Smartphone Screeen Scratch Tips: नवीन स्मार्टफोन घेतल्यावर त्याला सुरक्षित ठेवण्यासाठी आपण अनेक प्रयत्न करत असतो. फोनवर स्क्रॅच पडू नये म्हणून स्क्रीनगार्ड, कव्हर खरेदी करतो. मात्र, कितीही प्रयत्न केले तरीही काही दिवसांनी फोनवर स्क्रॅच पडतात. ज्यामुळे फोनच्या डिस्प्लेच्या गुणवत्तेवरही परिणाम होतो. बाजारात अनेक प्रकारचे स्क्रीन प्रोटेक्टर आणि दुरुस्ती सेवा उपलब्ध आहेत. मात्र, आज आपण अशा टीप्स जाणून घेणार आहोत, ज्यामुळे घरबसल्या स्मार्टफोनवरील स्क्रॅच हटवता येतील.
स्मार्टफोनवरील स्क्रॅच काढून टाकण्यासाठी लागणाऱ्या साहित्यांबाबत जाणून घेऊयात.
१) मऊ मायक्रोफायबर कापड
२) बेबी पावडर
३) टूथपेस्ट (नॉन-जेल)
४) बेकिंग सोडा
५) पाणी
६) लिंबाचा रस
७) ऑलिव्ह ऑइल.
१) मायक्रोफायबर कापड: सर्वप्रथम फोनची स्क्रीन मायक्रोफायबर कापडाने स्वच्छ करा. यामुळे स्क्रीनवरील धूळ आणि घाण दूर होईल.
२) बेबी पावडर: बोटावर थोडी बेबी पावडर घेऊन स्क्रॅच झालेल्या भागावर हलकेच चोळावे. हे असेच काही मिनिटे ठेवा आणि नंतर मायक्रोफायबर कापडाने स्वच्छ करा.
३) टूथपेस्ट: जेल नसलेली टूथपेस्ट घेऊन थोड्या प्रमाणात बोटावर लावा आणि स्क्रॅच झालेल्या भागावर लावा. हलक्या हातांनी गोलाकार गतीने चोळा आणि नंतर पाण्याने धुवा आणि मायक्रोफायबर कापडाने स्वच्छ करा.
४) बेकिंग सोडा आणि पाणी: बेकिंग सोडा आणि पाणी एकत्र करून पेस्ट तयार करा. ही पेस्ट स्क्रॅच झालेल्या भागावर लावा आणि हलक्या हातांनी चोळा. काही मिनिटांनंतर पाण्याने धुवून मायक्रोफायबर कापडाने स्वच्छ करा.
५) लिंबाचा रस आणि ऑलिव्ह ऑईल: लिंबाचा रस आणि ऑलिव्ह ऑईल समप्रमाणात मिसळा. हे मिश्रण एका कापडावर घ्या आणि खचलेल्या भागावर चोळा. काही मिनिटांनंतर पाण्याने धुवून मायक्रोफायबर कापडाने स्वच्छ करा.
स्क्रॅच काढण्यापूर्वी फोन बंद करा. याशिवाय कोणताही घरगुती उपाय वापरण्यापूर्वी एका छोट्या भागावर टेस्ट करा. जास्त दाब लावू नका, यामुळे स्क्रॅच वाढू शकतात. जर स्क्रॅच खोल असेल तर या पद्धती मदत करू शकत नाहीत.