New Smartphones : नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय स्मार्टफोन बाजारात गेल्या आठवड्यात प्रीमियम फोनपासून फीचर फोनपर्यंत अनेक नवे स्मार्टफोन लॉन्च करण्यात आले आहेत. या यादीत आयफोन, सॅमसंग, विवो आणि एचएमडी सारख्या ब्रँडचा समावेश आहे. या यादीतील सर्वात स्वस्त फोन एचएमडी १०५ 4G हा फीचर फोन आहे, ज्याची किंमत फक्त २ हजार १९९ रुपये आहे.
अॅपलने आयफोन १६ सीरिज भारतासह इतर मार्केटमध्ये लॉन्च केली आहे. या सीरिजमध्ये आयफोन १६, आयफोन १६ प्लस, आयफोन १६ प्रो आणि आयफोन १६ प्रो मॅक्स या चार मॉडेल्सचा समावेश आहे. भारतात आयफोनची सुरुवातीची किंमत ७९ हजार ९०० रुपये, आयफोन १६ प्लसची सुरुवातीची किंमत ८९ हजार ९०० रुपये, आयफोन १६ प्रोची सुरुवातीची किंमत १ लाख १९ हजार ९०० रुपये आणि आयफोन १६ प्रो मॅक्सची सुरुवातीची किंमत १ लाख ४४ हजार रुपये आहे.
सॅमसंगने गॅलेक्सी एम ०५ हा स्वस्त फोन भारतात लॉन्च केला आहे. ४ जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज व्हेरियंटची किंमत ७ हजार ९९९ रुपये आहे. फोनमध्ये ६.७४ इंचाचा एचडी प्लस एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनमध्ये मीडियाटेक हेलियो जी८५ प्रोसेसर देण्यात आला आहे. सेल्फीसाठी यात ५० मेगापिक्सलचा ड्युअल रिअर कॅमेरा आणि ८ मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये २५ वॅट फास्ट चार्जिंगसह ५००० एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.
विवोचा फोन हेवी रॅम, कर्व्ड एमोलेड डिस्प्ले आणि दमदार कॅमेरासह येतो. फोनच्या ८ जीबी रॅम + १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ३१ हजार ९९९ रुपये आहे. तर, ८ जीबी रॅम + २५६ जीबी स्टोरेज असलेल्य स्मार्टफोनची किंमत ३३ हजार ९९९ रुपये आहे आणि १२ जीबी रॅम + २५६ जीबी स्टोरेजची किंमत ३५ हजार ९९९ रुपये आहे. फोनवर ३००० रुपयांची बँक ऑफर देखील आहे. फोनमध्ये ६.७८ इंचाचा १.५ के कर्व्ड एमोलेड डिस्प्ले आहे, जो १२० हर्ट्झ रिफ्रेश रेटसह येतो. फोनमध्ये मीडियाटेक डायमेंसिटी ९२००+ प्रोसेसर आहे. फोनमध्ये ऑरा फ्लॅश लाइटसह ५० मेगापिक्सलचा ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये ५० मेगापिक्सलचा लेन्स देण्यात आला आहे. फोनमध्ये ८० वॅट वायर्ड चार्जिंग सपोर्टसह ५ हजार ५०० एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.
टेक्नोने हा परवडणारा 5G फोन म्हणून लॉन्च केला आहे. याच्या ६ जीबी रॅम + १२८ जीबी स्टोरेजची किंमत १३ हजार ९९९ रुपये आणि ८ जीबी रॅम + २५६ जीबी स्टोरेजची किंमत १४ हजार ९९९ रुपये आहे. फोनमध्ये ६.६७ इंचाचा एचडी प्लस आयपीएस एलसीडी डिस्प्ले आहे, जो १२० हर्ट्झ रिफ्रेश रेटसोबत येतो. हा फोन मीडियाटेक डायमेंसिटी ६३०० चिपसेटसह येतो. फोनमध्ये १०८ मेगापिक्सलचा मुख्य रिअर कॅमेरा आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये ८ मेगापिक्सलचा सेन्सर देण्यात आला आहे. फोनमध्ये १८ वॅट चार्जिंग सपोर्टसह ५००० एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.
रिअलमी पी २ प्रो 5G च्या ८ जीबी रॅम + १२८ जीबी व्हेरिएंटची किंमत २१ हजार ९९९ रुपये आहे. तर, १२ जीबी रॅम + २५६ जीबी स्टोरेजची किंमत २४ हजार ९९९ रुपये आणि १२ जीबी रॅम + ५१२ जीबी व्हेरिएंटची किंमत २७ हजार ९९९ रुपये आहे. फोनची अर्ली बर्ड सेल १७ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ६ वाजता सुरू होईल. फोनमध्ये ६.७ इंचाचा फुल एचडी प्लस 3डी कर्व्ड एमोलेड डिस्प्ले आहे, जो 120 हर्ट्झ रिफ्रेश रेटसह येतो. फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 7 एस जेन 2 प्रोसेसर आहे. फोनमध्ये ५० मेगापिक्सलचा ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप आणि सेल्फीसाठी ३२ मेगापिक्सलचा सेन्सर उपलब्ध आहे. फोनमध्ये ८० वॉट वायर्ड सुपरव्हीओसी चार्जिंग सपोर्टसह ५२०० एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.