tesla ceo Elon Musk cancels his visit to india : भारत सरकारने अलीकडेच नवीन इलेक्ट्रिक वाहन उत्पादन धोरण जाहीर केले आहे. यानुसार भारतात मेक इन इंडिया अंतर्गत टेस्लाच्या इलेक्ट्रिक कारची निर्मिती करण्याची घोषणा करण्यासाठी एलॉन मस्क भारतात येणार होते. मस्क हे २१ आणि २२ एप्रिल रोजी भारत दौऱ्यावर येणार होते. मात्र, त्यांचा हा नियोजित दौरा रद्द झाला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी त्यांचा भारत दौरा पुढे ढकलला आहे. इलॉन मस्क त्यांच्या भारत भेटीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देखील भेट घेणार होते व भारतीय बाजारपेठेत टेस्लाच्या प्रवेशाची घोषणा देखील करणार होते.
इलॉन मस्क यांनी त्यांचा दौरा का रद्द केला याचे कारण अद्याप कळू शकले नाही. १० एप्रिल रोजी इलॉन मस्क यांनी सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म X वर त्यांच्या भारत दौराबद्दल पोस्ट करत पंतप्रधान मोदी यांना भेटण्यास उत्सुक असल्याचे संगितले होते. याव्यतिरिक्त, त्यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद (UNSC) मध्ये भारताला स्थायी सदस्यत्व मिळावे अशी मागणी देखील होती.
भारत सरकारने अलीकडेच नवीन इलेक्ट्रिक वाहन उत्पादन धोरण जाहीर केले आहे. यानुसार मेक इन इंडियाअंतर्गत भारतात इलेक्ट्रिक कार निर्मिती करणाऱ्या कंपन्यांसाठी कर सवलत जाहीर करण्यात आली आहे. इलॉन मस्कची कंपनी टेस्ला इलेक्ट्रिक आणि चालक विरहित कार करणाऱ्या कंपण्यातील आघाडीची कंपनी आहे आहे. इलॉन मस्क भारतात सुमारे २०-३० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती.
एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत पीएम मोदींनी इलॉन मस्कबद्दलही भाष्य केले होते. पीएम म्हणाले होते, "इलॉन मस्क हे मोदींचे समर्थक आहेत असे नसून ते भारताचे समर्थक आहेत."
इलॉन मस्क यांची यापूर्वी दोनदा भेट झाल्याचे पीएम मोदींनी सांगितले. एकदा २०१५ मध्ये एका कारखान्याच्या भेटीदरम्यान आणि दुसऱ्यांदा गेल्या वर्षी अमेरिकेच्या भेटीदरम्यान मोदी हे मस्क यांना भेटले होते. २०१५ मध्ये त्यांच्या प्रकल्पाला दिलेल्या भेटीचे स्मरण करून मोदी म्हणाले, टेस्लाचे सीईओ यांना भेटण्यासाठी त्यांनी त्यांची पूर्व नियोजित बैठक रद्द केली होती. पीएम म्हणाले, "त्यांनी मला त्यांच्या कंपनीतील सर्व काही दाखवले. मला त्यांच्याकडून त्यांची दृष्टी समजली. मी अलीकडेच २०२३ मध्ये अमेरिकेला गेलो होतो आणि त्यांना पुन्हा भेटलो. आता ते भारतात येणार आहेत."
गेल्या वर्षी जूनमध्ये पंतप्रधानांच्या अमेरिका दौऱ्यादरम्यान मस्क यांनी मोदींची भेट घेतली होती. इलॉन मस्क यांनी तेव्हा सांगितले होते की त्यांनी २०२४ मध्ये भारतात येण्याची योजना आखली आहे . तसेच त्यांची कंपनी लवकरच भारतीय बाजारपेठेत प्रवेश करेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला होता.
संबंधित बातम्या