Jio Prepaid Plans: जिओच्या 'या' रिचार्जवर फुकटात मिळतंय डिस्ने+ हॉटस्टारचं सब्सक्रिप्शन!-this reliance jio recharge plan offers free disney hotstar for 84 days ,बिझनेस बातम्या
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Jio Prepaid Plans: जिओच्या 'या' रिचार्जवर फुकटात मिळतंय डिस्ने+ हॉटस्टारचं सब्सक्रिप्शन!

Jio Prepaid Plans: जिओच्या 'या' रिचार्जवर फुकटात मिळतंय डिस्ने+ हॉटस्टारचं सब्सक्रिप्शन!

Sep 23, 2024 06:51 PM IST

reliance jio prepaid plan: जिओच्या प्रीपेड प्लानमध्ये ग्राहकांना दररोज २ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंगसह फुकटात डिस्ने+ हॉटस्टारचे सब्सक्रिप्शन मिळत आहे.

जिओच्या 'या' रिचार्जवर फुकटात मिळतंय डिस्ने+ हॉटस्टारचं सब्सक्रिप्शन!
जिओच्या 'या' रिचार्जवर फुकटात मिळतंय डिस्ने+ हॉटस्टारचं सब्सक्रिप्शन!

Jio Recharge Free Disney Hotstar: भारतातील सर्वात मोठा युजरबेस असलेली टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओकडून असे अनेक प्रीपेड प्लान ऑफर केले जात आहेत, ज्यासह ग्राहकांना ओटीटी सेवांचे कॉम्प्लिमेंटरी सब्सक्रिप्शन मिळते. मात्र, कंपनीकडे असा एकच प्रीपेड प्लान आहे, जो डिस्ने+ हॉटस्टार सब्सक्रिप्शन देतो. या प्लानबद्दल जाणून घेऊयात.

दरम्यान, आवडते व्हिडिओ कंटेंट, वेब सीरिज आणि सिनेमे पाहण्यासाठी युजर्सला ओटीटी अ‍ॅप्स सब्सक्राइब करावे लागते, पण अशा प्लॅनने रिचार्ज का करू नये, ज्यामुळे ओटीटी कॉम्प्लिमेंटरीचा फायदा मिळू शकतो. डिस्ने+ हॉटस्टार जिओच्या १००० रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या प्रीपेड प्लानमध्ये उपलब्ध आहे आणि याची वैधता ८४ दिवसांची आहे.

जिओच्या फ्री डिस्ने+ हॉटस्टार प्लॅनची किंमत ९४९ रुपये असून रिचार्ज केल्यास ८४ दिवसांची दीर्घ वैधता मिळते. या प्लॅनसोबत दररोज २ जीबी डेटा दिला जात असून सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगबेनिफिट्स मिळतात. याशिवाय दररोज १०० एसएमएस पाठवण्याचा पर्याय आहे. या प्लानमध्ये तीन महिन्यांसाठी डिस्ने+ हॉटस्टार मोबाइलचे सब्सक्रिप्शन मिळते. या मोफत ओटीटी प्लॅनसह रिचार्ज केल्यास जिओ टीव्ही, जिओसिनेमा आणि जिओक्लाऊड सारख्या अ‍ॅप्सचा ही अ‍ॅक्सेस मिळतो. मात्र, यात जिओसिनेमा प्रीमियमचे सब्सक्रिप्शन समाविष्ट नाही.

विशेष म्हणजे ९४९ रुपयांच्या प्लानमध्ये अनलिमिटेड ट्रू 5G डेटा मिळतो. म्हणजेच जर तुम्ही पात्र ग्राहक असाल तर तुम्हाला कोणत्याही डेली लिमिटशिवाय अनलिमिटेड 5G डेटाचा फायदा मिळेल. यासाठी जिओची अनलिमिटेड 5G सेवा आपल्या भागात उपलब्ध असावी आणि तुमच्याकडे 5G स्मार्टफोन असणे आवश्यक आहे.

रिलायन्स जिओचा १२९९ रुपयांचा प्लान

जिओचा हा प्लॅन ८४ दिवसांच्या वैधतेसह येतो. प्लानमध्ये कंपनी दररोज २ जीबी डेटा देत आहे. या प्लानमध्ये युजर्संना अनलिमिटेड 5जी डेटा देखील मिळणार आहे. कंपनीच्या या प्लानमध्ये दररोज १०० फ्री एसएमएस आणि अनलिमिटेड कॉलिंगबेनिफिट मिळतो. यामध्ये तुम्हाला नेटफ्लिक्सचा (मोबाइल) फ्री अ‍ॅक्सेस मिळेल. प्लानमध्ये कंपनी जिओ टीव्ही आणि जिओ सिनेमाचा फ्री अ‍ॅक्सेस देखील देते. जिओच्या या प्लानमध्ये तुम्हाला जिओ सिनेमा प्रीमियमचे सब्सक्रिप्शन मिळणार नाही.

व्होडाफोन-आयडियाचा ११९८ रुपयांचा प्लॅन

व्होडाफोन-आयडिया या प्लानमध्ये ७० दिवसांची सर्व्हिस व्हॅलिडिटी देत आहे. व्होडाफोन-आयडियाच्या या प्लानमध्ये इंटरनेट वापरण्यासाठी दररोज २ जीबी डेटा मिळणार आहे. हा प्लान बिंज ऑल नाईट बेनिफिटसह येतो. यामध्ये कंपनी कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय रात्री १२ ते सकाळी ६ वाजेपर्यंत अनलिमिटेड डेटा देत आहे. व्होडाफोन-आयडियाच्या या प्लानमध्ये तुम्हाला दररोज १०० फ्री एसएमएस आणि देशभरातील सर्व नेटवर्कसाठी अनलिमिटेड कॉलिंग देखील मिळणार आहे. प्लानमध्ये कंपनी ७० दिवसांसाठी नेटफ्लिक्स (टीव्ही + मोबाइल) चा फ्री अ‍ॅक्सेस देखील देत आहे. या प्लानमध्ये तुम्हाला वीकेंड डेटा रोलओव्हरसोबत दरमहा २ जीबी बॅकअप डेटा देण्याचा ही फायदा मिळणार आहे.

 

Whats_app_banner