Tata Motors : टाटा मोटर्सची ही ईव्ही ठरली सुपरहीट, चार महिन्यात गाठला १० हजार डिलिव्हरीचा टप्पा
Tata Motors : टाटा मोटर्सची ही ईव्ही ग्राहकांच्या पसंतीस उतरली आहे. गेल्या चार महिन्यात या ईव्हीने १० हजार डिलिव्हरीचा टप्पा पार केला आहे.
Tata Motors : टाटा मोटर्स या भारतातील आघाडीच्या ऑटोमोबाइल उत्पादक कंपनीने आज टियागो ईव्हीसाठी १० हजार डिलिव्हरीचा टप्पा गाठण्याची घोषणा केली, ज्यामुळे ही चार महिन्यांच्या आत हा टप्पा गाठणारी फास्टेस्ट ईव्ही बनली आहे. टियागो ईव्ही ‘फास्टेस्ट बुक्ड ईव्ही इन इंडिया’ बनल्यानंतर त्वरित ही घोषणा करण्यात आली आहे, जेथे फक्त २४ तासांमध्ये १० हजार बुकिंग्जची आणि डिसेंबर २०२२ पर्यंत २० हजार बुकिंग्जची नोंद झाली आहे.
ट्रेंडिंग न्यूज
ईव्ही ड्रायव्हिंग अनुभवाचे अधिक समृद्ध करत टियागो ईव्हीने यशस्वीरित्या ४९१ शहरांमध्ये प्रवेश केला आहे, ज्याअंतर्गत एकूण ११.२ दशलक्ष किमी प्रवास करण्यात आला असून वातावरणात १.६ दशलक्ष ग्रॅम कार्बन डायऑक्साईड उत्सर्जित होण्यास प्रतिबंध झाला आहे. टियागो.ईव्ही प्रिमिअम-नेस, सुरक्षितता व तंत्रज्ञान वैशिष्ट्ये आणि इको-फ्रेण्डली उपस्थिती देणारी सेगमेंट डिस्रप्टर बनण्यासह धमाल इलेक्ट्रिक ट्रेण्डसेटर देखील आहे, जी वापरकर्त्यांना उच्च दर्जाचा ड्रायव्हिंग अनुभव देते.
या उल्लेखनीय प्रवासाबाबत आपले मत व्यक्त करत टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लि.च्या विपणन, विक्री व सेवा धोरणाचे प्रमुख विवेक श्रीवत्स म्हणाले, आम्हाला टियागो.ईव्हीसह गो.ईव्हीला होकार देणाऱ्या १० हजार कुटुंबांच्या माध्यमातून आमचा दृष्टिकोन पूर्ण होताना पाहून आनंद होत आहे. आमच्या ऑफरिंगवरील विश्वास
उत्पादनाला दर महिन्याला मिळणाऱ्या सर्वोत्तम मागणीमधून दिसून येतो, ज्यामधून टियागो.ईव्हीला मिळणारा प्रतिसाद दिसून येतो. आमचे ग्राहक हे आमचे सर्वात मोठे सामर्थ्य आणि आमच्या ईव्ही समुदायाचा आधारस्तंभ आहेत. त्यांचा सातत्यपूर्ण पाठिंबा व विश्वासाने आम्हाला या क्षेत्रात अग्रणी बनवले आहे आणि आम्ही या समुदायाला भविष्यात अधिक प्रबळ करण्यासाठी आमची सर्वोत्तम कामगिरी करत राहण्याचे वचन देतो.’’
टियागो ईव्हींची वैशिष्ट्ये
सुलभ चार्जिंग पर्याय देत टियागो.ईव्ही ४ विभिन्न चार्जिंग सोल्यूशन्ससह येते.
कुठेही, कधीही विनासायास चार्जिंगसाठी १५ अॅम्पियर प्लग पॉइण्ट
प्रमाणित ३.३ केडब्ल्यू एसी चार्जर
७.२ केडब्ल्यू एसी होम फास्ट चार्जर, जो फक्त ३० मिनिटांच्या चार्जिंगमध्ये ३५ किमी अंतरापर्यंत प्रवासाची खात्री देऊ शकतो. तसेच ३ तास ३६ मिनिटांमध्ये वेईकलची संपूर्ण चार्जिंग (१० टक्क्यांपासून १०० टक्क्यांपर्यंत) होऊ शकते.
डीसी फास्ट चार्जिंग, जे फक्त ३० मिनिटांच्या चार्जिंगमध्ये ११० किंमी अंतरापर्यंत प्रवासाची खात्री देऊ शकते आणि फक्त ५७ मिनिटांमध्ये वेईकलला १० टक्के ते ८० टक्क्यांपर्यंत चार्ज करू शकते.
इतर वैशिष्ट्ये
टेलिमॅटिक्स देणारी तिच्या श्रेणीतील पहिली कार असेल. झेडकनेक्ट अॅप ४५ कनेक्टेड कार वैशिष्ट्ये देईल, जसे रिमोट एसी ऑन/ऑफ सह टेम्परेचर सेटिंग, रिमोट जिओ फेन्सिंग व कार लोकेशन ट्रॅकिंग, स्मार्ट वॉच कनेक्टीव्हीटी, रिमोट वेईकल हेल्थ डायग्नोस्टिक्स, रिअल-टाइम चार्ज स्टेटस, डायनॅमिक चार्जर लोकेटर, ड्रायव्हिंग स्टाइल अॅनालिटिक्स व इतर. या वैशिष्ट्यांव्यतिरिक्त ग्राहकांना ८-स्पीकर हर्मन इन्फोटेन्मेंट सिस्टमसह अँड्रॉईड ऑटो व अॅप्पल कार प्ले कनेक्टीव्हीटीचा देखील आनंद घेता येईल.
विभाग