Samsung युजर्सची डोकेदुखी वाढली! लेटेस्ट अपडेटनंतर फोन झाले खराब, अपडेट इन्स्टॉल न करण्याचा दिला सल्ला
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Samsung युजर्सची डोकेदुखी वाढली! लेटेस्ट अपडेटनंतर फोन झाले खराब, अपडेट इन्स्टॉल न करण्याचा दिला सल्ला

Samsung युजर्सची डोकेदुखी वाढली! लेटेस्ट अपडेटनंतर फोन झाले खराब, अपडेट इन्स्टॉल न करण्याचा दिला सल्ला

Jan 02, 2025 09:10 AM IST

Samsung Smartphone : सॅमसंगचा जुना फ्लॅगशिप फोन गॅलेक्सी एस २२ अल्ट्रामध्ये वनयूआय ६.१ अपडेट केल्यावर फोन नीट कम करत नसल्याच्या तक्रारी युजर्सने केल्या आहेत. फोन पुन्हा पुन्हा सुरू होत असून वापरण्याजोगा राहिला नसल्याचे देखील काहींनी म्हटलं आहे.

Samsung युजर्सची डोकेदुखी वाढली! लेटेस्ट अपडेटनंतर फोन झाले खराब, अपडेट इन्स्टॉल न करण्याचा दिला सल्ला
Samsung युजर्सची डोकेदुखी वाढली! लेटेस्ट अपडेटनंतर फोन झाले खराब, अपडेट इन्स्टॉल न करण्याचा दिला सल्ला

Samsung Smartphone Update : दक्षिण कोरियन टेक ब्रँड सॅमसंगने आपल्या नवीन आणि जुन्या डिव्हाइससाठी लेटेस्ट अपडेट्स आणले आहे. ज्यामुळे युजर्सला नव्या फीचर्सचा फायदा मिळू शकेल. या साठी कंपनीने नवे वनयूआय ६.१ अपडेट व्हरजन बाजारात आणले असून हे व्हरजन अपडेट केल्याने गॅलेक्सी एस २२अल्ट्रा फोन वापरणाऱ्या युझर्सची डोकेदुखी वाढली आहे. ही अपडेट केल्यावर त्यांना त्यांचा फोन वापरता येत असून फोन बंद पडल्याच्या तक्रारी त्यांनी केल्या आहेत. जर तुमच्याकडे गॅलेक्सी एस २२ अल्ट्रा हा फोन असेल तर त्याचे नवीन सॉफ्टवेअर अपडेट करणे टाळावे असा सल्ला देखील त्यांनी दिला आहे.

काय आहे प्रकार ?

नवीन अपडेट केल्यावर अनेक एस २२ अल्ट्रा फोन वापरकर्त्यांना त्यांच्या डिव्हाइसमध्ये स्क्रीनवर बिघाड होणे, फोन सतत रिबूट होणे या सारख्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. वनयूआय ६.१ हे नवे सॉफ्टवेअर व्हरजन अपडेट इन्स्टॉल केल्यामुळे अनेक युजर्स त्यांचा फोन वापरू शकत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. सॅमसंग सर्व्हिस सेंटरमध्ये त्यांनी गर्दी केली असून अनेकांनी या बाबत सोशल मीडियावर पोस्ट करून कंपनीकडे नाराजी व्यक्त केली आहे. एवढेच नाही तर ही नवी अपडेट फोनमध्ये इन्सस्टॉल करू नये असे देखील अनेकांनी म्हटलं आहे.

सॅमसंग सर्व्हिस सेंटरमध्ये फोन घेणून जाणाऱ्या युजर्सना ही समस्या सॉफ्टवेअर अपडेटऐवजी डिव्हाइसच्या मदरबोर्डशी संबंधित असू शकते, असे कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे. कंपनीने फोनच्या मदरबोर्डबद्दल तक्रार केली आहे. अनेक युझर्सचा गॅलेक्सी एस २२अल्ट्रा फोन वॉरंटी कालावधीबाहेर गेल्याने त्यांना जास्त पैसे देऊन तो दुरुस्त करावा लागत आहे. नाही तर तो फोन फेकून देण्याची वेळ काहींवर आली आहे.

नवीन अपडेट केल्यावर फोन बूट लूप होणे म्हणजेच फोन वारंवार रिस्टार्ट होत आहे. या समस्येवर अनेक युजर्सनी उपाय शोधला आहे. फोन काही काळ फ्रीजरमध्ये ठेवल्यानंतर ही समस्या दूर होते, असं काही जणांनी म्हटलं आहे. मात्र, फोन वापरत असतांना गरम झाल्यावर पुन्हा तीच समस्या सुरू होत आहे.

जर तुम्ही अद्याप लेटेस्ट सॉफ्टवेअर अपडेट डाऊनलोड केले नसेल आणि फोन नीट काम करत असेल तर नवे सॉफ्टवेअर इन्स्टॉल करणे टाळावे. सॅमसंगने अद्याप याबाबत काहीही विधान केलेल नाही. यावर काही उपाय देखील कंपनीने सुचवला नाही. मात्र, भविष्यातील अपडेट्समध्ये या समस्येवर तोडगा निघणार का ? असा सवाल काही यूझर्सनी उपस्थित केला आहे.

Whats_app_banner