ITC Demerger : गुंतवणूकदारांनो, लक्ष द्या! डीमर्जरच्या आधी आयटीसीचा शेअर खरेदी करण्याची आज शेवटची संधी
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  ITC Demerger : गुंतवणूकदारांनो, लक्ष द्या! डीमर्जरच्या आधी आयटीसीचा शेअर खरेदी करण्याची आज शेवटची संधी

ITC Demerger : गुंतवणूकदारांनो, लक्ष द्या! डीमर्जरच्या आधी आयटीसीचा शेअर खरेदी करण्याची आज शेवटची संधी

Jan 03, 2025 02:44 PM IST

ITC Demerger News : आयटीसी लिमिटेडमधून आयटीसी हॉटेल्सच्या डीमर्जरची प्रक्रिया सुरू झाली असून डीमर्जरच्या आधी नव्या कंपनीचे शेअर मिळवण्याची आज शेवटची संधी आहे.

ITC Demerger : डीमर्जरच्या आधी आयटीसीचा शेअर खरेदी करण्याची आज शेवटची संधी
ITC Demerger : डीमर्जरच्या आधी आयटीसीचा शेअर खरेदी करण्याची आज शेवटची संधी

Share Market Update : किरकोळ विक्री क्षेत्रातील दिग्गज कंपनी आयटीसी लिमिटेडची डीमर्जरची प्रक्रिया सुरू झाली आहे. आयटीसी लिमिटेड या कंपनीतून आयटीसी हॉटेल्स हा व्यवसाय वेगळा होणार आहे. डीमर्जरसाठी ठरलेल्या सूत्रानुसार, आयटीसीच्या शेअरहोल्डर्सना प्रत्येक १० शेअरमागे आयटीसी हॉटेल्सचा १ शेअर मिळणार आहे. हा शेअर मिळवण्याची आज शेवटची संधी आहे.

इकॉनॉमिक टाईम्सनं दिलेल्या वृत्तानुसार, विभक्तीकरणाची प्रक्रिया आधीच सुरू झाली आहे, परंतु भागधारकांच्या दृष्टीकोनातून आयटीसी हॉटेल्सचे शेअर्स मिळवण्यासाठी आयटीसीचे शेअर्स खरेदी करण्याचा आज, ३ जानेवारी हा शेवटचा दिवस आहे.

डीमर्जर करारानुसार, आयटीसी कंपनी हॉटेल व्यवसायातील ४० टक्के हिस्सा राखून ठेवेल आणि उर्वरित ६० टक्के हिस्सा सध्याच्या आयटीसी भागधारकांमध्ये समान वाटला जाईल.

जिओ फायनान्शिअल रिलायन्स इंडस्ट्रीजपासून (आरआयएल) विभक्त झाल्याच्या प्रक्रियेप्रमाणेच बीएसई आणि एनएसईनं सोमवारी सकाळी शेअरसाठी डमी टिकर तयार केल्यानं आयटीसी हॉटेल्स फेब्रुवारीच्या मध्यापूर्वी सूचीबद्ध होण्याची शक्यता आहे.

सेन्सेक्स आणि निफ्टीवर थेट काही परिणाम होऊ नये म्हणून आयटीसी हॉटेल्सचे समभाग केवळ डमी म्हणून राहतील. येत्या काही आठवड्यांत हा शेअर अधिकृतरित्या सूचीबद्ध होईपर्यंत गुंतवणूकदार आयटीसी हॉटेल्सच्या डमी व्हर्जनमध्ये व्यापार करू शकणार नाहीत. डमी टिकर म्हणून आयटीसी हॉटेल्स हा निफ्टी फिफ्टीमधील ५१ वा आणि सेन्सेक्समधील ३१वा शेअर असेल आणि इंडेक्स वेटेजच्या गणनेत त्याचा समावेश केला जाईल.

आयटीसी हॉटेल्सच्या शेअरची किंमत कशी ठरणार?

आयटीसी हॉटेल्सच्या शेअरची किंमत निश्चित करण्यासाठी बीएसई आणि एनएसई ६ जानेवारी रोजी विशेष प्री-ओपन सेशन आयोजित करणार आहेत. आयटीसी हॉटेल्सच्या शेअरची किंमत ३ जानेवारी रोजी आयटीसीची बंद किंमत आणि विशेष सत्रानंतर सोमवारी निफ्टी शेअरची ओपनिंग प्राइस यातील फरकाच्या आधारे मोजली जाईल.

कितीपर्यंत होऊ शकते लिस्टिंग?

जपानी ब्रोकरेज फर्म नोमुरानं केलेल्या विश्लेषणानुसार, आयटीसी हॉटेल्सच्या शेअर्सची लिस्टिंग २०० ते ३०० रुपयांच्या दरम्यान असू शकते आणि मार्केट कॅप सुमारे ४२,५०० ते ६२,००० कोटी रुपये असू शकते. दुसरीकडं, एसबीआय सिक्युरिटीजच्या मतानुसार, आयटीसी हॉटेल्स लिमिटेडचा शेअर ११३ ते १७० रुपये प्रति शेअर सूचीबद्ध होण्याची शक्यता आहे.

सेंट्रमने आयटीसीवर ५८३ रुपयांचं लक्ष्य ठेवलं आहे, तर एसबीआय सिक्युरिटीजचा अंदाज आहे की विभाजनानंतर आयटीसीचे मध्यम मुदतीचे वाजवी मूल्य ५२५ ते ५५० रुपयांच्या दरम्यान असेल.

 

(डिस्क्लेमर: हे वृत्त केवळ माहितीपर आहे. तज्ज्ञांची मतं, सूचना व शिफारशी त्यांच्या वैयक्तिक आहेत. हिंदुस्तान टाइम्स मराठी कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला देत नाही. त्यामुळं गुंतवणूक करण्याआधी आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा.)

Whats_app_banner