Bank FD rates : बदलत्या काळात गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध झाले असले तरी भारतीय ग्राहकांचा मुदत ठेवींवरील (Fixed Deposits) विश्वास अद्यापही कायम आहे. किंबहुना, अधूनमधून तो वाढत आहे. तुम्हीही नजीकच्या भविष्यात एफडीमध्ये गुंतवून करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.
देशातील बड्या सरकारी आणि खासगी बँकांव्यतिरिक्त स्मॉल फायनान्स बँकादेखील आपल्या ग्राहकांना एफडीवर बंपर परतावा देत आहेत. यात जवळपास १० स्मॉल फायनान्स बँकांचा समावेश आहे. या बँका आपल्या ग्राहकांना एफडीवर ९.६० टक्क्यांपर्यंत व्याज देत आहेत.
सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक तिच्या सर्वसाधारण ग्राहकांना ५ वर्षांच्या एफडीवर ९.१० टक्के आणि ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना ९.६० टक्के व्याज देत आहे.
युनिटी स्मॉल फायनान्स बँक तिच्या सर्वसाधारण ग्राहकांना १००१ दिवसांसाठी ९ टक्के आणि ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना ९.५० टक्के व्याज देत आहे.
फिनकेअर स्मॉल फायनान्स बँक तिच्या सर्वसाधारण ग्राहकांना १००० दिवसांच्या एफडीवर ८.५१ टक्के आणि ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना ९.११ टक्के व्याज देत आहे.
इक्विटास स्मॉल फायनान्स बँक तिच्या सर्वसाधारण ग्राहकांना ८८८ दिवसांच्या एफडीवर ८.५० टक्के आणि ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना ९ टक्के व्याज देत आहे.
ईएसएएफ स्मॉल फायनान्स बँक तिच्या सर्वसाधारण ग्राहकांना २ वर्ष ते ३ वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या एफडीवर ८.५० टक्के व्याज देत आहे, तर ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना ९ टक्के व्याज देत आहे.
जन स्मॉल फायनान्स बँक तिच्या सर्वसाधारण ग्राहकांना ५०० दिवसांच्या एफडीवर ८.५० टक्के आणि ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना ९ टक्के व्याज देत आहे.
उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक तिच्या सर्वसाधारण ग्राहकांना १००० दिवस ते १५०० दिवसांच्या एफडीवर ८.२५ टक्के, तर ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना ८.८५ टक्के व्याज देत आहे.
उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक तिच्या सर्वसाधारण ग्राहकांना ५६० दिवसांच्या एफडीवर ८.२५ टक्के आणि ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना ८.८५ टक्के व्याज देत आहे.
शिवालिक स्मॉल फायनान्स बँक आपल्या सर्वसाधारण ग्राहकांना २४ महिने ते ३६ महिन्यांच्या एफडीवर ८.१५ टक्के आणि ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना ८.६५ टक्के व्याज देत आहे.
एयू स्मॉल फायनान्स बँक आपल्या सर्वसाधारण ग्राहकांना २४ महिने १ दिवस ते ३६ महिन्यांच्या एफडीवर ७.७५ टक्के आणि ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना ८.२५ टक्के व्याज देत आहे.