ipo news : गुंतवणुकीची मोठी संधी! एका आठवड्यात तब्बल ११ आयपीओ, कोणत्या आहेत या कंपन्या?
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  ipo news : गुंतवणुकीची मोठी संधी! एका आठवड्यात तब्बल ११ आयपीओ, कोणत्या आहेत या कंपन्या?

ipo news : गुंतवणुकीची मोठी संधी! एका आठवड्यात तब्बल ११ आयपीओ, कोणत्या आहेत या कंपन्या?

Jun 17, 2024 04:19 PM IST

IPO News Updates : भांडवल उभारणीसाठी प्रयत्नशील असलेल्या तब्बल ११ कंपन्या आयपीओ घेऊन येत आहेत. त्यामुळं या आठवड्यात गुंतवणुकीची मोठी संधी उपलब्ध होणार आहे.

गुंतवणुकीची मोठी संधी! एका आठवड्यात तब्बल ११ आयपीओ, कोणत्या आहेत या कंपन्या?
गुंतवणुकीची मोठी संधी! एका आठवड्यात तब्बल ११ आयपीओ, कोणत्या आहेत या कंपन्या?

IPO news updates : आयपीओच्या माध्यमातून शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी उत्सुक असलेल्या गुंतवणूकदारांसाठी चालू आठवड्यात मोठी संधी चालून आली आहे. या आठवड्यात तब्बल ११ कंपन्यांचे आयपीओ गुंतवणुकीसाठी उपलब्ध होत आहेत. त्यातील काही कंपन्यांचे आयपीओ आधीच खुल झाले आहेत. पुढच्या पाच दिवसांत आणखी काही कंपन्यांचे आयपीओ येतील.

जाणून घेऊया या आठवड्यात गुंतवणुकीसाठी उपलब्ध होत असलेल्या आयपीओंबद्दल…

जीपीईएस सोलर (GPES Solar)

या कंपनीचा आयपीओ १४ जून रोजी खुला झाला असून १९ जून पर्यंत सबस्क्राइब करता येणार आहे. आयपीओचा दरपट्टा ९० ते ९४ रुपये प्रति शेअर आहे. लॉट साइज १२०० शेअर्स इतकी आहे. कंपनी ग्रे मार्केटमध्ये १५० रुपयांच्या प्रीमियमवर ट्रेडिंग करत आहे.

युनायटेड कॉटफॅब बीएसई (United Cotfab BSE)

हा आयपीओ १३ जून रोजी खुला झाला असून १९ जूनपर्यंत गुंतवणूकदारांसाठी खुला राहील. कंपनी ग्रे मार्केटमध्ये २० रुपयांच्या प्रीमियमवर ट्रेडिंग करत आहे. कंपनीच्या आयपीओची किंमत ७० रुपये आहे. लॉट साइज २००० शेअर्स इतकी आहे.

जीईएम एन्वायरो (GEM Enviro)

हा आयपीओ १९ जून रोजी खुला होणार असून २१ जूनपर्यंत त्यात गुंतवणूक करता येणार आहे. हा आयपीओ ग्रे मार्केटमध्ये ४० रुपयांच्या प्रीमियमवर ट्रेडिंग करत आहे. या आयपीओचा दरपट्टा ७१ ते ७५ रुपये आहे. कंपनीनं १६०० शेअर्सचा एक लॉट बनवला आहे.

डीईई डेव्हलपमेंट इंजिनीअर्स (DEE Development Engineers)

हा आयपीओ १९ जून रोजी खुला होणार असून २१ जूनपर्यंत त्यात गुंतवणूक करता येईल. या माध्यमातून कंपनीला ४१८ कोटी रुपये उभारायचे आहेत. आयपीओचा दरपट्टा १९३ ते २०३ रुपये आहे. कंपनी ग्रे मार्केटमध्ये ५० रुपयांच्या प्रीमियमवर ट्रेडिंग करत आहे.

ड्युरलॅक्स टॉप सरफेस (Durlax Top Surface)

हा आयपीओ १९ ते २१ जून दरम्यान खुला राहील. ग्रे मार्केटमध्ये या शेअरची किंमत सध्या १७ रुपये आहे. या माध्यमातून ४०.८० कोटी रुपये उभारण्याचं कंपनीचं लक्ष्य आहे. आयपीओचा दरपट्टा ६५ ते ६८ रुपये आहे.

फाल्कन टेक्नोप्रोजेक्ट्स इंडिया (Falcon Technoprojects India)

हा आयपीओ १९ जून ते २१ जून दरम्यान खुला असेल. कंपनीच्या आयपीओचा आकार १३.६९ कोटी रुपये आहे. शेअरची किंमत प्रत्येकी ९२ रुपये आहे. आयपीओचा एक लॉट १२०० शेअरचा आहे.

आसान लोन्स (Aasaan Loans)

१९ ते २१ जून या कालावधीत हा आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला असेल. कंपनी ग्रे मार्केटमध्ये ३३ रुपयांच्या प्रीमियमवर ट्रेडिंग करत आहे. हाच ट्रेंड कायम राहिल्यास कंपनी १५० रुपयांच्या वर सूचीबद्ध होऊ शकते. कंपनीच्या आयपीओची किंमत ११४ ते १२० रुपये आहे.

एनन्यूट्रिका (EnNutrica)

हा आयपीओ २० जून रोजी खुला होणार असून २४ जून रोजी बंद होणार आहे. ग्रे मार्केटमध्ये हा शेअर २७ रुपयांच्या प्रीमियमवर ट्रेडिंग करत आहे. आयपीओचा दरपट्टा ५१ ते ५४ रुपये आहे. आयपीओचा लॉट २००० शेअर्सचा आहे.

विनी इमिग्रेशन (Winny Immigration)

कंपनी ग्रे मार्केटमध्ये ४५ रुपयांच्या प्रीमियमवर ट्रेडिंग करत आहे. या आयपीओच्या माध्यमातून ९.१३ कोटी उभारण्याचं कंपनीचं लक्ष्य आहे. हा आयपीओ २० ते २४ जून दरम्यान खुला होईल. आयपीओचा दरपट्टा १४० रुपये आहे.

मेडीकेमेन ऑरगॅनिक्स (Medicamen Organics)

मेडीकेमेन ऑरगॅनिक्सचा आयपीओ २१ जूनपासून खुला होणार असून तो २५ जूनपर्यंत खुला असेल. या आयपीओचा दरपट्टा ३२ ते ३४ रुपये आहे. कंपनीचा IPO ग्रे मार्केटमध्ये ५० रुपयांच्या प्रीमियमवर ट्रेड करत आहे.

स्टॅनले (Stanley)

कंपनीचा आयपीओ ग्रे मार्केटमध्ये ११० रुपयांच्या प्रीमियमवर ट्रेडिंग करत आहे. हा IPO २१ जून रोजी खुला होईल व २५ जूनपर्यंत खुला राहील. दरपट्टा ३५१ ते ३६९ रुपये आहे. एका लॉटमध्ये ४० शेअर्स दिले जाणार आहेत.

 

(डिस्क्लेमर : वरील वृत्त हे माहितीपर आहे. हा कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणुकीत जोखीम असते. त्यामुळं कोणताही गुंतवणुकीचा निर्णय घेण्यापूर्वी तुमच्या सल्लागाराशी चर्चा करा.)

Whats_app_banner