Mutual Funds : करही वाचवला आणि ५ लाख रुपयेही मिळवले, जाणून घ्या या टाॅप ५ टॅक्स सेव्हर म्चुच्युअल फंडांबद्दल…
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Mutual Funds : करही वाचवला आणि ५ लाख रुपयेही मिळवले, जाणून घ्या या टाॅप ५ टॅक्स सेव्हर म्चुच्युअल फंडांबद्दल…

Mutual Funds : करही वाचवला आणि ५ लाख रुपयेही मिळवले, जाणून घ्या या टाॅप ५ टॅक्स सेव्हर म्चुच्युअल फंडांबद्दल…

Jun 06, 2023 06:32 PM IST

Mutual Funds : दरवर्षी लोक आयकर वाचवण्यासाठी गुंतवणूक करतात. परंतु त्याद्वारे मिळणारा परतावा ७ ते ८ टक्के आहे. परंतु म्युच्युल फंडातील सर्वोत्तम आयकर बचत योजनेने केवळ ३ वर्षांत तिप्पट पैसा वाढवला आहे. जाणून घ्या त्याबद्दल -

Mutual funds HT
Mutual funds HT

Mutual Funds : वास्तविक टॅक्स सेव्हर म्युच्युअल फंड योजनांचा परतावा खूप चांगला आहे. याशिवाय येथे जमा केलेल्या गुंतवणूकीचा तीन वर्षांत परतावा मिळतो. आयकर नियमांनुसार, ८० सी अंतर्गत, १ वर्षात जास्तीत जास्त १.५० लाख रुपये जमा केले जाऊ शकतात. जर कोणी आजपासून ३ वर्षांपूर्वी या टॉप १० टॅक्स सेव्हर म्युच्युअल स्कीममध्ये पैसे गुंतवले असते, तर त्याला खूप चांगला परतावा मिळाला आहे.

टॉप इन्कम टॅक्स सेव्हर फंडानी तीन वर्षांत १.५ लाख रुपयांवरून ५.५ लाख रुपयांपेक्षा कमाई केली आहे. तुम्हाला विश्वास बसत नसेल, तर टॉप १० योजनांचे रिटर्न्स येथे पाहता येतील.

क्वांट टॅक्स प्लॅन म्युच्युअल फंड योजना गेल्या ३ वर्षांपासून खूप चांगला परतावा देत आहे. या योजनेने गेल्या ३ वर्षात दरवर्षी सरासरी ४४.२४% परतावा दिला आहे. हा निधी ३ वर्षात १.५० लाख रुपये ५.५२ लाख रुपये झाला आहे.

बंधन टॅक्स अॅडव्हांटेज म्युच्युअल फंड योजना ३ वर्षापासून खूप चांगला परतावा देत आहे. या योजनेने गेल्या ३ वर्षात दरवर्षी सरासरी ३६.३५% परतावा दिला आहे. हा निधी ३ वर्षात १.५० लाख रुपये ४.३९ लाख रुपये झाला आहे.

पराग पारिख टॅक्स सेव्हर म्युच्युअल फंड योजना गेल्या ३ वर्षांपासून खूप चांगला परतावा देत आहे. या योजनेने गेल्या ३ वर्षात दरवर्षी सरासरी ३०.३५% परतावा दिला आहे. हा निधी ३ वर्षांत १.५० लाख रुपये ३.६९ लाख रुपये झाला आहे.

पीजीआयएम इंडिया ईएलएसएस टॅक्स सेव्हर म्युच्युअल फंड योजना ३ वर्षापासून खूप चांगला परतावा देत आहे. या योजनेने गेल्या ३ वर्षात दरवर्षी सरासरी २९.३८% परतावा दिला आहे. हा निधी ३ वर्षात १.५० लाख रुपये ३.५८ लाख रुपये झाला आहे.

महिंद्रा मनुलाइफ ईएलएसएस म्युच्युअल फंड योजना ३ वर्षापासून खूप चांगला परतावा देत आहे. या योजनेने गेल्या ३ वर्षात दरवर्षी सरासरी २९.१६% परतावा दिला आहे. हा निधी ३ वर्षात १.५० लाख रुपये ३.५६ लाख रुपये झाला आहे.

Whats_app_banner