मराठी बातम्या  /  बिझनेस  /  New Year Stocks : २०२४ मध्ये हे दर्जेदार स्टॉक देतील जबरदस्त रिटर्न, एक्सपर्ट्सचा खरेदीचा सल्ला

New Year Stocks : २०२४ मध्ये हे दर्जेदार स्टॉक देतील जबरदस्त रिटर्न, एक्सपर्ट्सचा खरेदीचा सल्ला

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Jan 02, 2024 11:37 AM IST

Best Stocks for 2024 : आयसीआयसीआय डायरेक्ट या ब्रोकरेज फर्मनं नव्या वर्षात मजबूत रिर्टन देऊ शकणारे काही स्टॉक्स सुचवले आहेत.

Best Quality Stocks In 2024
Best Quality Stocks In 2024

Best Quality Stocks in 2024 : शेअर बाजारासाठी २०२३ हे वर्ष खूपच सकारात्मक ठरले. परकीय गुंतवणुकीचा वाढता ओघ, स्थिर सरकार हे सगळं पाहता नव्या वर्षातही बाजारातील तेजी कायम राहण्याची चिन्हं आहेत. २०२४ च्या अखेरपर्यंंत बाजारात आणखी १५ टक्क्यांची वाढ होईल अशी अपेक्षा तज्ज्ञांना आहे. अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांची परीक्षा असेल.

नव्या वर्षातही तेजी राहणार असल्याचा अंदाज असल्यामुळं छोटे-मोठे गुंतवणूकदार वेगवेगळ्या शेअरमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करू शकतात. अशा गुंतवणूकदारांना मार्गदर्शन म्हणून ब्रोकरेज फर्म ICICIDirect नं २०२४ साठी पाच दर्जेदार स्टॉक सुचवले आहेत. हे शेअर ३० टक्क्यांपर्यंत वधारू शकतात. तांत्रिक आणि मूलभूत घटकांच्या आधारे हे स्टॉक्स निवडण्यात आले आहेत. 

Stock Market News : येस बँकेचे शेअर खरेदी करण्यासाठी नुसती झुंबड, असं झालं काय?

उग्रो कॅपिटल

छोट्या उद्योगांना कर्जपुरवठा करणाऱ्या कंपनीच्या शेअरची सध्याची किंमत २७३ च्या आसपास आहे. हा शेअर पुढील काळात ३५० पर्यंत जाऊ शकतो, असा विश्वास आयसीआयसीआय डायरेक्टनं व्यक्त केला आहे. कॅश फ्लोवर आधारित कर्जावर केंद्रित केलेलं लक्ष्य आणि इन-हाऊस कलेक्शनचं उत्तम नियोजन यामुळं कंपनीची मालमत्तेची बाजू मजबूत दिसते. हा शेअर खरेदी करण्याचा सल्ला ब्रोकरेजनं दिला आहे.

एसबीआय कार्ड

क्रेडिट कार्ड देणार्‍या कंपन्यांचं मार्जिन आर्थिक वर्ष २०२४ मध्ये काही प्रमाणात घसरेल. मात्र, नजिकच्या काळात ते मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. डिजिटल चॅनेलच्या वापरामुळं कंपनीचा ग्राहक बेस वाढवण्यावरील खर्चही कमी झाला आहे. सध्या या कंपनीचा शेअर ७६५ रुपयांच्या आसपास आहे. ९५० चं टार्गेट ठेवून तो खरेदी करता येईल.

IPO Explainer : आयपीओ म्हणजे काय? जाणून घ्या स्टॉक मार्केटमधील गुंतवणुकीचा भन्नाट पर्याय

एनएमडीसी (NMDC)

२०१४ ते २०२१ या सात वर्षांच्या कालावधीत एनएमडीसी कंपनीचं उत्पादन ३०-३५ मेट्रिक टनाच्या दरम्यान राहिल. नव्या आर्थिक वर्षात ते ४६ मेट्रिक टन आणि २०२५ पर्यंत ५० मेट्रिक टनापर्यंत जाईल, अशी शक्यता आहे.

एनएमडीसी कंपनी भारतात व परदेशातही बॉक्साईट, सोने, हिरा, लिथियम अशा खनिजांचा शोध घेत आहे. लिथियमच्या ५.९ मेट्रिक टनासह २० खाणींचा लिलाव लवकरच होणार असून त्याचा फायदा कंपनीला मिळणार आहे. त्यामुळं २५० रुपयांचा टार्गेट ठेवून हा शेअर खरेदी करता येईल.

युनो मिंडा (UNO Minda)

उद्योग वाढीचा ट्रॅक रेकॉर्ड, ईव्हीशी संबंधित मजबूत ऑर्डर बुकमुळं आयसीआयसीआय डायरेक्टनं युनो मिंडावर विश्वास व्यक्त केला आहे. ८१० रुपयांचं टार्गेट ठेवून खरेदीचा सल्ला देण्यात आला आहे.

ग्रीनप्लाय इंडस्ट्रीज (Greenply Industries)

नव्या आर्थिक वर्षात प्लायवूडच्या व्हॉल्यूममध्ये ८ ते १० टक्के वाढ अपेक्षित आहे. आयसीआयसीआय डायरेक्टला कंपनीकडून महसुली वाढीची अपेक्षा आहे. त्यामुळंच २९५ रुपयांच्या टार्गेटसह हा शेअर खरेदी करण्याचा सल्ला ब्रोकरेजनं दिला आहे. सध्या या शेअरची किंमत २३६ रुपयांच्या आसपास आहे.

 

(डिस्क्लेमर : वरील वृत्तात कंपनीच्या व शेअरच्या कामगिरीची केवळ माहिती देण्यात आली आहे. हा कोणत्याही प्रकारचा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणुकीत जोखीम असते. गुंतवणूक करताना संबंधितांनी आपल्या आर्थिक सल्लागाराशी चर्चा करून निर्णय घ्यावा.)

WhatsApp channel