IPO Listing : निवा बुपा हेल्थ इन्शुरन्सच्या शेअरची बाजारात धडाकेबाज एन्ट्री, लिस्टिंगनंतरही तेजी
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  IPO Listing : निवा बुपा हेल्थ इन्शुरन्सच्या शेअरची बाजारात धडाकेबाज एन्ट्री, लिस्टिंगनंतरही तेजी

IPO Listing : निवा बुपा हेल्थ इन्शुरन्सच्या शेअरची बाजारात धडाकेबाज एन्ट्री, लिस्टिंगनंतरही तेजी

HT Marathi Desk HT Marathi
Nov 14, 2024 10:34 AM IST

Niva Bupa IPO Listing : निवा बुपा हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेडचा आयपीओ आज बीएसई आणि एनएसईवर सूचीबद्ध झाला. कंपनीचे शेअर्स वधारून लिस्ट झाले. त्यामुळं गुंतवणूकदारांचे चेहरे खुलले.

मल्टीबॅगर स्टॉक आदित्य व्हिजन
मल्टीबॅगर स्टॉक आदित्य व्हिजन

Niva Bupa Share Price : निवा बुपा हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (पूर्वीची मॅक्स बुपा हेल्थ इन्शुरन्स कंपनी) चा आयपीओ आज, गुरुवारी शेअर बाजारात सूचीबद्ध झाला. कंपनीचे शेअर्स बीएसई आणि एनएसईवर लिस्ट झाले. हा शेअर बीएसईवर ७ टक्के प्रीमियमसह ७८.५० रुपयांवर लिस्ट झाला. तर एनएसईवर हे शेअर्स ७ टक्के प्रीमियमसह ७८.१४ रुपयांवर लिस्ट झाला. लिस्टिंगच्या काही मिनिटांतच कंपनीचे शेअर्स १० टक्क्यांपर्यंत वधारले आणि ८१ रुपयांवर पोहोचले.

निवा बुपा हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेडचा आयपीओ तीन दिवसांत १.८० पट सब्सक्राइब झाला होता. एनएसईच्या आकडेवारीनुसार, आयपीओ ऑफर १७,२८,५७,१४३ शेअर्सची होती. मात्र, बोली ३१,१३,६२,८०० समभागांसाठी लागली. 

हा आयपीओ किरकोळ वैयक्तिक गुंतवणूकदार श्रेणीत (RII) २.७३ पट, तर पात्र संस्थात्मक खरेदीदार (क्यूआयबी) श्रेणीत २.०६ पट सब्सक्राइब झाला होता. बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांचा हिस्सा ६८ टक्के होता. निवा बुपा हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेडनं बुधवारी अँकर गुंतवणूकदारांकडून ९९० कोटी रुपये उभे केले. आयपीओची किंमत ७० ते ७४ रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आली आहे.

या आयपीओमध्ये ८०० कोटी रुपयांच्या फ्रेश इक्विटी इश्यू आणि प्रवर्तकांच्या १,४०० कोटी रुपयांपर्यंतच्या ऑफर फॉर सेल (OFS) चा समावेश होता. कंपनीनं इश्यूचा आकार कमी केला आहे. यापूर्वी तीन हजार कोटी रुपये उभारण्याची योजना होती.

 

(डिस्क्लेमर: हे वृत्त केवळ माहितीपर आहे. हा कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला नाही. त्यामुळं गुंतवणूक करण्याआधी आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा.)

Whats_app_banner