IPO News : गुंतवणुकीसाठी पैसे तयार ठेवा! 'या' आठवड्यात येतायत तब्बल ८ कंपन्यांचे आयपीओ-this week 8 companies ipo going to open check here price band and dates ,बिझनेस बातम्या
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  IPO News : गुंतवणुकीसाठी पैसे तयार ठेवा! 'या' आठवड्यात येतायत तब्बल ८ कंपन्यांचे आयपीओ

IPO News : गुंतवणुकीसाठी पैसे तयार ठेवा! 'या' आठवड्यात येतायत तब्बल ८ कंपन्यांचे आयपीओ

Aug 25, 2024 03:03 PM IST

IPO this week : उद्यापासून सुरू होणाऱ्या नव्या आठवड्यात ८ कंपन्यांचे आयपीओ खुले होणार आहेत. त्यापैकी ५ एसएमई कंपन्या आहेत आणि ३ मुख्य बोर्ड आयपीओ आहेत.

कई कंपनियों के आईपीओ खुलने जा रहे हैं।
कई कंपनियों के आईपीओ खुलने जा रहे हैं।

IPO This Week : आयपीओच्या माध्यमातून शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीची संधी शोधणाऱ्यांसाठी मोठी संधी चालून आली आहे. २६ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या नव्या आठवड्यात तब्बल ८ कंपन्यांचे आयपीओ सबस्क्रिप्शनसाठी खुले होणार आहेत.

जाणून घेऊया कोणत्या कंपन्या बाजारात येतायत…

एसएमई आयपीओ

व्हीडील सिस्टीम एनएसई एसएमई

या कंपनीची इश्यू प्राइस ११२ रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आली आहे. हा आयपीओ २७ ऑगस्ट रोजी खुला होणार आहे. गुंतवणूकदारांना २९ ऑगस्टपर्यंत आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याची संधी असेल. आयपीओचा आकार १,३४,४०० रुपये आहे.

जे बी लॅमिनेशन्स लिमिटेड

हा आयपीओ २७ ऑगस्ट ते २९ ऑगस्ट या कालावधीत सबस्क्रिप्शनसाठी खुला राहणार आहे. आयपीओचा दरपट्टा १३८ ते १४६ रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आला आहे. कंपनीनं १००० शेअरचा एक लॉट बनवला आहे. त्यामुळं गुंतवणूकदारांना किमान १ लाख ४६ हजार रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे. 

पॅरामॅट्रिक्स टेक्नॉलॉजीज

या आयपीओचा आकार ३३.८४ कोटी रुपये आहे. कंपनी इश्यूच्या माध्यमातून २७.५९ लाख नवीन शेअर्स विक्रीस काढणार आहे. हा आयपीओ २७ ऑगस्ट ते २९ ऑगस्ट या कालावधीत खुला राहणार आहे. आयपीओसाठी कंपनीनं ११० रुपये प्रति शेअर दरपट्टा निश्चित केला आहे.

एरॉन कम्पोझिट लिमिटेड

एरॉन कम्पोझिट लिमिटेडचा आयपीओ गुंतवणूकदारांसाठी २८ ऑगस्ट रोजी खुला होईल. कंपनीनं १२१ ते १२५ रुपयांचा प्राइस बँड निश्चित केला आहे. त्यामुळं गुंतवणूकदारांना किमान सव्वा लाख रुपये लावावे लागणार आहेत. आयपीओसाठी कंपनीनं तब्बल १००० शेअर्सचा लॉट बनवला आहे.

अर्चित नुवूड इंडस्ट्रीज

या आयपीओचा आकार १६८.४८ कोटी रुपये आहे. कंपनी आयपीओच्या माध्यमातून ६२.४ लाख नवे शेअर्स विक्रीस काढणार आहे. आयपीओ २८ ऑगस्ट ते ३ सप्टेंबर २०२४ या कालावधीत खुला राहणार आहे. आयपीओचा प्राइस बँड २५७-२७० रुपये प्रति शेअर आहे.

मेन बोर्ड आयपीओ

प्रीमियर एनर्जीज लिमिटेड

या आयपीओचा आकार २८३०.४० कोटी रुपये आहे. कंपनी २.८७ कोटी नवे शेअर्स विक्रीस काढणार आहे. तर ऑफर फॉर सेल अंतर्गत ३.४२ कोटी शेअर्स जारी केले जातील. आयपीओसाठी प्राइस बँड ४२७ ते ४५० रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आला आहे. कंपनीने एकूण ३३ शेअर्सचा लॉट बनवला आहे. 

इको मोबिलिटी आयपीओ

हा आयपीओ गुंतवणूकदारांसाठी २८ ऑगस्ट ते ३० ऑगस्ट दरम्यान खुला असेल. ३१८ ते ३३४ रुपये प्रति शेअर असा प्राइस बँड निश्चित करण्यात आला आहे. कंपनीनं एकूण ४४ शेअर्सचा लॉट तयार केला आहे. 

बाजार स्टाइल रिटेल लिमिटेड

हा आयपीओ ३० ऑगस्ट रोजी गुंतवणूकदारांसाठी खुला होईल. मात्र, या आयपीओची किंमत अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. रेखा राकेश झुनझुनवाला यांची या कंपनीत गुंतवणूक आहे. आयपीओच्या माध्यमातून त्या आपला हिस्सा कमी करत आहेत.

 

(डिस्क्लेमर : हे वृत्त केवळ माहितीपर आहे. हा कोणत्याही प्रकारचा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणुकीत जोखीम असते. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या सल्लागाराचा सल्ला घ्या.)

विभाग