
BANK Merger layoffs : स्वित्झर्लडची सगळ्यात मोठी कंपनी क्रेडिट सुईसचे काही दिवसांपूर्वी यूबीएसमध्ये विलिनीकरण झाले होते. क्रेडिट सुईस आणि यूबीएसमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांपुढे नोकरकपातीचे मोठे संकट उभे राहिले आहे. एका खाजगी अहवालानुसार, येत्या काही दिवसात बँकांमध्ये काम करत असलेल्या ३६ हजार लोकांना घरी बसावे लागण्याची शक्यता आहे.
स्विस सरकारच्या मदतीने क्रेडिट सुईसचे विलीनीकरण यूबीएसमध्ये झाले. हे विलीनीकरण १९ मार्च २०२३ मध्ये झाले. हे विलीनीकरण झाले तेंव्हा अमेरिकेतील सिलीकाॅन व्हॅली बँक कंगाल झाले होते. परिणामी बँकिंग क्षेत्रात २००८ प्रमाणे नवे संकट निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मॅनेजमेट २० ते ३० टक्के वर्कफोस हटवण्याच्या तयारीत आहेत. याचाच अर्थ येत्या काही दिवसात २५ ००० ते ३६ हजार कर्मचाऱ्यांची कपात होण्याची शक्यता आहे, या विलीनीकऱणापूर्वी यूबीएसमध्ये ७२ ००० कर्मचारी आणि क्रेडिट सुईसमध्ये ५०००० कर्मचारी काम करत होते.
मार्चमध्ये जाहीर केली दिवाळखोरी
क्रेडिट सुईसने मार्च महिन्यात आर्थिक स्थिती खराब असल्याचे सांगत, स्विस नॅशनल बँकेकडून ५० अब्ज स्विस फ्रँक (५४ अब्ज डाॅलर्स) चे कर्ज घेण्याची तयारी केली . लिक्विडीटी मजबूत करण्याच्या उद्देशाने ही निर्णायक कारवाई असल्याचे क्रेडिट सुईसने म्हटले आहे. दरम्यान प्रमुख स्विस बँकेच्या शेअर्समध्ये ३० टक्क्यांपर्यंत घसरण झाली. स्विस रेग्युलेटरीने केंद्रीय बँकेद्वारे क्रेडिट सुईसला एक 'liquidity lifeline' देण्याचे वचन दिले होते.
संबंधित बातम्या
