मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Stocks to buy : आजचा दिवस या ४ कंपन्यांचा, स्टाॅक्स खरेदी करा आणि बक्कळ कमवा !

Stocks to buy : आजचा दिवस या ४ कंपन्यांचा, स्टाॅक्स खरेदी करा आणि बक्कळ कमवा !

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
May 17, 2023 09:28 AM IST

Stocks to buy : ओरिएंट पेपर अँड इंडस्ट्रीज कंपनी ही बाजारपेठेतील अग्रगण्य कागद उत्पादन कंपन्यांपैकी एक आहे. गेल्या एका महिन्यात कंपनीच्या शेअरमध्ये अंदाजे १३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. कंपनीने नुकताच ५२ आठवड्यांचा उच्चांक देखील गाठला आहे.

stocks to buy HT
stocks to buy HT

Stocks to buy : गेल्या महिनाभरात शेअर बाजारातील चार कंपन्यांनी चांगली कामगिरी केल्याचे दिसून आले आहे. या दरम्यान या चार समभागांनी त्यांच्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. चला या सर्वोत्कृष्ट चार स्टॉक्सबद्दल जाणून घेऊया.

डीडीईव्ही प्लास्टिक इंडस्ट्रीज लिमिटेड

गेल्या एका महिन्यात DDEV प्लास्टिक इंडस्ट्रीजच्या स्टॉकमध्ये प्रचंड तेजी आली आहे. गेल्या एका महिन्यात या समभागाने आपल्या गुंतवणूकदारांना ४५% परतावा दिला आहे. या स्टॉकची नवीन ५२-आठवड्यांची उच्च पातळी ही १३७ रुपये शेअर्स आहे. ही कंपनी पॉलिमर कंपाउंडिंग उत्पादक कंपनीसोबत प्लास्टिकच्या वस्तू बनवते. विशेषत: अभियांत्रिकी, ऑटोमोटिव्ह आणि इलेक्ट्रिकल उद्योगांसाठी उत्पादने तयार करते.

टॅनफॅक इंडस्ट्रीज

टॅनफॅक इंडस्ट्रीजच्या शेअरच्या किमतीने गेल्या एका महिन्यात चांगली कामगिरी केली आहे. चांगल्या कामगिरीच्या आधारावर शेअर्सने १८६३.३५ या नवीन ५२ आठवड्यांच्या उच्च पातळीला देखील स्पर्श केला आहे. स्टॉकचा सीएमपी १८६३.३५ रुपये आहे. गेल्या एका महिन्यात, टॅनफॅक इंडस्ट्रीजमध्ये ३७ टक्के वाढ झाली आहे. ही कंपनी सल्फ्यूरिक ऍसिड, एनहायड्रॉस हायड्रोफ्लोरिक ऍसिड, ऑलियम तयार करते.

ओरिएंट पेपर अँड इंडस्ट्री

पेपर आणि पेपर क्राफ्ट बनवणाऱ्या ओरिएंट पेपर अँड इंडस्ट्रीजच्या शेअरची किंमत गेल्या एका महिन्यात सुमारे १३ टक्क्यांनी वाढली आहे. शेअरमध्ये झालेल्या वाढीमुळे गुंतवणूकदारांना मोठा नफा झाला आहे. दुसरीकडे, चांगल्या कामगिरीमुळे, शेअरने ४६.८५ रुपयांच्या नव्या ५२ आठवड्यांच्या उच्चांकालाही स्पर्श केला आहे. शेअरची सध्याचा बाजारभाव ४५.९५ रुपये आहे.

फोसेको इंडिया

फोसेको इंडिया शेअरच्या किमतीने गेल्या एका महिन्यात उत्कृष्ट कामगिरी केली आहे. गेल्या एका महिन्यात फॉस्को इंडियाच्या समभागात सुमारे ८ टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे.. फोसेको इंडियाच्या शेअरने २६८९ रुपयांच्या नव्या उच्चांकी पातळीला स्पर्श केला आहे.

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग