Gold Silver rates 25 November : सोने चांदीच्या किंमतीत होतेय वाढ
केंद्र सरकाने सोने, खनिज तेल आणि रिफाईंड पाम तेलाच्या आधारभूत आयात किंमतीत वाढ केली आहे. त्याचा परिणाम आज सराफा बाजारावर दिसून आला. आज सराफा बाजारात सोने चांदीच्या किंमतींमध्ये वाढ झाली आहे.
Gold Silver rates 25 November : केंद्र सरकाने सोने, खनिज तेल आणि रिफाईंड पाम तेलाच्या बेस इम्पोर्ट प्राईजमध्ये वाढ केली आहे. त्याचा परिणाम आज सराफा बाजारावर दिसून आला. आज सराफा बाजारात सोने चांदीच्या किंमतींमध्ये वाढ झाली आहे. आज सकाळी सोन्याचा दर २२ कॅरेटसाठी अंदाजे ४८७०० रुपये आहे. काल तो अंदाजे ४८४०० रुपये होता. कालच्या तुनलेत त्यात ३०० रुपयांची वाढ झाली आहे. याचप्रमाणे २४ कॅरेटसाठी सोन्याचा दर अंदाजे ५३१२० रुपये प्रति तोळा होता. काल ही किंमत अंदाजे ५२८०० रुपये होती. कालच्या तुलनेत त्यात अंदाजे ३२० रुपयांची वाढ झाली आहे.
ट्रेंडिंग न्यूज
सोन्याप्रमाणे चांदीच्या किंमतीतही वाढ झाली आहे.सराफा बाजारात आज चांदी अंदाजे ६२२०० रुपये प्रति किलो नोंदवण्यात आली आहे. हाच दर काल अंदाजे ६२००० रुपये होता. कालच्या तुलनेत त्यात २०० रुपयांची वाढ झाली आहे.
पहा, देशाच्या विविध कानाकोपऱ्यातील शहरातील सोने चांदीचे दर पुढीलप्रमाणे -
शहर | सोने २२ कॅरेट (रु.प्रति तोळा) | सोने २४ कॅरेट (रु.प्रति तोळा) | चांदीच्या किंमती (रु.प्रति किलो) |
चेन्नई | ४९३१० | ५३७८० | ६८२०० |
मुंबई | ४८५५० | ५२९७० | ६२२०० |
नवी दिल्ली | ४८७०० | ५३१२० | ६२२०० |
कोलकाता | ४८५५० | ५२९७० | ६२२०० |
बंगळूरु | ४८६०० | ५३०२० | ६८२०० |
हैदराबाद | ४८५५० | ५२९७० | ६८२०० |
केरळ | ४८५५० | ५२९७० | ६२२०० |
पुणे | ४८५५० | ५२९७० | ६२२०० |
बडोदा | ४८६०० | ५३०२० | ६२२०० |
संबंधित बातम्या
विभाग