गेल्या ३ महिन्यांपासून रडवणाऱ्या आघाडीच्या डिफेन्स कंपन्यांचे शेअर पुन्हा फॉर्मात-these defence stocks gives huge return stock jumps upto 10 percent ,बिझनेस बातम्या
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  गेल्या ३ महिन्यांपासून रडवणाऱ्या आघाडीच्या डिफेन्स कंपन्यांचे शेअर पुन्हा फॉर्मात

गेल्या ३ महिन्यांपासून रडवणाऱ्या आघाडीच्या डिफेन्स कंपन्यांचे शेअर पुन्हा फॉर्मात

HT Marathi Desk HT Marathi
Sep 21, 2024 09:58 AM IST

डिफेन्स कंपन्यांसाठी शुक्रवारचा दिवस चांगला होता. या दिवशी 3 महिन्यांपासून मंदावलेल्या दिग्गज संरक्षण कंपन्यांचे समभाग नव्याने उडू लागले. कोचीन शिपयार्डच्या समभागांनीही १० टक्क्यांचा उच्चांक गाठला.

 नौदलाकडे आता 750 किमी पर्यंत मारक क्षमता असलेल्या अणुक्षेपणास्त्रांनी सुसज्ज आयएनएस अरिघाट जाणून घ्या सविस्तर
नौदलाकडे आता 750 किमी पर्यंत मारक क्षमता असलेल्या अणुक्षेपणास्त्रांनी सुसज्ज आयएनएस अरिघाट जाणून घ्या सविस्तर

गेल्या काही महिन्यांपासून ढिम्म राहिलेल्या डिफेन्स कंपन्यांचे शेअर्स पुन्हा पळू लागले आहेत. चालू आठवड्याचा शेवटचा दिवस या कंपन्यांसाठी चांगला गेला आहे. या काळात बड्या कंपन्यांच्या समभागांच्या किमती तब्बल १० टक्क्यांनी वाढल्या. पारस डिफेन्स असो वा माझगाव सर्वच शेअर्सच्या किमती वाढल्या आहेत. 

पारस डिफेन्स शेअर्स

आज बीएसईमध्ये कंपनीचा शेअर 1055 रुपयांवर उघडला. कंपनीचा शेअर ६ टक्क्यांनी वधारून १,१२२.०५ रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला. गेल्या 3 महिन्यांत कंपनीच्या शेअर्सच्या किंमतीत 21 टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे. मात्र, वर्षभर शेअर्स ठेवलेल्या गुंतवणूकदारांना अजूनही ५१ टक्के फायदा झाला आहे.

हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड

या डिफेन्स कंपनीचे शेअर्स काल बीएसईवर ४२३३.३५ वर उघडले. शुक्रवारी कंपनीच्या शेअर्सच्या किमतीत ३ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. गेल्या 3 महिन्यांत हा डिफेन्स स्टॉक 18 टक्क्यांनी घसरला होता.

कोचीन शिपयार्ड

काल या डिफेन्स कंपनीच्या शेअर्समध्ये अपर सर्किट पाहायला मिळालं. त्यानंतर बीएसईमध्ये कंपनीच्या शेअर्सची किंमत 1846.55 रुपयांच्या पातळीवर पोहोचली. तीन महिन्यांत कंपनीच्या शेअरची किंमत १७ टक्क्यांनी घसरली आहे.

माझगाव डॉक

या डिफेन्स कंपनीच्या शेअर्सच्या किंमतीत शुक्रवारी 8 टक्क्यांहून अधिक वाढ पाहायला मिळाली आहे. ज्यानंतर कंपनीच्या शेअर्सची किंमत 4420.15 रुपयांच्या पातळीवर पोहोचली. गेल्या 3 महिन्यांत या कंपनीने केवळ 8 टक्के परतावा दिला आहे.

भारत इलेक्ट्रॉनिक्स

या डिफेन्स कंपनीच्या शेअरची किंमत शुक्रवारी 2 टक्क्यांहून अधिक वधारण्यात यशस्वी ठरली. ज्यानंतर बीएसईमध्ये कंपनीच्या शेअर्सची किंमत 279 रुपयांच्या पातळीवर पोहोचली. गेल्या 3 महिन्यांत या डिफेन्स स्टॉकची किंमत 11 टक्क्यांनी तुटली आहे.

 

(हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजार जोखमीच्या अधीन आहे. कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. )

Whats_app_banner