मराठी बातम्या  /  बिझनेस  /  नीट लक्ष ठेवून राहा! नरेंद्र मोदी यांनी विजयाची हॅटट्रिक केल्यास 'हे' शेअर उसळणार

नीट लक्ष ठेवून राहा! नरेंद्र मोदी यांनी विजयाची हॅटट्रिक केल्यास 'हे' शेअर उसळणार

Jun 03, 2024 03:39 PM IST

LS results impact on stock market : एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यास काही शेअरमध्ये तेजीची लाट येण्याची शक्यता आहे.

एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, नरेंद्र मोदी यांनी विजयाची हॅटट्रिक केल्यास 'हे' शेअर उसळणार
एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, नरेंद्र मोदी यांनी विजयाची हॅटट्रिक केल्यास 'हे' शेअर उसळणार

LS results impact on stock market : देशातील आणि देशाबाहेरील प्रत्येक महत्त्वाच्या घटनेचा थेट परिणाम शेअर बाजारावर होत असतो. कधी तो सकारात्मक असतो तर कधी नकारात्मक. नुकतीच संपलेली लोकसभा निवडणूकही त्यास अपवाद नाही. या निवडणुकीचा निकाल मंगळवार, ४ जून रोजी लागणार आहे. एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, पुन्हा एकदा नरेंद्र मोदी सत्तेत येण्याची चिन्हं आहेत. तसं झाल्यास काही शेअरमध्ये बंपर वाढ होण्याची शक्यता आहे.

ट्रेंडिंग न्यूज

भाजपला ३५० च्या पुढं जागा मिळण्याची शक्यता जवळपास सर्वच एक्झिट पोलनी वर्तवली आहे. नरेंद्र मोदी यांचं सरकार स्पष्ट बहुमतासह सत्तेत आल्यास काही शेअरना मोठा फायदा होऊ शकतो, असं ब्रोकरेज कंपन्यांचं म्हणणं आहे. यातील काही शेअरची यादी ब्रोकरेज फर्म्सनी काढून ठेवली आहे. मोदींच्या आधीच्या कार्यकाळात सरकारी धोरणं आणि उपक्रमांचा थेट फायदा झालेल्या कंपन्यांचे शेअर्स यात प्रामुख्यानं आहेत.

ग्लोबल ब्रोकरेज कंपनी सीएलएसएनं अशा ५४ कंपन्यांची यादी केली आहे. या कंपन्या पंतप्रधान मोदींच्या धोरणांच्या थेट लाभार्थी ठरू शकतात.

संरक्षण आणि उत्पादन

एचएएल, हिंदुस्थान कॉपर, नाल्को, भारत इलेक्ट्रॉनिक्स, कमिन्स इंडिया, सिमेन्स, एबीबी इंडिया, सेल, भेल, भारत फोर्ज

इन्फ्रास्ट्रक्चर आणि वाहतूक

इंडस टॉवर्स, जीएमआर विमानतळ, आयआरसीटीसी, कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया

ऊर्जा

एनटीपीसी, एनएचपीसी, पीएफसी, आरईसी, टाटा पॉवर, एचपीसीएल, गेल, जेएसपीएल, पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन, ओएनजीसी, कोल इंडिया, पेट्रोनेट एलएनजी, बीपीसीएल, आयओसीएल

बँकिंग अँड फायनान्स

एसबीआय, पीएनबी, कॅनरा बँक, बँक ऑफ बडोदा

टेलिकॉम

भारती एअरटेल, व्होडाफोन आयडिया, इंडस टॉवर्स

या यादीत अदानी पोर्ट्स, अंबुजा सिमेंट, एसीसी, इंडियन हॉटेल्स, रिलायन्स इंडस्ट्रीज, एल अँड टी, अल्ट्राटेक सिमेंट, श्री सिमेंट, द इंडिया सिमेंट, दालमिया भारत, रामको सिमेंट यांचा समावेश आहे.

येस सिक्युरिटीजनं एनटीपीसी, टेक्समॅको रेल अँड इंजिनीअरिंग (टेक्सरेल), एसबीआय, जीएमआर एअरपोर्ट इन्फ्रास्ट्रक्चर आणि भारती एअरटेलसह अनेक शेअर्स खरेदी करण्यासारखे असल्याचं म्हटलं आहे.

ब्रोकरेज फर्म फिलिप कॅपिटलनं गुंतवणूकदारांना श्रीमंत बनवू शकणाऱ्या २१ शेअर्सची यादी केली आहे. यात एसबीआय, बीओबी, कॅनरा बँक, पीएफसी, आरईसी, श्रीराम फायनान्स, मुथूट फायनान्स, अल्ट्राटेक, सिमेन्स, हीरो मोटोकॉर्प, टीव्हीएस मोटर, डिव्हिस लॅब्स, सिंजीन, एपीएल अपोलो, जिंदाल एसएडब्ल्यू, आयजीएल, आरती इंडस्ट्रीज, विनती ऑर्गेनिक्स, प्राज, गोकलदास एक्सपोर्ट आणि एसपी अपॅरल यांचा समावेश आहे.

 

(डिस्क्लेमर : हे वृत्त केवळ कंपनीची आणि त्याच्या शेअरच्या कामगिरीची माहिती देण्यासाठी आहे. हा कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणुकीत जोखीम असते. त्यामुळं गुंतवणूक करण्याआधी आपल्या व्यक्तिगत सल्लागाराशी चर्चा करूनच निर्णय घ्यावा.)

WhatsApp channel