
Bank FD interest rates : गुंतवणुकीचे कितीही पर्याय सध्या बाजारात उपलब्ध असले तरी बँकेतील मुदत ठेव (Fixed Deposit) ही सर्वसामान्य भारतीयांची पहिली पसंत राहिली आहे. सुरक्षितता आणि निश्चित परतावा हे त्यामागचं प्रमुख कारण आहे. मागील काही महिन्यांत एफडीवर मिळणाऱ्या चांगल्या व्याजदरामुळं सर्वसामान्य लोक एफडीतील गुंतवणूक वाढवू लागले आहेत. यातही सर्वाधिक व्याज देणाऱ्या काही बँका आहेत. त्यामुळं नव्यानं एफडी करणाऱ्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.
सध्या सरकारी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकेपासून ते खासगी क्षेत्रातील सर्वच बँका आपल्या ग्राहकांना एफडीवर बंपर व्याज देत आहेत. काही बँका इतर बँकांपेक्षाही यात पुढं आहेत. या बँका कोणत्या आहेत? जाणून घेऊया…
SBM बँक आपल्या सामान्य ग्राहकांना एफडीवर ८.२५ टक्के व्याज आणि ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना ८.७५ टक्के व्याज देत आहे.
बंधन बँक आपल्या सर्वसाधारण ग्राहकांना जास्तीत जास्त ८ टक्के आणि ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना ८.५० टक्क्यांपर्यंत व्याज देत आहे.
डीसीबी (DCB) बँक आपल्या सर्वसाधारण ग्राहकांना एफडीवर ८ टक्के आणि ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना ८.५० व्याज देत आहे.
ड्यूश बँक (deutsche bank) आपल्या सर्वसाधारण ग्राहकांना ७.७५ टक्के आणि ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना ७.७५ टक्के व्याज देत आहे.
येस बँक (Yes Bank) आपल्या सामान्य ग्राहकांना सर्वाधिक ७.७५ टक्के आणि ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना ८.२५ टक्के व्याज देत आहे.
आरबीएल बँक (RBL) आपल्या सर्वसाधारण ग्राहकांना एफडीवर जास्तीत जास्त ७.५० टक्के तर ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना ८ टक्क्यांपर्यंत व्याज देत आहे.
आयडीएफसी फर्स्ट बँक (IDFC First) आपल्या सर्वसाधारण ग्राहकांना जास्तीत जास्त ७.५० टक्के आणि ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना ८ टक्क्यांपर्यंत व्याज देत आहे.
इंड्सइंड (IndusInd) बँक आपल्या सर्वसाधारण ग्राहकांना जास्तीत जास्त ७.५० टक्के आणि ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना ८ टक्के व्याज देत आहे.
एचएसबीसी बँक (HSBC) आपल्या सामान्य ग्राहकांना कमाल ७.५० टक्के ते ज्येष्ठ नागरिक ग्राहकांसाठी ८ टक्क्यांपर्यंत व्याज देत आहे.
करूर वैश्य (Karur Vysya) बँक आपल्या सामान्य ग्राहकांना जास्तीत जास्त ७.५० टक्के आणि ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना ८ टक्क्यांपर्यंत व्याज देत आहे.
संबंधित बातम्या
