सेन्सेक्स-निफ्टी रेकॉर्ड : शेअर बाजारात सलग तीन दिवस विक्रमांची रेलचेल आहे. 18 सप्टेंबररोजी सेन्सेक्सने 83326 आणि निफ्टीने 25,482.20 च्या सर्वोच्च शिखरावर पोहोचले होते. १९ रोजी हा विक्रम मोडला गेला. सेन्सेक्स आता 83773.61 आणि निफ्टी 25,611.95 वर पोहोचला आहे. आज हे विक्रमही मोडीत निघाले आहेत. सेन्सेक्स 84159 आणि निफ्टी 25,692.70 वर पोहोचला. वर्ष २०२४ मध्ये क्वचितच एक महिना असा असेल जेव्हा सेन्सेक्स-निफ्टीने इतिहास रचला नसेल. 24 जानेवारीला सेन्सेक्स 72218 वर उघडला आणि 73427 च्या उच्चांकी पातळीवर पोहोचला. मात्र, या महिन्याचा बंद ७१७५२ वर होता. फेब्रुवारीची ओपनिंग 71990 वर होती आणि सेन्सेक्स 73413 वर पोहोचला होता, जो जानेवारीच्या रेकॉर्डपेक्षा थोडा मागे होता.
मार्चमध्ये सेन्सेक्सने 72606 च्या पातळीवरून सुरुवात केली आणि 74245 च्या उच्चांकी पातळीवर पोहोचला. त्यानंतर एप्रिलमध्ये सेन्सेक्सने ७५१२४ चा टप्पा गाठला. मे महिन्यातही बाजारात तेजी कायम होती. सेन्सेक्स या महिन्यात ७६००९ वर पोहोचला.
जूनमध्ये शेअर बाजाराने ७९६७१ चा उच्चांक गाठला होता. जुलैमध्ये ८१९०८ चा आकडाही गाठला. शेअर बाजारातील तेजी ऑगस्टमध्येही कायम होती. सेन्सेक्स 82636 वर पोहोचला. आता सप्टेंबरमध्ये ही रॅली सुरू आहे.
शेअर बाजार सप्टेंबरमध्ये दिवाळी साजरी करत आहे. 2 सप्टेंबररोजी सेन्सेक्सने 82725.28 चा उच्चांक गाठला, त्यानंतर निफ्टीनेही उसळी घेतली. त्यानंतर 12 सप्टेंबररोजी सेन्सेक्स 83116.19 आणि निफ्टी 25,433.35 वर पोहोचला. हे विक्रमही १६ सप्टेंबर रोजी मोडण्यात आले. सेन्सेक्स 83184.34, निफ्टी 25,445.70 वर पोहोचला. 18 तारखेला सेन्सेक्स 83326.38 वर तर निफ्टीने 25,482.20 वर इतिहास रचला. 19 तारखेला सेन्सेक्स 83773.61 आणि निफ्टी 25,611.95 च्या विक्रमी उच्चांकी पातळीवर पोहोचला. आज हे दोन्ही विक्रमही मोडले गेले.