World Milk Day : भारतातील टाॅप ५ डेअरी ब्रँड्स कुठले माहितीयेत का ? येथे पाहा
World Milk Day : भारत हा जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक देश मानला जातो. जिथे दरवर्षी १४ कोटी टन दुधाचे उत्पादन होते. त्याचबरोबर देशातील काही मोठ्या डेअरी ब्रँड्सनी जागतिक पातळीवर आपले नाव कमावले असून आज कोट्यवधींची उलाढाल केली जाते.
World Milk Day : भारतातील सुमारे ७ कोटी ग्रामीण शेतकरी कुटुंबे दुग्धव्यवसायाशी संबंधित आहेत. भारतातील काही आघाडीच्या कंपन्यांनी जागतिक डेअरी कंपन्यांमध्ये आपले विशेष स्थान निर्माण केले आहे. भारतातील डेअरी मार्केटची वार्षिक उलाढाल ११.३५ लाख कोटी रुपये आहे. देशातील या पाच कंपन्या सोप्या शेती पद्धतीचा वापर करून वर्षाला करोडोंचा महसूल कमावतात.
ट्रेंडिंग न्यूज
अमूल (गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड)
अमूल (गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड) दररोज २६.३ दशलक्ष लिटर दूध खरेदीसह अमूल ही भारतातील सर्वात मोठी दूध उत्पादक कंपनी आहे.मिडिया रिपोर्टनुसार, २०२१-२२ मध्ये अमूलची उलाढाल ६.२ अब्ज अमेरिकन डाॅलर्स (अंदाजे ५० हजार कोटी) होती. २०२२-२०२३ मध्ये त्यात वाढ होऊन ८.८ अब्ज डाॅलर्स ( ७२ हजार कोटी) झाली.
कंपनी देशातील १८ बड्या दूध उत्पादक संघाशी संलग्न आहे आणि ती १८,६०० गावातील दूध सहकारी संस्थांकडून आणि गुजरातच्या ३३ जिल्ह्यांमधून ३.६४ दशलक्ष दूध उत्पादक सभासदांकडून दूध खरेदी करते, अमूल हा भारतातील दुग्धजन्य पदार्थांचा सर्वात मोठा निर्यातदार आहे, ज्याचे २५ वेगवेगळ्या देशांमध्ये वितरण केले जाते. अमूलमध्ये अमूल बटर, अमूल दही, अमूल चीज, अमूल तूप, अमूल शीतपेये आणि इतर अनेक उत्पादनांच्या २६ श्रेणी आहेत.
नंदिनी (कर्नाटक डेअरी डेव्हलपमेंट काॅर्पोरेशन)
कर्नाटक सरकारने १९७४ मध्ये कर्नाटक डेअरी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन अंतर्गत नंदिनी दूध ब्रँडची सुरुवात केली होती. २०२१-२२ मध्ये कंपनीची उलाढाल २.४ अब्ज डाॅलर्स (१९,८०० कोटी) होती. २०२२-२३ मध्ये ती ३ अब्ज डाॅलर्स (२४,५०० कोटी) पर्यंत वाढली आहे. केडीडीसी कंपनी दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचे मार्केटिंग करते. अलीकडील मीडिया रिपोर्ट्सनुसार नंदिनीने २०२२ मध्ये दररोज ७.८ दशलक्ष लिटर दूध खरेदी केले. नंदिनीला २०२१-२२ मध्ये ६०० दशलक्ष डाॅलर्स (रु. 4,900 कोटी) च्या ऑपरेशन्समधून उत्पन्न मिळाले.
मदर डेअरी
१९७४ मध्ये मदर डेअरी ही नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाची (NDDB) पूर्ण मालकी असलेली उपकंपनी आहे. आउटलुक इंडियाच्या मते, मदर डेअरीकडे दररोज ५ दशलक्ष लिटर दुधाची प्रक्रिया करण्याची क्षमता आहे. मदर डेअरी उत्पादने देशभरातील १०० शहरांमध्ये उपलब्ध आहेत. कंपनी दिल्ली, मुंबई, सौराष्ट्र आणि हैदराबाद येथे दररोज ३.२ दशलक्ष लिटर दुधाची विक्री करते. त्याशिवाय कंपनी दुग्धजन्य पदार्थांच्या विस्तृत श्रेणीचे उत्पादन आणि विपणन देखील करते, मदर डेअरीचे दूधाशिवाय,आईस्क्रिम, दही, ताक, श्रीखंड अशी उत्पादने देशभरात प्रसिद्ध आहेत.
दरम्यान, मदर डेअरी भारतभर १,४०० रिटेल स्टोअर्स आणि १,००० अन्य स्टोअर्सद्वारे उत्पादनांचे वितरण करते. २०२१-२२ मध्ये मदर डेअरीची कमाई १.५ अब्ज डाॅलर्स (१२,५०० कोटी रु.) होती.
दूधसागर
१९६३ मध्ये गुजरात येथील मेहसाणा जिल्ह्यात दूधसागर कंपनीची सुरुवात झाली. डेअरी न्यूज इंडियानुसार २०२१-२२ मध्ये दूधसागरचा महसूल ७३७ दशलक्ष डाॅलर्स (६०२८ कोटी रुपये ) होता. २०२१-२२ मध्ये सर्वाधिक ४.५ दशलक्ष लिटर दूध खरेदी झाली. दूधसागरची उत्पादने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत अमूल/सागर/दुधसागर या ब्रँड नावाने विकली जातात.
मिल्मा (केरळ को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन)
पूर्वी केरळ सरकार त्याच्या दुधाच्या गरजेसाठी इतर राज्यांवर अवलंबून होते. त्यावर तोडगा काढण्यासाठी १९८० च्या दशकात केरळ सरकारने केरळ को आॅपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनअंतर्गत मिल्माची सुरुवात केली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मिल्माने २०२१-२२ मध्ये दररोज १.५ दशलक्ष लिटरपेक्षा जास्त दूध खरेदी केले आणि ५२४ दशलक्ष डाॅलर्सची (४३०० कोटी रुपये) कमाई केली. ही कंपनी दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या विस्तृत श्रेणीचे मार्केटिंग करते. मिल्मा आपल्या कमाईतील ८३% शेतकऱ्यांना देते, ज्यामुळे केरळमधील शेतकऱ्यांना प्रति लिटर दुधाचा सर्वाधिक दर मिळतो.
संबंधित बातम्या
विभाग