२०० मेगापिक्सलचा कॅमेरा, १२० वॅट फास्ट चार्जिंग;'या' ३ स्मार्टफोनची बाजारात चर्चा!
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  २०० मेगापिक्सलचा कॅमेरा, १२० वॅट फास्ट चार्जिंग;'या' ३ स्मार्टफोनची बाजारात चर्चा!

२०० मेगापिक्सलचा कॅमेरा, १२० वॅट फास्ट चार्जिंग;'या' ३ स्मार्टफोनची बाजारात चर्चा!

Nov 02, 2024 11:24 PM IST

200 MP Camera and 120 Watt Fast Charging Smartphones: २०० मेगापिक्सल कॅमेरा आणि सुपरफास्ट चार्जिंगसह ‘हे’ तीन स्मार्टफोन बाजारात उपलब्ध आहेत.

२०० मेगापिक्सलचा कॅमेरा, १२० वॅट फास्ट चार्जिंग;'या' ३ स्मार्टफोनची बाजारात चर्चा!
२०० मेगापिक्सलचा कॅमेरा, १२० वॅट फास्ट चार्जिंग;'या' ३ स्मार्टफोनची बाजारात चर्चा!

Best Smartphones: दमदार कॅमेरा आणि सुपरफास्ट चार्जिंग असलेल्या फोनच्या शोधात असलेल्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय बाजारात असे तीन स्मार्टफोन उपलब्ध आहेत, ज्यात २०० मेगापिक्सलचा कॅमेरा आणि १२० वॅट फास्ट चार्जिंग मिळते.  यात रियलमी, रेडमी आणि आयक्यूओओ या फोनचा समावेश आहे. या तिन्ही फोनमध्ये मिळणाऱ्या फीचर्सबाबत जाणून घेऊयात.

रेडमी नोट १४ प्रो+ 
रेडमी नोट १४ प्रो+ (१२ जीबी रॅम आणि ५१२ जीबी इंटरनल स्टोरेज) हा फोन अ‍ॅमेझॉन इंडियावर ३१ हजार ९९९ रुपयांना उपलब्ध आहे.  रेडमीच्या फोनमध्ये ५००० एमएएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. फोनमध्ये देण्यात आलेली ही बॅटरी १२० वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. या फोनमध्ये १२० हर्ट्झच्या रिफ्रेश रेटसह ६.६७ इंचाचा १.५ के ३डी कर्व्ड एमोलेड डिस्प्ले मिळेल. हा फोन मीडियाटेक डायमेंसिटी ७२०० प्रोसेसरवर काम करतो. फोटोग्राफीसाठी ग्राहकांना या फोनमध्ये एलईडी फ्लॅशसह तीन कॅमेरे मिळतात. यात २०० मेगापिक्सलचा मेन लेन्ससह ८ मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड अँगल लेन्स आणि २ मेगापिक्सलचा मॅक्रो लेन्स देण्यात आला आहे. तर सेल्फीसाठी कंपनी या फोनमध्ये १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देत आहे.

आयक्यूओ निओ९ प्रो 5G 

अ‍ॅमेझॉन इंडियावर ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी इंटरनल स्टोरेज असलेला आयक्यूओ निओ९ प्रो 5G ३६ हजार ९९९ रुपयांना उपलब्ध आहे. आयक्यूओचा हा फोन ५ हजार १६० एमएएच बॅटरीने सुसज्ज आहे. यात तुम्हाला १२० वॅट फ्लॅश चार्जिंग मिळते. कंपनीचा दावा आहे की, हा फोन अवघ्या ११ मिनिटांत ५० टक्क्यांपर्यंत चार्ज होतो. आयक्यूओचा हा फोन स्नॅपड्रॅगन ८ जेन २ प्रोसेसरने सुसज्ज आहे. फोनमध्ये देण्यात येणारा डिस्प्ले ६.७८ इंचाचा आहे, जो १४४ हर्ट्झच्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. या डिस्प्लेची पीक ब्राइटनेस लेव्हल ३००० निट्स आहे. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ५० मेगापिक्सलचा मेन कॅमेरा मिळेल.

रियलमी जीटी ६ टी 5G
अ‍ॅमेझॉन इंडियावर ३२ हजार ९९८ रुपयांना उपलब्ध आहे. ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी इंटरनल स्टोरेज असलेल्या या फोनमध्ये तुम्हाला ५ हजार ५०० एमएएचची बॅटरी मिळेल. ही बॅटरी १२० वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. प्रोसेसर म्हणून कंपनी या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन ७+ जेन ३ चिपसेट ऑफर करत आहे. रियलमीच्या या फोनमध्ये ६.७८ इंचाचा एलटीपीओ कर्व्ड एमोलेड डिस्प्ले मिळत आहे. हा डिस्प्ले ६००० निट्सची पीक ब्राइटनेस लेव्हल आणि १२० हर्ट्झ रिफ्रेश रेटसह येतो. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये तुम्हाला एलईडी फ्लॅशसह ५० मेगापिक्सलचा ड्युअल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. तर, सेल्फीसाठी कंपनी फोनमध्ये ३२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देत आहे. हा फोन अँड्रॉइड १४ वर आधारित रियलमी यूआय ५.० वर काम करतो. 

Whats_app_banner