तुमचं Google Drive स्टोरेज फुल्ल झाले आहे का? या टिप्सच्या मदतीनं करा रिकामे
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  तुमचं Google Drive स्टोरेज फुल्ल झाले आहे का? या टिप्सच्या मदतीनं करा रिकामे

तुमचं Google Drive स्टोरेज फुल्ल झाले आहे का? या टिप्सच्या मदतीनं करा रिकामे

Dec 25, 2024 01:43 PM IST

Google Drive Storage : जर तुमचे गुगल किंवा जीमेल स्टोरेज फुल्ल झाले असेल तर आणि तुम्हाला स्टोरेज फुल्लचा मेसेज सारखा येत असेल तर या टिप्सच्या साह्याने तुमचं गुगल अकाऊंट खालील टिप्सच्या मदतीने रिकामे करा.

तुमचं Google Drive स्टोरेज फुल्ल झाले आहे का? या टिप्सच्या मदतीनं करा रिकामे
तुमचं Google Drive स्टोरेज फुल्ल झाले आहे का? या टिप्सच्या मदतीनं करा रिकामे

Google Drive Storage : गुगल ड्राइव्ह स्टोरेज फुल्ल झाल्यामुळे अनेक अडचणींना सामोरे  जावे लागते.  विशेषत: जे नियमितपणे व्हिडिओ, फोटो आणि डॉक्युमेंट्स  यासारख्या मोठ्या फाइल्स ड्राइव्हला सेव्ह करत असतात त्यांच्यासाठी ही समस्या डोकेदुखी ठरू शकते. त्यामुळे जेव्हा गुगल ड्राइव्ह  भरलेला असतो तेव्हा नव्या फाइल्स डाऊनलोड  करणे अशक्य असते. त्यामुळे नव्या  फायली या मोठ्या कालावधीसाठी आपण सेव्ह करू शकत नाही. त्यामुळे आपल्या ईमेल आणि इतर गुगल फीचर वापरण्यात देखील अडचणी येतात. त्यामुळे गुगल ड्राइव्ह नेहमी रिकामे करत राहणे योग्य असते. यसाठी काही टिप्स तुम्हाला फॉलो कराव्या लागतील. या टिप्सची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. 

मोठ्या फाइल्स डिलिट करा 

आपले गुगल ड्राइव्ह स्टोरेज रिकामे  करण्याचा सर्वात फस्त मार्ग  म्हणजे तुम्हाला भविष्यात  आवश्यक नसलेल्या मोठ्या फाइल्स डिलीट करत रहा. यासाठी तुमच्या गुगल ड्राइव्हवर जाऊन माय ड्राइव्हवर क्लिक करा. त्यानंतर, फाइल्सच्या आकारानुसार त्यांचा क्रम लावून लावा. यासाठी  फाइल साईजवर क्लिक करा. गुगल ड्राइव्हच्या वरच्या बाजूला सर्वात मोठ्या फाईल्स तुम्हाला दिसतील. यातील नको असलेल्या मोठ्या फाइल्स तुम्ही सिलेक्ट करून डिलीटवर क्लिक करा.

ट्रॅश रिकामे करा 

जेव्हा तुम्ही गूगलवरून तुम्हाला नको असलेल्या फाइल्स डिलिट करता तेव्हा त्या पूर्णपणे डिलिट होत नाहीत. या फाइल्स ट्रॅशमध्ये किंवा बिनमध्ये जाऊन पडतात.  ड्राईव्हमध्ये डिलिट केलेल्याअ अनेक फाइल्स हा बिनमध्ये पडून राहतात.  त्यामुळे तुमचं गुगल ड्राइव्हचा बिन किंवा ट्रॅश फोल्डर हे  वेळोवेळी रिकामा करत रहा. या साठी गुगल ड्राइव्हवर जा आणि ट्रॅशवर क्लिक करा. त्यानंतर, डिलिटवर वर क्लिक करा.

डुप्लिकेट फाईल्स डिलिट करा 

अनेकवेळा तुम्ही तुमच्या ड्राइव्हमध्ये डुप्लिकेट फाईल्स सेव्ह करता. या फाईल्स विनाकारण बरीच स्पेस  व्यापून टाकतात, त्यामुळे त्या डिलीट करणं खूप गरजेचं असतं. या डुप्लिकेट फाईल्स शोधण्यासाठी आणि डिलीट करण्यासाठी तुम्ही डुप्लिकेट फाईल फाइंडर सारखी साधने वापरू शकता.

जर तुम्ही गुगल फोटो वापरत असाल तर तुमच्याकडे बरेच हाय-रिझोल्यूशन फोटो सेव्ह होऊ शकतात. या फोटोंमुळे  बरीच जागा ही व्यापली जाते. त्यामुळे हे फोटो कॉमप्रेस करण्यासाठी गुगल फोटोसेट करू शकता. असे केल्यास फोटोची गुणवत्ता ही खराब होत नाही. यामुळे ड्राइव्हमधील जागा देखील कमी होते.   जर तुम्हाला तुमच्या गुगल ड्राइव्हमध्ये आणखी स्टोरेजची गरज असेल तर तुम्ही गुगल वनची मेंबरशिप घेऊ शकता. गुगल वन आपल्याला अतिरिक्त स्टोरेज तसेच इतर फायदे प्रदान करते.  हे स्टोरेज तुम्ही तुमच्या कुटुंबातील इतर सदस्यांसोबत देखील शेअर करू शकता.  

Whats_app_banner