेक्ट्रिक स्‍कूटर भारतात दोन व्‍हेरिएण्‍ट्समध्‍ये उपलब्‍ध आहे: बेसिक (लो स्‍पीड) व स्‍टॅण्‍डर्ड (हाय पॉवर, लो स्‍पीड). या स्‍कूटरमध्‍ये पोटेण्‍ट बीएलडीसी हब इलेक्ट्रिक मोटर आहे. स्‍टॅण्‍डर्ड मॉडेलमध्‍ये २.२ केडब्‍ल्‍यू सर्वोच्‍च मोटर आहे आणि जवळपास १२० किमीची उल्‍लेखनीय रेंज देते. स्‍कूटर फक्‍त २.५ तासांमध्‍ये ० ते ८० टक्‍क्‍यांपर्यंत चार्ज होते. लिओ एलईडी लायटिंग, एलसीडी इन्‍स्‍ट्रूमेंट क्‍लस्‍टर, रिमोट कीलेस इग्निशन, रिजनरेटिव्‍ह ब्रेकिंग आणि चार ड्रायव्हिंग मोड्स अशा वैशिष्‍ट्यांसह इतरांपेक्षा वरचढ ठरते. उल्‍लेखनीय बाब म्‍हणजे या स्‍कूटरमध्‍ये स्‍मार्टफोन कनेक्‍टीव्‍हीटी आहे, ज्‍यमाधून चोरी, स्‍पीडिंग असे अनेक अलर्टस् मिळतात. या स्‍कूटरच्‍या शक्तिशाली डिझाइनमध्‍ये टेलिस्‍कोपिक फोर्क, हायड्रॉलिक रिअर शॉक अॅब्‍जॉर्बर व दोन्‍ही चाकांना डिस्‍क ब्रेक्‍स आहेत, ज्‍यामधून सुरक्षिततेची खात्री मिळते, तसेच संयोजित ब्रेकिंग सिस्‍टम आहे.

ओला एस१ एक्‍स

किंमत - ८९,९९९ रूपये

एस१ एक्‍स मध्‍ये २७०० वॅट मोटरची क्षमता आहे. ही स्‍कूटर २ केडब्‍ल्‍यूएच व्‍हर्जनमध्‍ये प्रतितास ८५ किमीची अव्‍वल गती प्राप्‍त करते. स्‍कूटर तीन व्‍हेरिएण्‍ट्समध्‍ये उपलब्‍ध आहे: २ केडब्‍ल्‍यूएच व्‍हर्जनची किंमत ९०,०१९ रूपये, ३ केडब्‍ल्‍यूएच व्‍हेरिएण्‍टची किंमत ९९,९७९ रूपये असण्‍यासह १५१ किमीची रेंज व प्रतितास ९० किमीची अव्‍वल गती आहे आणि एस१ एक्‍स प्‍लसची किंमत १,०९,८२७ रूपये आहे, जी ३ केडब्‍ल्‍यूएच मॉडेलप्रमाणे कार्यक्षमता देते. सर्व व्‍हेरिएण्‍ट्सच्‍या दोन्‍ही चाकांमध्‍ये संयोजित ब्रेकिंग सिस्‍टम आहे आणि बॅटरी ७.४ तासांमध्‍ये पूर्ण चार्ज होऊ शकते. ७ आकर्षक रंगांमध्‍ये उपलब्‍ध असलेली ही स्‍कूटर स्‍टाइलसह कार्यक्षमतेची खात्री देते.

Whats_app_banner