Aadhar Card Update last date : आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची शेवटची तारीख उद्या १५ डिसेंबर असून यानंतर आधार कार्ड मोफत उपडते करायचे असल्यास नागरिकांना शुल्क भरावे लागणार आहे. डिसेंबर महिन्यात अनेक आर्थिक कामे पूर्ण करण्यासाठी मुदत संपणार आहे. यामध्ये आयटीआर भरण्याची मुदत देखील संपणार आहे. त्यामुळे ही कामे तातडीने पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ज्यांचे आधार कार्ड १० वर्षे जुने आहे, असे नागरिक १५ डिसेंबरपर्यंत ते मोफत अपडेट करू शकतात. या अद्ययावत प्रक्रियेत नाव, पत्ता, जन्मतारीख आणि फोटो दुरुस्त करता येणार आहे. १५ तारखेनंतर आधार कार्ड अपडेट करण्यासाठी नागरिकांना आधार कार्ड सेंटरवर जावे लागणार आहे. तसेच त्यासाठी त्यांना ५० रुपये विहित शुल्क देखील भरावे लागणार आहे. तर बायोमेट्रिक माहिती अपडेट करण्यासाठी १०० रुपये मोजावे लागणार आहेत.
अशा प्रकारे ऑनलाईन अपडेट करा आधार कार्ड
ईपीएफओशी संलग्न खासगी क्षेत्रातील नवीन कर्मचाऱ्यांसाठी युनिव्हर्सल अकाउंट नंबर (यूएएन) सक्रिय करण्याची मुदतही जवळ आली आहे. कर्मचाऱ्यांना आता १५ डिसेंबरपर्यंत आपले यूएएन आणि बँक खाते आधारशी लिंक करावे लागणार आहे. यापूर्वी त्याची शेवटची तारीख ३० नोव्हेंबर होती, परंतु ईपीएफओने ती १५ डिसेंबरपर्यंत वाढवली. यूएएन सक्रिय झाल्याने कर्मचारी एम्प्लॉयमेंट लिंक्ड इन्सेंटिव (ईएलआय) योजनेचा लाभ घेऊ शकतील. सध्या चालू आर्थिक वर्षात कामावर आलेल्या कर्मचाऱ्यांकडूनच माहिती अद्ययावत केली जात आहे. पुढील टप्प्यात जुन्या कर्मचाऱ्यांनाही आपला तपशील अपडेट करावा लागणार आहे.
विलंबाने आयकर विवरणपत्र भरण्याची शेवटची संधी
जर एखाद्या करदात्याने २०२३-२४ या आर्थिक वर्षाचे प्राप्तिकर विवरणपत्र भरण्यास चुकले असेल तर त्याच्याकडे ३१ डिसेंबरपर्यंत ची मुदत आहे. त्याचे करदाते विलंबाने आयटीआर दाखल करू शकतात. विलंबाने आयटीआर भरताना तुम्हाला दंड भरावा लागतो, जो १००० रुपयांपासून ५००० रुपयांपर्यंत असू शकतो.
याशिवाय अॅडव्हान्स टॅक्स भरण्याची शेवटची तारीख १५ डिसेंबर आहे. १५ मार्चपर्यंत १०० टक्के अॅडव्हान्स टॅक्स भरावा लागणार आहे. १५ सप्टेंबरपर्यंत ४५ टक्के, १५ डिसेंबरपर्यंत ७५ टक्के आणि १५ मार्चपर्यंत १०० टक्के रक्कम जमा करायची आहे. डेडलाइन ओलांडल्यास दंड आणि व्याज भरावे लागू शकते.
संबंधित बातम्या