Small cap stock : टायगर लॉजिस्टिक्सच्या शेअरची किंमत बुधवारी १० टक्क्यांच्या वरच्या सर्किटवर पोहोचली. कंपनीच्या शेअरने इंट्राडे मध्ये ६८.४७ रुपयांचा उच्चांक गाठला. शेअर्समधील या तेजीमागे सप्टेंबर तिमाहीचे निकाल आहेत.
चालू आर्थिक वर्षाच्या सप्टेंबर तिमाहीत कंपनीला १३४ टक्के नफा झाला आहे. लॉजिस्टिक्स सोल्यूशन्स प्रोव्हायडर टायगर लॉजिस्टिक्स (इंडिया) ने सप्टेंबर 2024 मध्ये संपलेल्या तिमाहीत ७.५४ कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदविला आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीतील ३.२२ कोटी रुपयांच्या तुलनेत हे प्रमाण १३४ टक्क्यांनी अधिक आहे.
आर्थिक वर्ष 2025 च्या दुसऱ्या तिमाहीत कंपनीचा महसूल १९८.९४ टक्क्यांनी वाढून ५३.५८ कोटी रुपयांवरून १६०.१७ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. या महिन्याच्या सुरुवातीला टायगर लॉजिस्टिक्सने घोषणा केली होती की इन्फोमेरिक्स व्हॅल्युएशन अँड रेटिंग प्रायव्हेट लिमिटेड (आयव्हीआर) ने आपले क्रेडिट रेटिंग कायम ठेवले आहे. कंपनीने सांगितले की, त्याचा दृष्टीकोन 'नकारात्मक' वरून 'स्थिर' करण्यात आला आहे. हे आर्थिक वर्ष 2025 च्या पहिल्या तिमाहीत टायगर लॉजिस्टिक्सच्या आर्थिक कामगिरीत जबरदस्त वाढ दर्शविते.
टायगर लॉजिस्टिक्स स्टॉक हा एक स्मॉलकॅप स्टॉक आहे. या शेअरनं आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. टायगर लॉजिस्टिक्सच्या शेअरची किंमत एका महिन्यात ८ टक्के आणि तीन महिन्यांत ८२ टक्क्यांपेक्षा जास्त वाढली आहे. तर, टायगर लॉजिस्टिक्सच्या शेअरची किंमत एका वर्षात ४६ टक्क्यांपेक्षा जास्त वाढली आहे आणि तीन वर्षांत ३८६ टक्क्यांपेक्षा जास्त मल्टीबॅगर परतावा दिला आहे. शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांकी भाव ८७ रुपये आणि ५२ आठवड्यांचा नीचांकी भाव ३१.९९ रुपये आहे. त्याचे मार्केट कॅप ७१७.७७ कोटी रुपये आहे.
संबंधित बातम्या